काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, March 14, 2014

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी




गोंदिया : जिल्ह्यातील गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने आज केली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील डोंगरगाव व बोंडगाव देवी या गावांचा दौरा करुन केंद्रीय पथकाने बाधित शेती व घरांची प्रत्यक्ष पाहणी केली व झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

या केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयातील दुग्धविकास, पशुसंवर्धन आणि मत्स्यविकास विभागाचे उपायुक्त आर.के. गुप्ता, भारतीय कृषी संशोधन मंडळाचे प्रधान संशोधक डॉ. आर.बी. सिंगनधुपे होते. त्यांच्या समवेत वखार महामंडळाचे सहायक व्यवस्थापक व्ही.जी. खोब्रागडे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे दौऱ्यात सहभागी होते.

या पथकाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे भेट दिली. डोंगरगाव येथील 25 हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. डोंगरगाव येथील शेतकरी श्री. खंडाईत यांच्या 5 एकरमधील टरबूज पिकाची, 2 एकरमधील गहू व 1 एकरमधील भाजीपाला व इतर पिकांची पाहणी पथकाने केली. बोंडगाव देवी येथील नुकसानग्रस्त शेतकरी कुसन झोळे यांच्या 5 एकरमधील टरबूज, 3 एकरमधील गहू व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती पथकाने घेतली. तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या बाळकृष्ण मानकर, हरिभाऊ पर्वते, ऋषी बनकर यांच्या घरांची पाहणीही त्यांनी केली.

प्रत्यक्ष भेटीमध्ये पथकाने गारपिटीमुळे शेताची, घरांची व जनावरांच्या झालेल्या हानीबाबत संबंधितांशी चर्चा केली. यावेळी सहाय्यक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सहारे, अर्जुनी मोरगाव तहसिलदार संतोष महाले आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 101 कोटींचे वाटप

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 101 कोटींचे वाटप

शुक्रवार, १४ मार्च, २०१४


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात जून, जुलै 2013 मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे 50 टक्के पेक्षा अधिक शेतपिकाचे नुकसान झालेल्या 2 लाख 984 शेतकऱ्यांना 101 कोटी 1 लाख 42 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक संबंधित तहसिलदार यांचेकडे दिले नसतील त्यांनी 25 मार्च 2014 पर्यंत आपले बँक खाते क्रमांक संबंधित तहसिलदाराकडे द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

दि. 13 मार्च 2014 अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या मदतीची तालुकानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. चंद्रपूर 9876 शेतकऱ्यांना 663 लाख, बल्लारपूर 6091 शेतकऱ्यांना 333.66 लाख, गोंडपिंपरी 12871 शेतकऱ्यांना 823.26 लाख, पोंभूर्णा 10142 शेतकऱ्यांना 532 लाख, मूल 13607 शेतकऱ्यांना 429 लाख, सावली 19708 शेतकऱ्यांना 302.43 लाख, वरोरा 28054 शेतकऱ्यांना 1962 लाख, भद्रावती 17884 शेतकऱ्यांना 1260 लाख, चिमूर 19156 शेतकऱ्यांना 894 लाख, ब्रम्हपूरी 23499 शेतकऱ्यांना 840.54 लाख, सिंदेवाही 2989 शेतकऱ्यांना 60.34 लाख, नागभिड 3642 शेतकऱ्यांना 77.45 लाख, राजूरा 18410 शेतकऱ्यांना 938 लाख, कोरपना 10274 शेतकऱ्यांना 645.16 लाख व जिवती 4819 शेतकऱ्यांना 337.58 लाख असे एकूण 2 लाख 984 शेतकऱ्यांना 101 कोटी 1 लाख 42 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून वाटप करण्यात आले.

