मनोज चिचघरे, भंडारा प्रतिनिधी
पवनी : तालुक्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी तालुका पवनी, यांनी केली.
भंडारा जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस असल्यामुळे ८०,०४८ नोंदणीकृत बेरोजगार व अनोंदणीकृत लाखो बेरोजगार रोजगाराच्या शोधात ईतरस्त्र भटकत आहेत.
अशोक लेलैन्ड, सनफ्लँग एम, एम, पी, (महाराष्ट्र मेटल पावडर)
हिंदुस्तान कोमझेप, ई -लाईट या कंपन्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी तालुका, अध्यक्ष शुभम वंजारी,
व लोमेश वैद्य, शैलेश मयूर, लोकेश वैद्य प्रफुल्ल रघूते, शुभम देशमुख, अजय धेग्रे, यांनी केली. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.