Tags: ghayal pakhara drama, international drama bharat mahotsav, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात जीवन जगताना अन्याय-अत्याचार होऊनही हातात कोणतेही शस्त्र न घेता लेखणी आणि संविधानाचा अस्त्र मानून झटणाऱ्या एका तरुणाच्या सत्यकथेवर आधारित "घायाळ पाखरा' या नाटकाची निवड दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नाट्य भारत महोत्सवात झाली आहे. या नाटकाचा प्रयोग 12 जानेवारी रोजी सादर केला जाणार आहे.
झाडीपट्टीचे नायक, गायक व अभिनेता अनिरुद्ध वनकर लिखित व दिग्दर्शित "घायाळ पाखरा'ची निर्मिती लोकजागृती रंगभूमी वडसाने केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे राहणारा गौतम हा "एम.ए.'पर्यंत शिक्षण झालेला तरुण आहे. त्याच्या नावाचे साधर्म्य साधून एक तोतया तरुण नोकरी हिसकावून घेतो. नक्षल्यांच्या अन्याय-अत्याचारालाही तो बळी पडतो. मात्र, त्यांचा प्रतिकार करण्यासाठी त्याने कधी हातात शस्त्र घेतले नाही. भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही, कायदा आणि लेखणी यांनाच अस्त्र मानून अन्यायाविरुद्ध लढा पुकारतो. व्यवस्थेला बळी पडलेल्या तरुणाला "घायाळ पाखरा' अशी उपमा देत श्री. वनकर यांनी सत्यकथेवर नाटकाचे लेखन केले. झाडीपट्टीतील नाट्य हंगामात या नाटकाचे 148 प्रयोग झाले.
संस्कृती मंत्रालयाच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे आंतरराष्ट्रीय भारत रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यात जर्मन, पोलंड, कॅनडा, लंडन, द. कोरिया, द. आफ्रिका या देशांसह भारतातील अनेक राज्यांतील नाटकाचे प्रयोग भारत रंग नाट्य महोत्सवात होत आहे. 12 जानेवारी 2012 रोजी संगीत नाटक अकादमी नई दिल्ली येथील मेघदूत ऑडिटोरिअम येथे नाट्यप्रयोग सादर होईल.
"घायाळ पाखरा' हे झाडीपट्टीतील गाजलेले नाटक असून, या महोत्सवात विदर्भातून प्रथमच निवड झाली आहे. नाटकात प्रमुख भूमिकेत अनिरुद्ध वनकर, तेजश्री बापट, संजय रामटेके, परमेश्वर पवार, रूपेश परतवाघ, भारत रंगारी, आसावरी तारे, विद्या भागवत, रजनी देशभ्रतार, अनिल ओव्हळ, राम मराठे, बालकलावंत शेषराव जिबकाटे, अरविंद वानखेडे, नितीन गणवीर, अनिल डोंगरे, मोरेश्वर बोरकर यांचा समावेश आहे. नाटकातील संगीत आदेश राऊत, आनंद वाकडे यांनी दिले असून, रंगमंच सजावट राजू सावरकर, आनंद सराटे यांची आहे.