ज्या शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक 25 मार्च 2014 पर्यंत दिले नाही अशांचे बँक खाते नंतर स्विकारले जाणार नाही. त्यामुळे मदत मिळण्यापासून संबंधित शेतकरी वंचित राहील याची नोंद घ्यावी, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ग्राहक दिन

ग्राहक दिन

१५ मार्च, जागतिक ग्राहक हक्क दिन! या दिनाचे महत्त्व म्हणजे ग्राहकाला त्याचे ‘अस्तित्वङ्क दाखवून देणारा हा दिवस, तसेच त्याला ‘ग्राहकङ्क म्हणून असणाèया ‘हक्कांचीङ्क जाणीव करून देणारा हा दिवस! याची सुरुवात अशी झाली की, १९६२ साली जेव्हा जॉन. एफ्.केनेडी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीस उभे होते तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराचे वेळी त्यांनी जनतेला म्हटले की, ‘मला जर तुम्ही निवडून दिलेत तर ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करेन. आणि जेव्हा ते निवडून आले तेव्हा खरंच त्यांनी काँग्रेसच्या सीनेटमधील पहिल्या भाषणात ग्राहकांना चार हक्क प्रदान केल्याचे जाहीर केले. ते हक्क म्हणजे १) माहिती मिळविण्याचा हक्क २) निवडीचा हक्क ३) सुरक्षिततेचा हक्क ४) ‘ग्राहकङ्क म्हणून आपले म्हणणे ऐकून घेतले जाण्याचा हक्क आणि हा दिवस होता १५ मार्च. या चार हक्कात नंतर १९८५
साली ‘कंझ्युर इंटरनॅशनलङ्क या जागतिक स्तरावर काम करणाèया संस्थेने आणखी चार हक्कांची भर घातली ते हक्क म्हणजे - १) मुलभूत गरजा पुरविल्या जाण्याचा हक्क २) तक्रार निवारणाचा हक्क ३) आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क आणि ४) ग्राहक शिक्षणाचा हक्क!
अमेरिकेतील ग्राहकही ‘राजाङ्क होण्यामागचे कारण हे की तिथले लोक प्रदान केलेल्या या हक्कांचा वस्तू आणि सेवांच्या देवघेव व्यवहारात पुरेपूर उपयोग करून घेण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात. तेथील बाजारावर ग्राहकांचाच कसा वचक आहे याचा अनुभव आपल्याला तेव्हा येतो जेव्हा आपण तिकडच्या मॉलमधे खरेदी केलेली एखादी वस्तू काही कारण न सांगता, फक्त खरेदीची पावती दाखवून महिना-दोन महिन्याने सुद्धा ती परत करून आपले पैसे परत मिळवतो.
२४ डिसेंबर १९८६ साली भारतात या ग्राहक हक्कांचे संरक्षण करणारा ‘ग्राहक संरक्षण कायदाङ्क अस्तित्वात आला. यातील तरतुदीनुसार ग्राहकांना न्याय मिळावा, त्यांच्या पैशाचे मोल त्यांना खात्रीने मिळावे म्हणून १९८९ पासून अगदी जिल्हा पातळीपासून राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत ग्राहक न्यायालयांची स्थापनाही झाली आहे. त्यामुळे आपल्यावर होणाèया अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचे एक शस्त्रही आज ग्राहकांना हक्कांबरोबर मिळाले आहे. महाराष्ट्रातच आज एकूण ४० जिल्हामंच कार्यरत आहेत. गेल्या ३०-३२ वर्षात ग्राहकांध्येही थोडी प्रगती झालेली आहे हे आज एकूणच येणाèया तक्रारींवरून आणि त्यांच्या प्रकारांवरून लक्षात येते. परंतु तरीसुद्धा असं वाटतं की आपण अजूनही अमेरिकेच्या फार मागे आहोत. आपलं काही बिनसलं, टीव्ही, वॉqशग मशीन वगैरे बंद पडलं की आपल्याकडचा ग्राहक जागा होतो आणि मग त्याला आपले हक्क आठवतात आणि टीव्ही, मशीन वगैरेंच्या दुरुस्तीसाठी त्याची धावाधाव होते. खरेदी करताना पावती घेतली की नाही हे तो आठवू लागतो, हमी काळात टीव्ही बिघडला का हा विचार करतो. मग त्या डीलरशी झटापट, १०-१२ फोन, त्याच्या दुकानात १२-१५ खेपा, पत्रांचा पाऊस वगैरे गोष्ट करण्यात त्याचा वेळ, पैसा आणि शक्ती वाया घालवतो. तरीही नाहीच जमलं तर ‘ग्राहक न्यायालयङ्क कुठे आहे इथपासून त्याला तयारी करावी लागते.
२०व्या शतकात हा ग्राहक अगदीच अनभिज्ञ होता पण आता निदान तक्रार निवारणाच्या हक्काची तरी जाणीव त्याला झाली असल्याचे चित्र दिसते. पण आज २१व्या शतकात वस्तु-सेवा खरेदी करतानाच आपल्या हक्कांची जाणीव त्या ग्राहकाला असणे इतकेच नव्हे तर ती जाणीव त्याने दुकानदाराला, पर्यायाने उत्पादित कंपनीला करून देणे अपेक्षित आहे.
