काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 25, 2013

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू


ब्रह्मपुरी- वन विभागांतर्गत येणाऱ्या सायगाटाच्या जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या रेखा सोनटक्के (३५) हिचा पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सात वाजता घडली. गेल्या दोन महिन्यातील वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यातील हा बारावा बळी आहे.  मूळची नागभीड तालुक्यातील पानोळी येथील रहिवासी असलेली रेखा सोनटक्के ही उन्हाळय़ात ब्रह्मपुरी तालुक्यातील मौशी येथे माहेरी आली होती. सध्या तेंदूपानांचा हंगाम सुरू असल्याने गावातील काही महिलांसोबत ती पाने तोडण्यासाठी जंगलात जात होती. आज पहाटे ५.३० वाजता ती गावातील महिलांसोबत तेंदूपाने तोडण्यासाठी सायगाटाच्या जंगलात गेली होती. तेंदूपाने तोडत असतानाच कक्ष क्रमांक ११८ मध्ये पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून रेखाच्या नरडीचा घोट घेतला. वाघाने तिचा गळा जबडय़ात पकडताच जोरदार किंचाळी मारली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सोबतच्या सर्व महिलांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी वाघाने तिला जबडय़ात पकडले होते. समोर महिला व पुरुषांना बघून वाघ रेखाला जखमी अवस्थेत तिथेच सोडून जंगलात पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत रेखाला प्रथम ब्रम्हपुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक संजय ठवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच सहायक वन परिक्षेत्राधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रेखाची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन प्राथमिक उपचारानंतर नागपूर मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले. दुपारी बारा वाजताच्या सुमारास नागपूर मेडिकल कॉलेजला पोहोचल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद देण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. वाघाचा हल्ला होण्याच्या काही मिनिट पहिले सायगाटाच्या चौकीदाराने रेखा व तिच्या इतर महिला सहकाऱ्यांना त्या परिसरात जाऊ नका, तेथे वाघ आहे, असे बजावले होते. मात्र चौकीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्यानेच रेखाचा मृत्यू झाला, अशी माहिती उपवनसंरक्षक संजय ठवरे यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना दिली. मृत रेखाच्या कुटुंबीयांना वन खात्याने दहा हजारांची तातडीची मदत दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीप्रमाणे हल्लाखोर वाघ हा पूर्णवाढ झालेला होता. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात वाघ व बिबटय़ाने घेतलेला हा १२ वा बळी आहे. कडक उन्हामुळे वाघ जंगलाच्या बाहेर पडत आहेत आणि याच वेळी तेंदूपानांचा हंगामही सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी तेंदू गोळा करण्यासाठी समूहाने जावे, असे आवाहन वन खात्याने केले आहे.

हल्ल्यातील बळी
२४ मार्च - अनुसया शेंडे, पालेबारसा ता. सावली.
६ एप्रिल - ध्रुपदा मडावी, सादागड ता. सावली.
१० एप्रिल - तुकाराम धारणे व मालन मुनघाटे, आगरझरी ता. चंद्रपूर.
११ एप्रिल - ललिता पेंदाम, पाथरी ता. सावली.
१२ एप्रिल - नीलिमा कोटरंगे, चोरगाव ता. भद्रावती.
१७ एप्रिल - कीर्ती काटकर, पायली ता. चंद्रपूर.
१८ एप्रिल - गोपिका काळसर्पे, किटाळी ता. चंद्रपूर.
  ७ मे - अज्ञात मनोरुग्ण महिला
१० मे - राजू अलकंटीवार, चंद्रपूर
१० मे - अनोळखी महिला, ब्रम्हपुरी
१६ मे - चरणदास लकडे, बाबानगर, चंद्रपूर
२३ मे - रेखा सोनटक्के, ब्रम्हपुरी

