সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 13, 2011

जिल्हापरिषद गिरवते "अध्यादेशा'चे पाठ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 13, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: zp, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - कर्मचारी-अधिकाऱ्यांना शासननिर्णयांची माहिती व्हावी आणि काम करताना अडचणी येऊ नये, यासाठी चंद्रपूर जिल्हापरिषदेने अध्यादेश वाचनाचा आणि विविध विषयांवर प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. राज्यात हा एकमेव आणि पहिला प्रयोग आहे.
विविध कामे आणि योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाद्वारे परिपत्रके काढली जातात. मात्र, बऱ्याच कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना या परिपत्रकांची माहिती नसते किंवा त्याबद्दलचे ज्ञानही नसते. नेमकी हीच बाब हेरून जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी एक उपक्रम सुरू केला. प्रत्येक सोमवारी जिल्हापरिषदेच्या सभागृहात सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्यापुढे नव्या शासन परिपत्रकाचे वाचन केले जाते. याशिवाय वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वक्‍त्यांना आमंत्रित केले जाते. अर्धा तास परिपत्रकाचे वाचन आणि अर्धा तास प्रबोधनात्मक मार्गदर्शन असा एक तासाचा हा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात भर पडत असून, सुरळीत काम करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. राज्यात अशाप्रकारचा उपक्रम राबविणारी ही पहिलीच जिल्हापरिषद आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.