काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, June 01, 2014

गडचिरोली चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारणी घोषित

गडचिरोली चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारणी घोषित

गडचिरोली चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारणी घोषित 

 
अध्यक्षपदी गोपालकृष्ण मांडवकर, सचिवपदी मंगेश खाटिक, संगठकपदी साईनाथ सोनटके, उपध्यक्ष पदी प्रमोद उंदिरवाडे , कोष्याध्यक्षपदी प्रशांत विग्नेश्वर तर सहसचिवपदी श्रीकांत पेशेत्तीवार, कार्यकारणी सदस्यपदी मोहन रायपुरे, मजहर अली, आशिष अबाडे, रमेश काल्लेपेली, जितेंद्र माशारकर यांची सर्वानु मते अविरोध निवड
सर्वस्व हरविले; १३७ कुटुंब आभाळाखाली

सर्वस्व हरविले; १३७ कुटुंब आभाळाखाली



गडचांदूर: निसर्गाच्या प्रकोपाने गडचांदुरला आज शनिवारी जोरदार हादरा दिला. अंबुजा सिमेंट कंपनीमध्ये काम करून आपल्या आयुष्याला आधार देवू पाहणार्‍या गरीबांचे संसार नियतीने आज चुटकीसरशी पायदळी तुडविले.तब्बल १३७ झोपड्यांना गिळून ही आग शमली असली तरी त्यानंतर सुरू झालेला गरीबांचा आक्रोश मात्र न थांबणारा आहे. 
दुपारी ४वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीने अवघ्या काही वेळात सारी वस्ती आपल्या कवेत घेतली. 
आगीचा डोंब उसळला. नागरिक स्वत:चा जीव वाचवित मिळेल त्या वाटेने पळू लागले. महिला आपल्या चिल्यापिल्यांना घेवून घराबाहेर पडल्या. सुदैवाने या दुर्घटनेत प्राणहाणी झाली नसली तरी वित्तहाणी मात्र मोठय़ा प्रमाणावर झाली. 
एकीकडे वस्तीने पेट घेतला असताना घरातील सिलिंडर वाचविण्यासाठी काही लोक शर्तीचे प्रयत्न करीत होते. तर काही लोक याचा गैरफायदा घेत हातात मिळेल ती वस्तू घेवून पळत होते.
या संपूर्ण वस्तीत मजूरांची वास्तव्य आहे. घाम गाळून मिळविलेला पैसा आणि त्यातून तयार केलेले सोन्याचे दागिने या आगीत भस्मसात झाले. आयुष्याची पुंजी नियतीने हिरावली. त्याचे दु:ख काळजात घेवून या वस्तीतील माणसे आता सैरभैर झाली आहे. जगायचे कसे, राहायचे कुठे या यक्ष प्रश्नाने सारेच हादरुन गेले आहे. 
आज दुपारपर्यंत जी वस्ती डौलात उभी होती. ती क्षणार्धात उद्ध्वस्त झाली.

Friday, May 30, 2014

'कॅल्शियम कार्बाईड' ने पिकविले जातात आंबे!

'कॅल्शियम कार्बाईड' ने पिकविले जातात आंबे!



 चंद्रपूर
बाजारातील फळ पिकविण्यासाठी व्यापार्‍यांतर्फे विषारी असलेल्या कॅल्शियम कार्बाईडसारख्या रासायनिक द्रव्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना याबाबत माहिती नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हजारो क्विंटल आंबे रासायनिक द्रव्याचा वापर करून पिकविण्यात आले. ते बाजारात विक्रीसाठी आणल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळताच धाड घालून दोन व्यापार्‍यांकडून ६ हजार किलो आंबे व कॅल्शियम कार्बाईडचे पॅकेट जप्त करण्यात आले. ही कारवाई आज गुरुवार (२९ मे)ला दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने स्थानिक व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. 
सध्या उन्हाळय़ाचे दिवस सुरू असून चंद्रपुरात नवतपाचे चटके सहन करावे लागत आहे. दुसरीकडे रासायनिक द्रव्याचा वापर करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले जात आहे. स्थानिक व्यापार्‍यांकडून उन्हाळय़ात आंबा या फळाचे सर्वाधिक विक्री होते. या पार्श्‍वभूमीवर व्यापार्‍यांनी रासायनिक द्रव्याचा वापर करून आंबे पिकविण्याचा प्रकार सर्रास सुरु केला आहे. हे आंबे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पिकवून शहरातील बाजारपेठेत पुरवठा केला जात होता. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग तहसील कार्यालय व पोलिस प्रशासनाला मिळताच त्यांनी आज दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील शकील अहमद अब्दुल हमीद यांच्या शकील ग्रृप कंपनी नावाच्या दुकानात धाड टाकली. येथे जवळपास ३ हजार किलो आंबे कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकविण्यासाठी ठेवले होते. अधिकार्‍यांनी सर्व आंबे व आठ किलो कॅल्शियम कार्बाईडचे पॅकेट जप्त केले. याची किंमत जवळपास ४९ हजार ९७0 रु. आहे. यासोबतच याच परिसरातील अब्दुल मजिद अब्दुल अजित यांच्या दुकानावरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे एस.पी. नंदनवार, जी.टी. सातकर, एम.पी. चहांदे, एस.बी. हजारे, विठ्ठल अंदनकर, पोलिस निरीक्षक खराबे, मंगेश काळे, अरुण मोते, दौलत चालखुरे, अविनाश तुराणकर यांनी केली. ल्ल
गर्भपातासाठी लाच घेणार्‍या डॉ. उईकेंना अटक