Wednesday, May 22, 2013

अखेर तापमानवाढीच्या अभ्यासासाठी हालचाली सुरू

अखेर तापमानवाढीच्या अभ्यासासाठी हालचाली सुरू

 बंडु धोतरे यांच्या पाठपुराव्यानंतर
 पर्यावरण खात्याने घेतली दखल

चंद्रपूरः शहरात दरवर्षी उन्हाळयात होेत असलेली तापमानाच्या वाढीची कारणे शोधुन त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष तथा जिल्हा पर्यावरण समीतीचे सदस्य बंडु धोतरे यांनी गत दोन वर्षापासुन सतत पाठपुरावा केल्यानंतर नागपूरच्या राष्ट्रीय अभियांत्रीकी अनुसंधान संस्थान (निरी) तर्फे अभ्यास करण्याकरिता लागणारा खर्च याकरिता प्रयत्न करण्यााबाबत पर्यावरणमंत्री ना. संजय देवतळे यांनी आश्वासन दिलेले आहे.
उदयोग व खाणीमुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांना प्रदुषणासह दरवर्षी उन्हाळयात वाढत्या तापमानाच्या सामना करावा लागतो. इतर शहराच्या तुलनेत चंद्रपूर शहरातील तापमान रात्री देखील कायम असते. दिवसभर उन तापल्यानंतर रात्री पारा कमी होण्यास प्रचंड वेळ लागतो. त्यामागील नेमकी व अभ्यासपुर्ण कारणे शोधुन कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता ‘निरी’ कडुन संशोधन करण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी दोन वर्षापुर्वी तत्कालीन जिल्हाधीकारी प्रदिप काळभोर (15 मे 2010) यांचेकडे केली होती. त्यावर निरी संस्थेला पत्र पाठवुन मागणीच्या अनुषंगाने विनंती केली, त्याला प्रतिसाद देत निरीने अभ्यास करण्यासाठी होकार दिला (31 मे 2010). मात्र लागणाÚया खर्चाची तरदूत करण्याकरीता निधीचे स्त्रोत ठरविण्याबाबत लिहले होते. पंरतु, नंतरच्या काळात यावर पाठपुरावा न झाल्याने तापमानाचा अभ्यास प्रलंबीत होता.
यावर पुन्हा बंडु धोतरे यांनी यावर्षी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांचेकडे पाठपुरावा करित निवेदन दिले (23 जाने 2013) त्यावर जिल्हाधिकारी यांनी निरी ला पत्र लिहुन अभ्यासाकरता लागणाÚया खर्चाबाबत अंदाजपत्रक मागतीले होते. यासंदर्भात निरीकडुंन सदर अभ्यासकरीता खर्चाचे अंदाजपत्रक पाठविले होते. यावर पुन्हा बंडु धोतरे यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री श्री संजय देवतळे यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटीत तापमानवाढीच्या कारणांचा अभ्यास करण्याची गरज पटवून सांगीतली. मंत्री महोदयानी त्यावर पर्यावरण खात्याचे सचिव यांना पत्र पाठवुन त्यादृष्टीने पाठपुरावा करण्याचा सुचना दिल्या.
या अभ्यासकार्याला 2 वर्षाचा कालावधी व अंदाजे 80 लाख रूपये खर्च अपेक्षीत आहे. सध्या चंद्रपूरचे वाढते तापमान व सर्वसामान्याचे जिवनयापन कठीण झाले असल्याने पुन्हा एकदा इको-प्रो तर्फे सदर अभ्यास करण्याकरीता पाठपुरावा केला जात आहे. याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आल्यास येत्या काही दिवसात या अभ्यासकार्याला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

Monday, May 20, 2013

 मनीष गुड्डेवारला  पाच दिवसांची पोलिस कोठडी

मनीष गुड्डेवारला पाच दिवसांची पोलिस कोठडी


नागपूर: आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या, नागपूरच्या तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नागपुर कनेक्शन उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलिसांनी काल तीन बुकींना औरंगाबादमधून अटक करण्यात आली.  माजी रणजीपटू मनीष गुड्डेवार, सुनील भाटिया आणि किरण डोळे अशी या तिघांची नावं आहेत. हे सगळे दोन गाड्यांनी शिर्डिला गेले होते. शिर्डीहून परतत असताना औरंगाबादमधील हॉटेल लेमन ट्री येथे ते मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.



MANISH GUDDEWAR

Full name:Manish M Guddewar
Born:30th September 1981, Yavatmal, Maharashtra, India
Batting:Right-hand batsman
Bowling:Leg-break and googly
Teams:Vidarbha (Main ListA: 2003/04-2005/06); All teams


List A Career Batting and Fielding (2003/04-2005/06)
MINORunsHSAve10050SRateCt
Vidarbha77062198.850084.934
List A Career Bowling (2003/04-2004/05)
BallsMdnsRunsWktsBBAve4wI5wISRateEcon
Vidarbha7207911-2479.000072.006.58

आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणाचे धागेदोरे आता विदर्भाशीही जुळू लागले असून, दिल्ली पोलिसांनी विदर्भाचा माजी रणजीपटू मनीष गुड्डेवारला अटक केली. 
मनीष गुड्डेवार याने मध्य विभागाच्या रणजी एकदिवसीय सामन्यात विदर्भाचे प्रतिनिधित्व केले आहे. मूळचा गडचिरोली येथील असलेला मनीष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव पंकज गुड्डेवार यांचा भाऊ आहे. मनीषने रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील सात सामन्यात विदर्भाचे प्रतिनिधित्व केले आहे. ९ जानेवारी २00४ मध्ये जयपूरला राजस्थानविरुद्ध मनीषने पहिला सामना खेळला होता.११ फेब्रुवारी २00६ मध्ये जयपूर येथे उत्तरप्रदेश विरुद्ध त्याचा शेवटचा सामना होता. उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या मनीषने सात सामन्यात एकूण ६९ धावा केल्या असून नाबाद २६ धावा ही त्याची उत्कृष्ट कामगिरी होती. तो फिरकी गोलंदाजीही करायचा व या सात सामन्यात त्याने फक्त एक गडी बाद केला होता. तसेच तो दिल्ली येथील कसोटीपटू विजय दहिया याच्या क्लबकडून खेळला आहे. 
-------------------------------------------------------
व्हीडीओ 