एवढेच नव्हे, तर ग्राहकाला मिळालेल्या हक्कांची या वस्तु आणि सेवा देणाèया उत्पादकांना आणि संस्थांना एवढी जरब बसली पाहिजे की वरील प्रसंग येताच कामा नयेत आणि जरी चुकून आलेच तर ताबडतोब ग्राहकांच्या तक्रारींचं निराकरण होणे आवश्यक आहे. तरच ग्राहक थोडा जागृत झाला आहे. ग्राहक शिक्षणाचा त्याच्यावर थोडातरी परिणाम झाला आहे असं म्हणता येईल.माणूस हा जन्माच्या आधीपासून ते मृत्यूनंतरही ‘ग्राहकङ्कच असतो. मग तो वस्तु-उत्पादक असो qकवा सेवा-चालक असो! पण हे वास्तव या दोघांनाही उमगेल तर ना! याविषयी सर्वसामान्यांना जागरुक करण्याच्या हेतुने १९८४ सालापासून मुंबई ग्राहक पंचायतीच्या अनेक कार्यकत्र्यांनी दर आठवड्याला लेख लिहिण्याचा प्रघात सुरू केला आणि अशी सलग २० वर्षे त्यांनी लेखन केले. या सदरांची जबाबदारी मुख्यत: माझ्यावर असल्याने मला जास्त वेळा लेखन करावं लागलं आणि मी ते केलं! त्यातूनच मैत्रेय प्रकाशनाने प्रकाशित केलेलं माझं ग्राहकराजा, जागा हो! हे पुस्तक आकाराला आलं
 पुस्तकात सर्व लेख घेणे शक्य नसल्याने काही लेखांचाच संग्रह तयार केला आहे. त्यात ग्राहकांना रोजच्या
व्यवहारात उपयुक्त ठरणारे अनेक विषय घेतले आहेत. बाजारात वस्तु-सेवा खरेदी करताना काय काळजी घ्यावी, एखाद्या इस्तितळात जायची वेळ आल्यास ग्राहक म्हणून तुचे हक्क आणि सेवा देणाèया डॉक्टर, हॉस्पिटलच्या काय
जबाबदाèया आहेत, ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांचे कसे संरक्षण करतो, कोणतीही मोठी, टिकावू वस्तु खरेदी करताना कोणता तपशील पाहावा. सहलीला जातानाचे आपले हक्क लक्षात ठेवून सेवाचालकांवर नियंत्रण कसे ठेवावे, बँकांबाबत आपले हक्क संरक्षित कसे ठेवावेत, तसेच बँकींग लोकपाल, लोकायुक्त कायदा आणि ग्राहक वीज कायदा अशा काही कायद्यांचीही थोडक्यात माहिती पुस्तकात दिली आहे. तसेच सोन्या-चांदीच्या बाबतीत आपली किती आणि कशी फसगत होते, ती कशी टाळता येईल हे ही सांगितले आहे. प्रत्येक ग्राहकाला या पुस्तकातून काही ना काही उपयुक्त माहिती मिळते. नुकतीच या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यावरुन या पुस्तकाची उपयुक्तता कुणाच्याही लक्षात यावी.
आजच्या ग्राहकापुढे आज अनेक आव्हाने आहेत. वस्तुंच्या नव्या नव्या प्रकाराुंळे आणि या ई-सेवाुंळे (इलेक्ट्रॉनिक) कालचा ग्राहक आजही तितकाच गोंधळलेला दिसतो. आज बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या वाहनांची रेलचेल आहे. एकाच वस्तुच्या निर्मितीसाठी कंपन्याही अनेक आहेत. पुर्नघरबांधणीचे वारेही जोरदार वाहात आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही मोबाईल, आयपॅडसारख्या वस्तुंचा सुळसुळाट इतका झाला आहे की आपल्याकडे ह्या वस्तु हव्याच अशी मानसिकता ग्राहकांची झाली आहे पण अशा वेळेस ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांचा उपयोग करण्याची फार मोठ्ठी जबाबदारी ग्राहकावर आहे आणि ही वाहनं, घराची पुर्नबांधणी, इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या बाबतीत तरी आपल्या हक्कांचा योग्य तो उपयोग त्या वस्तु-सेवा खरेदी करण्यापूर्वीपासूनच करणे हिताचे ठरेल. ‘बघू नंतरङ्क अशी बेपर्वा वृत्ती दाखवून चालणार नाही कारण ते सर्वच दृष्टींनी (वेळ-पैसा-शक्ती) फारच महागात पडेल. म्हणून मला असं वाटतं, आजच्या १५ मार्चच्या ‘ग्राहक हक्क दिनाङ्क निमित्ताने ‘आम्ही वस्तु-सेवा खरेदी करण्यापासूनच सर्व हक्कांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची जबाबदारी पार पाडूङ्क ही खूणगाठ प्रत्येक ग्राहकाने मनाशी बांधली तरी आजचा दिवस खèया अर्थाने साजरा झाल्याचे समाधान वाटेल! मार्गदर्शक म्हणून ‘ग्राहकराजा, जागा हो!ङ्क हे पुस्तक तर
सोबतीला आहेच.
-सौ. वनमाला मंजुरे
माजी सदस्य ग्राहक न्यायालय
मोबाईल - ९८२१७०७१४०
५०२, वरलक्ष्मी हौqसग सोसायटी,

