अनोखा विक्रम
मायणी :- ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)
मायणी येथील साहस ट्रेकिंग ग्रुप चे सदस्य दत्ता कोळी,सागर घाडगे यांनी 2 हजार 700 किमी व खलील मुलाणी,साईनाथ निकम यांनी 4100 किमी अश्या दोन वेगवेगळ्या दुचाकी मोहीम राबवून विविधतेने नटलेल्या भारत देशाच्या उत्तर भागातील राज्यास भेट देऊन तेथील राहणीमान व वेगळ्या संस्कृतीचा आनंद घेतला.या अनोख्या उपक्रमाचे मायणी सह परिसरात कौतुक करण्यात येत आहे.
प्रथम दत्ता कोळी व सागर घाडगे यांनी आयोजित केलेली गुजरात राज्य भेट मोहिमे अंतर्गत त्यांनी गिरनार येथील गिरिदुर्ग पर्वत रांगेतील दहा हजार पायऱ्या असणाऱ्या श्री दत्तगुरु मंदिर ,जुनागढ येथील किल्ला ,प्राणिसंग्रहालय,राजकोट ,तसेच नुकत्याच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या "स्टॅच्यु ऑफ युनिटी ,हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वात उंच स्मारक ,सरदार सरोवर,सातपुरा जंगल,नाशिक,पुणे असा 12 जानेवारी ते 16 जानेवारी असा प्रवास करीत" वृक्षलागवड ,पाणी वाचवा "या सारखा संदेश देत दोन हजार सातशे किमीचे अंतर पारकरून आपली गुजरात राज्याची मोहीम पार केली.
तसेच याच ग्रुप चे सदस्य खलील मुलाणी व साईनाथ निकम यांनी आखलेली दुसरी उत्तर भारत दुचाकी भ्रमंती मोहीम दिनांक 21जानेवारी ते 27 जानेवारी या दरम्यान पार पडली यामध्ये खलील मुलाणी व साईनाथ निकम यांनी मध्य प्रदेश मधील अंकाई किल्ला तेथील लेणी ,अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती दरगाह ,राजस्थान मधीन 'पुष्कर' त्यानंतर दिल्ली येथील संसद भवन, राष्ट्रपती भवन, लालकिल्ला, नॅशनल झू पार्क, कुतुबमिनार, जामा मज्जीत, गुरुद्वारा ,मथुरा,आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल या सर्व ठिकाणांना भेट देऊन तेथील प्रत्येक्ष जीवनमान,वेशभूषा,संस्कृती यांची माहिती घेऊन परतीचा मार्ग पकडून ग्वालीयर- झान्सी- इंदोर- मनमाड- शिर्डी- अहमदनगर- बारामती- दहिवडी मार्गे मायणी येथे पोहचले. सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेट देत स्वच्छ भारत सुंदर भारत या अभियानास हातभार लावला एक कदम स्वच्छता की ओर, पेड लगाओ देश बचाओ असा संदेश गावोगावी पोहचवला हा सर्व प्रवास 4100 किमीचा होता.
विशेष म्हणजे या दोन्ही दुचाकी भ्रमंती मोहिमे साठी स्प्लेडर या दुचाकींचा वापर करण्यात आला. गडकिल्ले प्रेमी असणारे हे साहस ट्रेकिंग ग्रुप चे सदस्य सदैव गडकिल्ले मोहीम आखत असतात.याची माहिती देताना खलील मुलाणी या युवकाने असे सांगितले की,आपण जेथे राहतो त्या प्रदेशाची आपणास माहिती असते परंतु आसपास चे प्रदेश , राज्य यांची संस्कृती आणि प्रत्येक विभागाचे एक अनोखे विशिष्ट असे वैशिष्ट्य असते ते फक्त पुस्तकात किंवा टी व्ही वर पाहून अनुभवता येत नाही त्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक्ष जावे लागते .
यावेळी सागर घाडगे यांनी माहिती देताना असे सांगितलेकी, शिवरायांचे विचार त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी घेतलेले कष्ट हे फक्त पुस्तकात पाहून कळणार नाही तर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रानवाटा,गडकिल्ले यांच्या भिंती तटबंदी यांच्या पुढे नतमस्तक होऊनच ते अनभुवता येणार आहे ,व्यसनाधीन होणाऱ्या तरुणाईने आपले तारुण्य स्वतःस घडविण्यास व आपल्या भारत देशातील विविध प्रदेशाना प्रत्येक्ष अनुभवून एक अनोखा भारत घडविण्यास प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.
सदर युवकांचे मायणीसह परिसरात कौतुक केले जात आहेत,यावेळी त्यांचे सपोनि संतोष गोसावी,पत्रकार यासह विविध युवा संघटना यांनी शुभेच्छा दिल्या.