Saturday, May 18, 2013

जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू

जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू


*आझाद बागेतील घटना
चंद्रपूर, १८ मे
शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद बागेतील जलतरण तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. संदीप भाऊराव qपपळशेंडे (२०, रा. बाबुपेठ) असे मृतक युवकाचे नाव आहे.
महानगरपालिकेची मालकी असलेली आझाद बाग शहरवासीयांसाठी विरंगुळ्याचे केंद्र बनले आहे. दररोज सकाळी व संध्याकाळच्या सुमारास फेरफटका मारणाèयांची येथे मोठी गर्दी असते. त्याचप्रमाणे जलतरण तलाव असल्याने येथे अनेकजण पोहण्यासाठी येत असतात. बाबुपेठ रहिवाशी संदीप qपपळशेंडे हा युवकही येथे पोहण्यासाठी येत होता. दरम्यान, शनिवारीही तो नेहमीप्रमाणे येथे आला. परंतु, पोहत असतानाच त्याचा तलावात मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृतक संदीप हा राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूने qपपळशेंडे कुटुंबियांवर मोठे संकट ओढवले आहे. संदीपचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी शहर पोलिसांनी घटनेची नोंद करुन तपास सुरू केला आहे.
महालगावची शेततळे शेतक-यांसाठी आदर्श --- पालकमंत्री संजय देवतळे

महालगावची शेततळे शेतक-यांसाठी आदर्श --- पालकमंत्री संजय देवतळे


            110 शेततळयाचे काम पूर्ण
            650 हेक्टर ढाळीचे बांध बांधले
    चंद्रपूर दि.18- विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत महालगांव परिसरात निर्माण करण्यात आलेले शेततळे शेतक-यांसाठी आदर्श ठरणार असून शेततळयामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होवून सोयाबीन, कापूस व हरभरा पिकास नवसंजीवनी मिळेल असे मत पालकमंत्री संजय देवतळे यांनी व्यक्त केले.
    कृषी विभागाच्या वतीने महालगांव येथे तयार करण्यात आलेल्या बांधबंधीस्त, ढाळीचे बांध व शेततळयाची पाहणी आज पालकमंत्री संजय देवतळे यांनी केली.  त्यावेळी त्यांचेसोबत जिल्हाधिकारी विजय वाघमारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय अधिकारी भुगावकर, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिवचरण राजवाडे व इतर अधिकारी उपस्थित होते. गोसावी विटू ठेंगणे, अशोक घोडमारे व विनोद देवराव राऊत यांच्या शेतात जावून पालकमंत्र्यांनी शेततळे, चर व बांधबंधिस्ताच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
    कोरडवाहू क्षेत्रातील शेतक-यांसाठी विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रम असून उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने हा विशेष कार्यक्रम केवळ विदर्भात राबविण्यात येत आहे.  या कार्यक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील महालगांव शिवारात कृषी विभागाच्या वतीने बांध बंधिस्त व शेततळयाचा विशेष कार्यक्रम राबविला आहे.  या अंतर्गत 110 शेततळी, 650 हेक्टर ढाळीचे बांध बांधण्यात आले.  शेतक-यांना 135 रिजर, 7 डिझल पंप, 50 ओपनवेल सबमर्सिबल पंप व 35 तुषार संच वाटप करण्यात आले.  या कामाची पाहणी केल्यानंतर बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, कोरडवाहू भागात केवळ एक पिक घेणा-या    शेतक-यासाठी शेततळे आर्थिक उन्नतीचे साधन ठरत आहे.
    महालगांवातील शेतक-यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेततळयाच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्यासाठीचे अभिनंदनीय पाऊल उचलले आहे.  या शेततळयामुळे पाण्याची पातळी वाढण्यास निश्चितच मदत होईल व याचे परिणाम दोन वर्षात भरघोष पिकाच्या रुपाने दिसायला लागतील. 
    या पाहणी दौ-यानंतर कृषी विभागाने आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, केवळ शेततळे उभारुन किंवा बांध बंधिस्त करुन उत्पादन वाढणार नाही तर त्यासाठी शेतक-यांनी नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे.  ज्या शेतक-यांनी नवीन प्रयोग करुन भरघोष उत्पादन घेतले अशा शेतक-यांच्या शेतांना भेटी देवून त्यांनी राबविलेल्या नव्या प्रयोगाचे अनुकरण करायला हवे.  पारंपारिक शेती पध्दतीत बदल करणे काळाची गरज असून शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत प्रयोगशील शेती करावी असे आवाहन त्यांनी केले.
    या कार्यक्रमात शत्रुघ्न पुसनाके यांना डिझल इंजिन, वामनराव माकोडे यांना रिजर व प्रमोद आवारी यांना तुषार संचासाठी धनादेश पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, या परिसरातील शेतक-यांची प्रयोगशीलता जिल्हयातील शेतक-यांसाठी अनुकरणीय आहे. उत्पादन वाढवायचे असल्यास मानसिकता बदलणे गरजेचे आहे व हा बदल महालगांवच्या शेतक-यांनी घडवून आणला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवचरण राजवाडे यांनी केले.