२२, हनुान रोड, पंजाब नॅशनल बँकेशेजारी,
हेडगेवार मैदानासमोर, विलेपार्ले (पू.),
मुंबई- ४०००५७

Sunday, March 09, 2014

दारु पिऊन मतदान केंद्रात येणा-या  दोन केंद्र अधिका-यावर गुन्हा दाखल

दारु पिऊन मतदान केंद्रात येणा-या दोन केंद्र अधिका-यावर गुन्हा दाखल


मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्हाधिका-यांची धडक कारवाईबल्लारपूर मुख्याधिका-यास कारणे दाखवा नोटीस
 चंद्रपूर-09- मतदार नोंदणी विशेष कार्यक्रमादरम्यान बल्लारपूर येथील दोन मतदान केंद्रावर दारु पिऊन आलेल्या मतदान केंद्र अधिका-यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले.  तसेच बल्लारपूर येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ पूर्व परवानगी न घेता मुख्यालयी अनुपस्थित राहिल्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल करुन शिस्तभंगाची कारवाई  का करु नये असे नोटीस जिल्हाधिका-यांनी त्यांना बजावली. 
    भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवार 9 मार्च 2014 रोजी जिल्हाभरात मतदार नाव नोंदणी विशेष कार्यक्रम राबविण्यात आला.  जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी बल्लारपूर येथील काही केंद्राना अचानक भेटी देवून मतदार नोंदणी कार्यक्रमाची तपासणी केली.  या दरम्यान जनता हायस्कुल डेपो साईबाबा वार्ड बल्लारपूर येथील केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी जगदिश कांबडे व 215 जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील मतदान केंद्र अधिकारी अतुल दुधलकर हे दारु पिऊन मतदान केंद्रात आल्याची माहिती मिळताच जिल्हाधिका-यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.  त्यानुसार बल्लारपूर पोलीसांनी गुन्हे दाखल केले.
     थापर हाऊस येथील मतदान केंद्राची तपासणी करतांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी भरुन देणा-या नमुना अर्ज क्रमांक सहा सोबत जोडलेल्या को-या रहिवाशी प्रमाणपत्रावर नगरसेवकाची स्वाक्षरी व शिक्का होता मात्र ज्यांना दाखला दिला त्याचे नाव दाखल्यावर नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देशनास आले.  यावरुन थॉपर हाऊस येथील मतदान केंद्र अधिकारी रमेश पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.  सदर दाखला जप्त करुन चौकशी करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले. 
     जनता हायस्कुल डेपो येथील केद्र अधिकारी जगदिश कांबडे व जनता विद्यालय येथील केंद्र अधिकारी अतुल दुधलकर हे दारु पिऊन केंद्रात आल्याची माहिती तहसिलदार बी.डी.टेळे यांनी जिल्हाधिका-यांना दिली.  यावर दोन्ही केंद्र अधिका-यांची वैद्यकीय तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश म्हैसेकर यांनी दिले.  यावरुन दोन्ही केंद्र अधिका-यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसिलदार बी.डी.टेळे यांनी दिली.
 बल्लारपूर नगर परिषेदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ हे मुख्यालयी हजर नसल्याचे    जिल्हाधिका-यांचे निर्देशनास येताच निवडणूक कामामध्ये हयगय केल्याने आपल्यावर गुन्हा दाखल करुन शिस्तभंगाची कारवाई का करु नये अशी नोटीस वाहुरवाघ यांना बजावण्यात आली.  दरम्यान जिल्हाधिका-यांनी दुरध्वनीवरुन वाहुरवाघ यांची चांगली कान उघाडणी केली.  कोणाच्या परवानगीने मुख्यालय सोडले हे लेखी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  सोमवारी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष भेटून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश वाहुरवाघ यांना दिले. 
     मतदार शिक्षण व सहभागाच्या पध्दतशिर कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणीस नवयुवक व महिलांनी भरघोष प्रतिसाद दिला.  मतदार यादीत नाव असल्याची खात्री करुन घेणे व त्यानंतर अर्ज नमुना सहा भरुन देण्यासाठी सर्वच केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती.  जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी चंद्रपूर, बल्लारपूर व राजूरा तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.  यावेळी त्यांचेसोबत बल्लारपूर तहसिलदार बी.डी.टेळे हे होते.