गर्भपातासाठी लाच घेणार्‍या डॉ. उईकेंना अटक


चिमूर
येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन उईके (३८) यांनी रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या एका महिलेकडून गर्भपात करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारी रंगेहात पकडले. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
तालुक्यातील खंडाळा येथील एक महिला लहान मुल असतानाच पुन्हा गर्भवती राहिली. त्यामुळे तिला गर्भपात करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे भरती करण्यात आले. तेव्हा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. उईके यांनी २ हजार रुपयाची लाच मागीतली. ही बाब तिच्या पतीला न पटल्याने त्यांनी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक साखरकर, प्रताप इंगळे, पोलिस काँस्टेबल विलास खनके, संतोष पुंडकर, अजय यादव, उत्तम दास यांच्या पथकाने आज गुरुवार (२९ मे)ला सकाळपासूनच ग्रामीण रुग्णालयात सापळा रचला. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. उईके यांनी पीडित महिलेच्या पतीकडून गर्भपात करण्याकरिता २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 
या प्रकरणी पोलिस स्टेशन चिमूर येथे लाचलुचपत अधिनियम प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ७, १३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डॉ. नितीन उईके यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी चिमूर शहरात स्त्रीभृणहत्या प्रकरणी एका खासगी डॉक्टरांचे रुग्णालय सिल करण्यात आले होते. त्यांच्या दवाखान्यातून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले होते. या घटनेचा सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला असताना पुन्हा ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात आग

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात आग


चंद्रपूर
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील सहाव्या संचात कोल कन्व्हेअर बेल्टला आग लागली. या आगीने सुमारे ६ लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीमुळे औष्ण्कि केंद्रातील संच क्रमांक ५ व ६ मधील उत्पादन ठप्प झाले आहे. 
चंद्रपूर वीज केंद्रात आज गुरुवारी दुपारी २ वाजता सहाव्या संचातील बंकरपर्यंत वाहून नेणार्‍या कोल कन्व्हेअर बेल्टला अचानक आग लागली. मात्र, वीज केंद्रातील फायरिंग लाईननेच ही आग आटोक्यात आणण्यात आली. अध्र्या तासात पूर्णपणे नियंत्रणात आलेल्या या आगीत १00 मीटरचा बेल्ट पूर्णपणे जळून खाक झाला. अभियंते, तज्ज्ञांच्या तत्परतेने मात्र मोठी हानी टळली. ही आग अती उष्णतेमुळे लागल्याचा कयास बांधला जात आहे. जळलेला कन्व्हेअर बेल्टची दुरुस्ती येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. या आगीने सुमारे ६ लाखांची हानी झाली असून, वीज निर्मितीत घट झाली आहे. आगीमुळे सर्वत्र धूर दिसून येत होता. दोन दिवसांपूर्वी ५00 मेगावॅट क्षमतेचे युनिट नंबर ५ सुरू झाले होते. जवळपास वीस दिवसापूर्वी युनिट नंबर ३ च्या टरबाईनमध्ये आग लागल्याने हे युनिट बंद ठेवण्यात आले.चालू आठवड्यात सर्व युनिट सुरळीत सुरू होत असतानाच आज पुन्हा आग लागल्याने दोन संच बंद पडून उत्पादनात घट झाली आहे. ल्ल

Tuesday, May 27, 2014

 प्रवासी कराबाबत लवकरच निर्णय- उपमुख्यमंत्री

प्रवासी कराबाबत लवकरच निर्णय- उपमुख्यमंत्री

ए स.टी.महामंडळावरील आर्थिक ताण कमी करणार : अजित पवार 

मुंबई :, (२७ मे, २०१४) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावरील (एस.टी.) आर्थिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने प्रवासी करासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल; तसेच एस.टी. बसेसना पथकरातून वगळण्याबाबत सर्व संबंधितांची लवकरच बैठक घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