Friday, May 17, 2013

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर शहराच्या बाबानगर परिसरात ६० वर्षीय इसम ठार -
बिबट हल्ला मालिकेतील अकरावा बळी
चंद्रपूर,  दि.१७ (प्रतिनिधी) :
 चंद्रपूर शहरातील बाबानगर भागात आज संध्याकाळी  एक मृतदेह आढळून आला. या इसमावर या परिसरात नव्यानेच आढळणा-या बिबट्याने हल्ला केल्यावर त्याचा  मृत्यू झाल्याचे बोलले  जात आहे. मृतकाचे नाव चरणदास लाकडे-६०  असे आहे.  या घटनेने परिसरात घबराट पसरली असून घटना जंगल परिसराला लागून असलेल्या झोपडपट्टी परिसरात घडल्याने नागरिक धास्तावले आहेत.
 गेले काही महिने हा बिबट्या या परिसरातील नागरिकांना दर्शन देत होता. चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागात बाबानगर परिसर जंगलाने वेढला आहे. या भागात पाणी व छोटी जनावरे मोठ्या संख्येने आहेत. म्हणूनच बिबट्याचा या भागातील वावरही वाढला आहे.  या भागात घरी एकटेच राहणारे चरणदास लाकडे रात्री नेहमीप्रमाणे बाहेर खाटेवर झोपले होते मात्र रात्री अचानक बिबट्याने त्यांना खाटेवरून ओढून नेत लगतच्या झुडपी जंगलात त्याना ठार केले. हि घटना कुणाच्या लक्षात आली नाही. रात्री या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्यावर नागरिकांनी परिसराची पाहणी केल्यावर नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. लगेच हा  कुजू लागलेला मृतदेह नेण्याची तयारी लोकानी  केली मात्र वनविभाग वा पोलिस यासह स्वयंसेवी संस्था यापैकी कुणीही शववाहीकेची मदत केली नाही. अखेर स्थानिकांना  एका साध्या  तीन चाकी रिक्षावर हा मृतदेह सुमारे ४ किमी लांबवर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणावा लागला. या इसमाच्या शरीराचे काही भाग बिबट्याने खाल्ल्याचे दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. यात एखाद्या वन्यजीवानेचरणदासला काही दूरवर ओढत नेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शव वाहिका न मिळाल्याने चरणदासचा मृतदेह रिक्षावर आणावा लागल्याचे पोलिसांनी मान्य केले मात्र परिसरात कुणीही यासाठी  मदत केली नसल्याने हि नामुष्की ओढविल्याचे स्पष्ट झाले.   घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी अखेरपर्यंत पोचलेच नाहीत. आधी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा बफर क्षेत्रात होणा-या  बिबट्याच्या हल्ल्यांनी वनविभाग हादरला होता. आता चंद्रपूर शहराच्या सीमेवर होणा-या हल्ल्यांनी वनविभाग गोंधळून गेलाय. या संकटातून वनविभागाला मार्ग सापडेल का आणि केव्हा. तोवर किती बळी जातील असा प्रश्न चंद्रपूरकराना पडला आहे.
मृतदेह जाळल्याप्रकरणी प्रियकराला फाशी

मृतदेह जाळल्याप्रकरणी प्रियकराला फाशी


नागपूरातील कॉलेज तरुणीचा खून

नागपूर, दि. १७ - गेल्या वर्षी नागपूरातील धनश्री रामटेके या तरुणीचा खून केलेल्या दोघा गुन्हेगारांपैकी एकाला न्यायालयाने फाशीची तर दुस-याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. धनश्रीचे दुस-या व्यक्तिशी संबंध आहेत, असा संशय घेऊन तिचा प्रियकर धरमवीर चव्हाण याने आपला मित्र सोनू उर्फ चेरी सदाशिव राऊतकर याच्या मदतीने गळा आवळून खून केला व मृतदेह जाळून टाकला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एल. व्यास यांनी काल गुरुवारी दोन्ही आरोपींना दोषी जाहीर केले होते. धरमवीर श्रीराम चव्हाण (२४) आणि पंकज ऊर्फ सोनू ऊर्फ चेरी सदाशिव राऊतकर (२२), अशी आरोपींची नावे असून दोघेही पलोटीनगर येथील रहिवासी आहेत. धनश्री नीळकंठ रामटेके, असे मृत कॉलेज तरुणीचे नाव होते. ती गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणीनगर येथील रहिवासी होती.
पुतळ्यावर धूळ अन् कुजलेल्या माळा