Wednesday, March 05, 2014

मतदारसंघ आणि संभाव्य उमेदवार

मतदारसंघ आणि संभाव्य उमेदवार

चंद्रपूर लोकसभा
हंसराज अहिर, भाजप विरूद्ध वामनराव चटप, आप विरूद्ध संजय देवतळे (शक्यता) काँग्रेस

गडचिरोली लोकसभा मतदारसंघ
अशोक नेते, भाजप विरूद्ध मारोतराव कोवासे, काँग्रेस

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ
प्रतापराव जाधव, शिवसेना विरुद्ध कृष्णराव इंगळे, राष्ट्रवादी

अमरावती लोकसभा मतदारसंघ
आनंदराव अडसूळ, शिवसेना विरुद्ध नवनीत कौर, राष्ट्रवादी

रामटेक लोकसभा मतदारसंघ
मुकुल वासनिक,काँग्रेस (शक्यता) विरुद्ध कृपाल तुमाने, शिवसेना

नागपूर लोकसभा मतदारसंघ
नितीन गडकरी, भाजप विरूद्ध अंजली दमानिया, आप विरूद्ध विलास मुत्तेमवार, काँग्रेस

भंडारा लोकसभा मतदारसंघ
प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी विरूद्ध प्रशांत मिश्रा,आप विरूद्ध नाना पटोले, भाजप


यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
भावना गवळी, शिवसेना विरूद्ध काँग्रेस निश्चित नाही

हिंगोली लोकसभा मतदारसंघ
सुभाष वानखेडे, शिवसेना विरूद्ध सूर्यकांता पाटील (शक्यता) राष्ट्रवादी विरूद्ध राजीव सातव (शक्यता) काँग्रेस

नांदेड लोकसभा मतदारसंघ
डी. बी. पाटील, भाजप विरूद्ध (उमेदवार निश्चित नाही) काँग्रेस

शिरूर लोकसभा मतदारसंघ
शिवाजीराव आढळराव, शिवसेना विरूद्ध देवदत्त निकम, राष्ट्रवादी

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
दिलीप गांधी, भाजप विरूद्ध राजीव राजळे,राष्ट्रवादी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
धनंजय महाडिक,राष्ट्रवादी विरूद्ध संजय मंडलिक(शक्यता) शिवसेना

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
राजू शेट्टी, स्वा. शेतकरी सं. विरूद्ध कलाप्पा आवाडे (शक्यता) काँग्रेस विरूद्ध जयंत पाटील (शक्यता) राष्ट्रवादी

