সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 11, 2011

112 वर्षांची शाळा अन्‌ विद्यार्थी बाराच!

Monday, August 02, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: school, student, kothar, chandrapur, vidarbha
अनिल मुंडे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - एका शतकाचा गौरवशाली इतिहास असणाऱ्या येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कधीकाळी या भागातील शिक्षणाचे केंद्र असलेली ही शाळा आता विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहे. यावर्षी तर केवळ 12 विद्यार्थ्यांनीच या शाळेत प्रवेश घेतला आहे.

भारतावर इंग्रजांचे राज्य असताना ही शाळा इंग्रजांनी स्थापन केली. आजमितीस या शाळेला 112 वर्षे पूर्ण झाली आहेत.



मुलांची ही प्राथमिक शाळा जवळपास चाळीस किलोमीटर परिसरातील एकमेव शाळा होती. या शाळेतून शिक्षित झालेले अनेक जण त्याकाळी इंग्रजांच्या सेवेत होते. स्वातंत्र्यानंतर ही शाळा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आली. त्यानंतरही या शाळेत अनेक नामवंतांनी शिक्षण घेतले आहे. यातील काही जण राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेत उच्च पदावर आहे. इंग्रजांनीच बांधलेली शाळेची मजबूत इमारत आजही उभी आहे.



या शाळेत कधी-काळी प्रवेश मिळत नव्हता. विद्यार्थ्यांची संख्या नेहमीच जास्त असायची आहे. मात्र, काळ बदलला आणि इंग्रजी शाळांचे पेव खेड्यापाड्यात पोचले आणि विद्यार्थी संख्येला ओहोटी लागली. यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडे उपाय नव्हता. मागील पाच वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. या शाळेत जिल्हा परिषदेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी विद्यार्थी संख्या दोनशे झालेली नाही. त्यामुळे ही "उच्चश्रेणी' काढून घेण्यात आली. त्यामुळे ही शाळाच आता मुख्याध्यापकाविना झालेली आहे. यावर्षी तर केवळ 12 विद्यार्थी शाळेला मिळाले आहे. त्यामुळे एका शतकाचा गौरवशाली इतिहास असलेल्या या शाळेचे भवितव्यच धोक्‍यात आले आहे. गावातील विद्यार्थी कॉन्व्हेंट आणि आश्रमशाळेकडे वळत आहेत. शाळेतील शिक्षकवर्ग मुख्यालयी राहत नाही. या सर्वांवर नियंत्रण असावे म्हणून ग्रामशिक्षण समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, या समितीचेसुद्धा दुर्लक्ष होत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.