पुतळ्यावर धूळ अन् कुजलेल्या माळा



चंद्रपूर : राष्ट्रहितासाठी आपले आयुष्य वेचणाèयांच्या कार्याची आठवण नव्या पिढीला होत राहावी, म्हणून या थोर महात्म्यांचे पुतळे बांधण्यात येतात. मात्र, जयंती आणि पुण्यतिथीशिवाय इतर दिवशी त्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने पुतळ्यांवर सध्या प्रदूषणाची धूळ आणि कुजलेल्या माळा दिसत आहेत.

महात्मा गांधी
शांतीच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाèया राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे शहरात तीन पुतळे आहेत. गांधी चौकात महानगरपालिकेच्या नवीन वास्तूसमोर हा संगमवरी दगडांचा पुतळा आहे. जयंती, पुण्यतिथीशिवाय स्वातंत्र्यदिन आणि गणराज्यदिनी गांधीजींच्या पुतळ्याला माळा घालून नमन केले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणारे मोर्चे गांधी चौकातूनच निघत असल्याने आंदोलनकर्ते याच पुतळ्याला माळ चढवून आंदोलनाला प्रारंभ करतात. सध्या या पुतळ्यावर चंद्रपूरच्या प्रदूषणाची धूळ माखलेली आहे.
गांधीजींचा दुसरा पुतळा राजीव गांधी कामगार भवनात आहे. काँग्रेसचे कार्यक्रम वगळता येथे अन्य कुणी माळा चढवीत नाहीत. तिसरा पुतळा शहराच्या दर्शनी भागात आहे. महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त जटपुरा गेटसमोर महात्त्मा गांधीजींचा पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण दोन ऑक्टोबर १९६९मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते, तर ग्रामविकासमंत्री नरेंद्र तिडके यांच्या उपस्थितीत झाले होते. शहरात प्रवेश करताना जटपुरा गेटसमोर काळ्या रंगात हा पुतळा आहे. येथे नियमित देखभाल असते. त्यामुळे पुतळ्यावर धूळ qकवा कुजलेल्या माळा दिसत नाहीत.
----------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
गांधी चौकातून जटपुरा गेटकडे जाताना गोलबाजारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण २० मे १९६९ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले. तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे हेसुद्धा उपस्थित होते. दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुवर्तनदिन, सहा डिसेंबर महापरिनिर्वाणदिन, १४ एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीदिनी या पुतळ्यासमोर अनुयायी मोठ्या संख्येने नतमस्तक होतात. सध्या पुतळ्यावर रस्त्यावरील धूळ आणि कुजलेले हार गेल्या अनेक दिवसांपासून आहेत.
-----------
महात्मा जोतिबा ङ्कुले/नेताजी सुभाषचंद्र बोस
आझाद बागेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असून, त्याचे अनावरण नऊ मार्च १९६८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाले होते. सध्या या पुतळ्याची रंगरंगोटी जुनी झाली आहे. याच दिवशी बागेतच महात्मा जोतिबा ङ्कुले यांच्याही पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या पुतळ्याचीसुद्धा तीच अवस्था आहे.
------------------
राजे विश्वेश्वरराव महाराज
अहेरी संस्थानचे राजे विश्वेश्वरराव महाराज हे चंद्रपूर-गडचिरोली माजी खासदार होते. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आझाद बागेच्या कोपèयात मुख्य मार्गावर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार qशदे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. मात्र, आज या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या माहिती ङ्कलकावरील अक्षरेच गायब झाली आहेत. येथे केवळ वर्षातून जयंती आणि पुण्यतिथी दोनच दिवशी माळ घातली जाते. वर्षभर पुतळ्याकडे कुणीच लक्ष देत नाही. त्यामुळे कुजलेल्या माळा तशाच गळ्यात पडून आहेत. पुतळ्याची रंगरंगोटीसुद्धा करण्यात न आल्याने प्रतिमेची अवमानजनक स्थिती झाली आहे.
-----------------------
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते, राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृतिनिमित्त स्मारक समितीच्या वतीने आझाद बागेत पूर्णाकृती बांधण्यात आला. त्याचे अनावरण २५ सप्टेंबर १९८७मध्ये भारताचे तत्कालीन ऊर्जामंत्री वसंतराव साठे यांच्या हस्ते झाले होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तत्कालीन अध्यक्ष जे. ईश्वरीबाई यांची उपस्थिती होती. सध्या या पुतळ्यावरही कुजलेले हार अनेक दिवसांपासून तसेच पडून आहेत.