नरेगाची नव्याने आखणी करावी

नरेगाची नव्याने आखणी करावी

एकनाथराव खडसे यांची केंद्रीय ग्रामविकासमंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली, दि. 27 :- नरेगा योजनेत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यायोजनेचा ग्रामीण भागातील जनतेला प्रत्यक्ष फायदा व्हावा म्हणून नरेगाचा पुनर्विचारकरुन नव्याने आखणी करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचेज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडेकेली. 
चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक योजनांसाठी 97 टक्के खर्च

चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक योजनांसाठी 97 टक्के खर्च

- पालकमंत्री संजय देवतळे

चंद्रपूर : जिल्हा वार्षिक योजना 2013-14 च्या खर्चास आज जिल्हा नियोजन समितीने मंजूरी प्रदान केली. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, ओटीएसपी व अनुसूचित जाती उपयोजना या चारही योजना मिळवून मार्च 2014 अखेर 97 टक्के खर्च झाला. पावसाळ्यापूर्वी गावपातळीवर ग्राम पंचायततर्फे नाल्यांची त्वरीत सफाई करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय देवतळे यांनी संबंधीत यंत्रणेला दिले.

Monday, May 26, 2014

पदांसाठी भरती

पदांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत क्लार्क तब्बल 5199 पदांसाठी भरती होणार आहे. 2014-15 साठी ही भरती असेल. देशातल्या एसबीआयच्या अनेक शाखांमध्ये लिपीकाची जागा रिक्त होत असल्यानं नवी भरती करण्यात येतेय. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जून 2014 ही आहे.
पाचगांवातील दारू दुकानांना लागले सिल

पाचगांवातील दारू दुकानांना लागले सिल

महिलांच्या प्रयत्नांना यश
ब्रम्हपुरी - तालुक्यातील पाचगांव येथील दोन बियर बार बंद करण्याचा ठराव महिला ग्रामसभेत एकमताने पारीत झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार दुकानांना सिल ठोकुन बंद करण्यात आले.
ब्रम्हपुरी तालुक्यातील पाचगांव छोटयाशा गावात प्रथमेश व विनायका हे दोन बियर बार आरमोरी येथील दिलीप जेठमल मोटवानी व प्रशांत मनोहर मोटवानी यांचे मालकीची होती. या बारमुळे गावातील अनेक संसार दध्वस्त झाले, अनेक युवक दारूच्या व्यसनी लागले, महीलांच्या छेडखानीचे प्रकार वाढले, ब्रम्हपुरी ते गडचिरोली हा महामार्ग असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असे असतांनाही मोटवानी यांनी नविन देशी दारू दुकान सुरू करण्याकरीता हालचाली सुरू केल्या. काही महीण्यापुर्वी महीलांनीच ग्रामसभेत नविन देशी दारू दुकानास परवानगी नाकारली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानाचे माध्यमातुन दोन्ही दारू दुकान बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क यांचेकडे केली. या मागणीकरीता श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी व येथील सरपंच अरूण तिवाडे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला त्यानुसार त्यानुसार संवर्ग विकास अधिकारी सानप यांचे अध्यक्षतेखाली 17 मे 2014 ला ग्रामपंचायतीचे आवारात महीला ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत एकुण 145 महिला मतदारापैकी 104 महिलांनी 145 विरूध्द शुन्य मतांनी दारूबंदीचे बाजुन कौल दिला. यामुळे एकमताने दारूबंदीचा ठराव पारीत केला. ठराव पारीत झाल्यानंतरही महिला थांबल्या नाही व जिल्हाधिकारी यांना आदेश भेटुन आदेश काढण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी म्हैसेकर यांनी आदेश काढुन प्रथमेश व विनायका या दोन्ही बारला सिल ठोकले.

Sunday, May 25, 2014

काँग्रेस नेते बापू तलांडी यांची हत्या

काँग्रेस नेते बापू तलांडी यांची हत्या

गडचिरोलीतील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेस नेते बापू तलांडी यांची रविवारी सकाळी हत्या करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनीच ही हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज असून याविषीय अद्याप पोलिसांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
आलापल्ली सिरोंचा मार्गावरील निर्मल गुडम येथे सकाळी ८ वाजता ही घटना घडली. येथील एक काँग्रेस कार्यकर्ता मोटर सायकलवरून जात असताना नक्षलवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार करत त्याची हत्या केली आहे. या कार्यकर्त्याबद्दल आणखी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.  
गडचिरोलीतील निमलगुडा या गावात राहणा-या बापू तलांडी यांना रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गाठले. यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर निमलगुडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Saturday, May 24, 2014

पद भरती

पद भरती

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर - पद भरती 2014

लिपिक-टंकलेखक पदासाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31-May-2014 आहे. या मुदती नंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेत रोखीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी प्रिंट झालेल्या अधिकृत चलनाचाच वापर करावा. बँकेत चलान भरून आल्यानंतरच कृपया सविस्तर अर्ज भरावा.