সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, May 30, 2014

गर्भपातासाठी लाच घेणार्‍या डॉ. उईकेंना अटक


चिमूर
येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन उईके (३८) यांनी रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या एका महिलेकडून गर्भपात करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारी रंगेहात पकडले. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
तालुक्यातील खंडाळा येथील एक महिला लहान मुल असतानाच पुन्हा गर्भवती राहिली. त्यामुळे तिला गर्भपात करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे भरती करण्यात आले. तेव्हा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. उईके यांनी २ हजार रुपयाची लाच मागीतली. ही बाब तिच्या पतीला न पटल्याने त्यांनी नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक साखरकर, प्रताप इंगळे, पोलिस काँस्टेबल विलास खनके, संतोष पुंडकर, अजय यादव, उत्तम दास यांच्या पथकाने आज गुरुवार (२९ मे)ला सकाळपासूनच ग्रामीण रुग्णालयात सापळा रचला. दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. उईके यांनी पीडित महिलेच्या पतीकडून गर्भपात करण्याकरिता २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 
या प्रकरणी पोलिस स्टेशन चिमूर येथे लाचलुचपत अधिनियम प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ७, १३ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी डॉ. नितीन उईके यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी चिमूर शहरात स्त्रीभृणहत्या प्रकरणी एका खासगी डॉक्टरांचे रुग्णालय सिल करण्यात आले होते. त्यांच्या दवाखान्यातून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले होते. या घटनेचा सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला असताना पुन्हा ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.