इंदिरा गांधी
प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहाच्या समोर इंदिरा गांधीजींचा पुतळा आहे. त्याचे भूमिपूजन तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सरोजताई खापर्डे यांच्या हस्ते १८ ङ्केब्रुवारी १९८७ मध्ये झाले होते. अनावरण सोहळ्याला केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे आणि माजी मंत्री वामनराव गड्डमवार यांची उपस्थिती होती. आज या पुतळ्यावरही धूळ माखलेली आहे.














धेय्यवेड्या तरुणांचा तेरा जुनून

धेय्यवेड्या तरुणांचा तेरा जुनून



चंद्रपूरच्या कलावंतांचे एक पाऊल पुढे
चंद्रपूर : चित्रपटनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या चंद्रपूरच्या काही हौशी तरुणांनी मतेरा जुनूनङ्क या qहदी चित्रपटाची निर्मिती केली. गेल्यावर्षी दिवाळीदरम्यान त्यांनी चित्रीकरण केले आणि तीन मे रोजी त्याचा पहिला शो चंद्रपुरात सादर केला. धेय्यवेड्या या तरुणांनी दाखविलेली ही qहमत वाखाणण्याजोगी असून, भविष्यात चंद्रपूरचे नाव सिनेक्षेत्रातही उंचावेल, अशी किमया करून दाखविली आहे. निर्माता, दिग्दर्शक, कलावंत आणि चित्रीकरणाचे स्थळ सारेच चंद्रपूरचे. मात्र, चित्रपटाची मांडणी पूर्णता: दाक्षिणात्य आहे. चंद्रपुरातील स्थानिक माणसे मराठीमिश्रीत qहदी बोलतात. अगदी हीच भाषा कलावंतांच्या तोंडी असून, ज्येष्ठ कलावंतांची कोणतीही नकल न करता उपजत असलेल्या गुणातून त्यांनी कला सादर केली.

कथानक
मतेरा जुनून या चित्रपटाची मांडणी सस्पेन्स आहे. चित्रपटातील नायक राज (योगेशकुमार) हा सोनाली (रूपाली डोंगरे)चा बालपणीचा मित्र. हे दोघेही जमीनदाराची मुले असतात. त्यांची शेती हडप करण्यासाठी मल्लारी (रवी धकाते) दोन्ही कुटुंबास ठार मारतो. जमिनीची वारसदार सोनाली असल्याने मल्लारी तिला १८ वय होईपर्यंत पालनपोषण करावे लागते. खुनाच्या घटनेपासून हे दोघेही दुरावतात आणि राज हा अनाथ होतो. बाईकवर स्टंटबाजी करणे त्याला आवडते. दुसरीकडे सज्ञान झालेल्या सोनालीला मल्लारीचा खरा चेहरा कळतो आणि ती त्यातून सुटका करण्यासाठी एका मित्राची मदत घेते. याचवेळी तिला राजविषयी कळते आणि त्याला मिळविण्यासाठी ती प्रयत्न सुरू करते. याच दरम्यान स्टेडियमवर खेळताना ङ्कूटबॉलमुळे एक बालक गंभीर जखमी होतो. त्याच्या उपचारासाठी १५ लाखांची गरज असते. त्याचा जीव वाचविण्यासाठी राजकडे पैसे नसतात. तेव्हा सोनालीचा मित्र राजला एका अटीवर पैसे देऊ करतो. मात्र, ती अट असते सोनालीला मआय लव्ह यूङ्क म्हण्याची. मल्लारीच्या बंगल्यातील तगडी सुरक्षा भेदून सोनालीला तो प्रपोज करून पळवून नेतो. मात्र, पळून जाण्याचा बेत सोनालीच्याच मनातील होता, हे राजच्या लक्षात येत नाही. जेव्हा जखमी झालेल्या बालकाच्या उपचारासाठी सोनालीनेच पैसे दिले आणि मआय लव्ह यूङ्क म्हणण्याची कल्पनाही तिची असल्याचे लक्षात आल्यावर राजचे डोळे उघडतात. पण, सोनालीला ठार मारून जमिनीचे कागदपत्रे मिळविण्यासाठी मल्लारीचे प्रयत्न सुरू असतात. त्यात सोनालीचा एक मित्र मारला जातो आणि मृत्यूपूर्वी त्याने राजला बालपणी झालेल्या दोघांच्याही आई-वडिलांच्या खुनाचे रहस्य सांगतो. तेव्हा राजला कळते की सोनाली ही बालपणीची सोनू असल्याचे. मग, हे दोघेही मिळून मल्लारी आणि त्याच्या गुंडांना संपवितात.

चित्रपटात चंद्रपूर दर्शन
संपूर्ण चित्रीकरण चंद्रपुरात झालेला हा पहिलाच चित्रपट. यात जटपुरा गेट, जुना वरोरा नाका, पोलिस मुख्यालय, जुनोना तलाव, दाताळा रोड, जयश्रीया लॉन, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी स्थळे दिसतात. बाईक स्टंटसाठी दाताळा मार्गावर नव्याने होत असलेल्या गुळगुळीत रस्त्याची निवड करण्यात आली. जुनोना येथील निसर्गरम्य तलाव आणि जंगलसुद्धा या चित्रपटात दिसते.

टाईमपास
कोणताही चित्रपट म्हटला की विनोद असतोच. त्याशिवाय प्रेक्षकांना मजा येत नाही. या तेरा जुनूनमध्ये मयू. आर क्रेझीङ्क अशी डॉयलाग मारणारा डॉन्स मास्टर हसायला लागतो. सडपातळ बांधा, सावळा रंग आणि टक्कल अशी त्याची व्यक्तिरेखा साकारण्यात आली आहे. मराज, ब्लडी राज....अ‍ॅक्शन कम ङ्काइट जादाङ्क ही नायकाच्या तोंडून निघणारी डायलॉग वारंवार ऐकायला मिळते. खलनायक मल्लारीदेखील तेवढाच प्रभावीशाली दाखविलेला आहे. एकूणच चित्रपटात विनोद, प्रेम आणि थरारही आहे. चित्रपटातील गाणी आणि संगीत साजेसा आहे.
 पाणी बाटलीबंद पाणीपुरवठा

पाणी बाटलीबंद पाणीपुरवठा


चंद्रपूर- अन्न व औषध प्रशासंन कार्यालयानं सुमारे एक महिन्यापूर्वी जिल्ह्यातील अवैधरीत्या व विनापरवाना पाणी बाटलीबंद पाणीपुरवठा करणा-या २७ कारखान्यांना एक नोटीस जारी करत काम बंद करण्याची सूचना केली होती. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांतील या अत्यंत संवेदनशील विषयावर चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनानं अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. कोणतीही परवानगी न घेता हे कारखाने धडाक्यात सुरू आहेत आणि ज्यांनी लाखो रूपये खर्चून डझनभर परवानग्या घेऊन प्रकल्प थाटले आहेत, ते दुर्दैवानं बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या थंड कारभारानं नागरिक मात्र ङ्कसवले जात आहेत. 
बाटलीबंद व पाउचमधून पाणी विक्री करण्याचा एक प्रकल्प थाटण्यासाठी स्वतःच्या जागेसह सुमारे ६० ते ७० लाख रूपयांची गुंतवणूक लागते. सोबतच या बाटलीबंद पाण्याला विक्री करण्यासाठी सुमारे एक डझन परवानग्या आवश्यक आहेत. यात ब्युरो ऑङ्क इंडियन स्टँडर्ड, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका व सर्वात महत्वाची म्हणजे अन्न व औषध प्रशासनाची परवानगी लागते. एवढे सर्व केल्यावर जर शहरात या परवानग्या न घेता सुमारे ७० ते ८० अवैध कंपन्या कार्यरत असतील, तर तुम्ही काय म्हणाल? असाच काहीसा प्रकार चंद्रपुरात उजेडात आला आहे. शहर व जिल्ह्यात ५० हून अधिक विनापरवाना पाणी विक्री कंपन्या आपले कारखाने उघडून पाण्याची अवैध विक्री करत आहेत. साधे बोअरवेलचे पाणी थेट कॅन अथवा पाउचमध्ये भरून थंड करत ते सर्रास नागरिकांच्या माथी मारले जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत भूजल पातळी खालावत असल्यानं पाण्यात क्षाराचं प्रमाण अधिक असतं. अशा वेळेस अनिर्बंध पाणी उपसा केल्यानं जड व क्षारयुक्त पाणी या कारखान्यांमध्ये बाटलीबंद केल्यास मोठ्या प्रमाणात जलजन्य आजार होतात. मात्र, उन लागलं, असं समजून त्याकडे दुर्लक्ष होते. या जड पाण्याला आवश्यक ती प्रक्रिया करून ते वापरात आणणं अत्यंत गरजेचं आहे. हे सर्व एखाद्या प्रमाणित कारखान्यात प्रयोगशाळेच्या माध्यमातून केलं जातं. हे न झाल्यास रोगांना आमंत्रण ठरतं.
चंद्रपूर शहर व जिल्ह्यात १०० पैकी केवळ १३ पाणी प्रकल्प आयएसआय प्रमाणित व बीएसआय प्रमाणपत्रप्राप्त आहेत. अन्य प्रकल्प म्हणजे रोगांना आमंत्रणच. चंद्रपूर-गडचिरोलीत प्रमाणित पाणी विक्री करणा-या कारखान्यांच्या संघटनेनं अवैधरित्या पाणी विक्री करणा-या सर्व प्रकल्पांची यादी अन्न व औषध प्रशासनाला दिली. मात्र, या कार्यालयानं केवळ नोटीसा जारी करून आपली जबाबदारी झटकली. प्रमाणित पाणी विक्री संघटनेच्या पदाधिका-यांनी अवैध व्यापार करणारे प्रकल्प शासनाचा महसूल बुडवत असल्याचं लक्षात आणून दिल्यावरही त्यावर कारवाई होत नसून, लोकांच्या आरोग्याशी प्रशासनानं खेळ चालविला असल्याचा आरोप प्रमाणित संघटनेच्या पदाधिका-यांनी केला आहे. दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उन्हाळी सुट्टीवर आहेत. जे आहेत त्यांच्याकडे दोन विभागांचा प्रभार आहे. अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज अन्न व औषध प्रशासनाला वाटत नाहीये. याच कार्यालयानं अवैध पाणी विक्री प्रकल्पांची यादी प्रसिद्ध करायची अन् कारवाई न करता या प्रकल्पांना लाखोंची कमाई करण्याची मुभा द्यायची, हा अङ्कलातून प्रकार सुरू आहे. इकडे महापालिका नळाद्वारे एक लिटर पाणी ७० पैसे दरानं देते. तर हेच पाणी बाटलीबंद पाणी झाले की १५ रूपये लिटर होते. विनापरवाना व अवैध पाणी विक्री करणारे आपली कमाई  कशी करतात, हेच या दरांमधून स्पष्ट होते. आता या ङ्कसवणूक व अन्न-औषध प्रशासनाच्या अर्थपूर्ण थंड भूमिकेविरुद्ध सामाजिक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
 आपणच यादी जारी करायची आणि नंतर शांत बसायचं, अशी अवैध व्यापाराला प्रोत्साहित करणारी कृती अन्न व औषध प्रशासनाच्या चंद्रपूर कार्यालयानं अवलंबली आहे. या भूमिकेनं शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. सोबतच शरिराची लाही करणा-या चंद्रपूरच्या उन्हाळ्यात अत्यंत विश्वासानं पाणी खरेदी करणा-या नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. अशा विनापरवाना पाणी विक्री करणा-या कंपन्यांकडून होणा-या आरोग्याच्या हानीला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित झाला आहे.

Wednesday, May 15, 2013

मनरेगा`मध्ये पावणे दोन कोटींचा घोटाळा!

मनरेगा`मध्ये पावणे दोन कोटींचा घोटाळा!

आशिष आंबाडे/झी मीडिया

चंद्रपूर - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच `मनरेगा` या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेत तब्बल पावणे दोन कोटींचा घोटाळा उघड झालाय. चंद्रपुरातल्या जिल्हा परिषदेच्या चार अभियंत्यांनी हा प्रताप केलाय. याप्रकरणी या चार अभियंत्यांसह दोन ठेकेदारांना अटक करण्यात आली. त्यांना १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

मनरेगा कार्यक्रमांतर्गत जिवती तालुक्यातील नाईकनगर, चिखली, तुमरीगुडा, रेंगागुडा या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निवारणासाठी तब्बल १२ बंधारे बांधले गेले. यासाठी सुमारे आठ कोटी रूपयांची तरतूद केली गेली. यातील चिखली या गावी जिल्हा परिषदेच्या चार अभियंत्यांनी बोगस मजूर वेगवेगळ्या कामावर दाखवून त्यांची देयके काढली. शिवाय विनापरवानगी जेसीबीच्या सहाय्यानं बांधकाम केलं. मनरेगाच्या उद्देशाला हरताळ फासला फासला जात असल्याचं पाहून स्थानिकांनी याची तक्रार केली. 

बऱ्याच गदारोळानंतर स्थापन करण्यात आलेल्या पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त समितीच्या चौकशीमध्ये स्थानिकांच्या तक्रारीत तथ्य आढळले. त्यानंतर चार अभियंत्यांसह दोन ठेकेदारांना अटक करण्यात आलीय.


मनरेगामध्ये घोटाळा करणाऱ्या अशा सरकारी अभियंत्यांना घरी बसवा, अशी मागणी आता होतेय. या घोटाळ्यात अटक करण्यात आलेले सहा जण वरवरचे प्यादे असून यात बडे मासे गुंतल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करत प्रकरण तडीस नेणाऱ्या तहसीलदारांचीही बदली झालीय. त्यामुळं या घोटाळ्याची तार कुठवर पोहचलीय याचा तपास करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान आहे.
दोन आरोपी पळाले

दोन आरोपी पळाले

जिल्हा कारागृहातून दोन आरोपी पळाले……लंकेश मितानी, नरेंद्र कुमरे हे दोघेही २० ते २५ वयोगटातील आरोपी दरोडा प्रकरणात जेलबंद होते.