सांगली लोकसभा मतदारसंघ
संजयकाका पाटील, भाजप विरूद्ध प्रतीक पाटील (शक्यता) काँग्रेस

बारामती लोकसभा मतदारसंघ
सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी विरूद्ध महादेव जानकर, महायुती

सातारा लोकसभा मतदारसंघ
उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी विरुद्ध रिपाइं (उमेदवार निश्चित नाही)

माढा लोकसभा मतदारसंघ
विजयसिंह मोहिते, राष्ट्रवादी विरूद्ध प्रतापसिंह मोहिते(शक्यता) विरुद्ध सदाभाऊ खोत महायुती

पुणे लोकसभा मतदारसंघ
(उमेदवार निश्चित नाही) काँग्रेस विरूद्ध (उमेदवार निश्चित नाही), भाजप

शिर्डी लोकसभा मतदारसंघ
भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेस विरूद्ध (उमेदवार निश्चित नाही) , शिवसेना

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ
पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादी विरूद्ध (उमेदवार निश्चित नाही) , महायुती

बीड लोकसभा मतदारसंघ
गोपीनाथ मुंडे, भाजप विरूद्ध नंदू माधव, आप विरूद्ध सुरेश धस, राष्ट्रवादी

परभणी लोकसभा मतदारसंघ
संजय जाधव,शिवसेना विरूद्ध विजय भांबळे, राष्ट्रवादी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ
विनायक राऊत, शिवसेना विरूद्ध निलेश राणे (शक्यता) काँग्रेस

उत्तर-पूर्व मुंबई
संजय दिना पाटील, राष्ट्रवादी विरूद्ध किरीट सोमय्या, भाजप विरूद्ध मेधा पाटकर,आप

दक्षिण मुंबई
अरविंद सावंत,शिवसेना मीरा सन्याल, आप, मिलिंद देवरा (शक्यता) ,काँग्रेस

दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे, शिवसेना विरूद्ध एकनाथ गायकवाड (शक्यता),काँग्रेस विरूद्ध आदित्य शिरोडकर (शक्यता),मनसे

उत्तर मुंबई
गोपाळ शेट्टी, भाजप विरूद्ध निश्चित नाही,मनसे विरूद्ध संजय निरुपम ? काँग्रेस

वायव्य मुंबई
गजानन कीर्तीकर, शिवसेना विरूद्ध गुरुदास कामत(शक्यता), काँग्रेस विरूद्ध मयांक गांधी,आप

उत्तर-मध्य मुंबई
निश्चित नाही, भाजप विरूद्ध प्रिया दत्त ? काँग्रेस

कल्याण
आनंद परांजपे, राष्ट्रवादी विरूद्ध डॉ.श्रीकांत शिंदे शिवसेना विरूद्ध उमेदवार कोण? मनसे

ठाणे
राजन विचारे, शिवसेना विरूद्ध संजीव नाईक, राष्ट्रवादी विरूद्ध संजीव साने,आप

पालघर
चिंतामण वनगा, भाजप विरूद्ध निश्चित नाही काँग्रेस

रायगड
अनंत गिते शिवसेना विरूद्ध सुनील तटकरे (शक्यता) राष्ट्रवादी

औरंगाबाद
चंद्रकांत खैरे, शिवसेना विरूद्ध सुभाष लोमटे आप विरूद्ध उमेदवार कोण?, काँग्रेस

जालना
रावसाहेब दानवे,भाजप विरूद्ध दिलीप म्हस्के, आप विरूद्ध उमेदवार कोण?काँग्रेस की एनसीपी?

धुळे
सुभाष भामरे, भाजप विरूद्ध अमरीश पटेल(शक्यता) काँग्रेस

जळगाव
ए टी पाटील, भाजप विरूद्ध सतीश पाटील, राष्ट्रवादी

रावेर
हरिभाऊ जावळे, भाजप विरूद्ध मनीष जैन, राष्ट्रवादी

नंदूरबार
माणिकराव गावित, काँग्रेस विरूद्ध निश्चित नाही, भाजप

नाशिक
छगन भुजबळ राष्ट्रवादी विरूद्ध विजय पांढरे आप विरूद्ध हेमंत गोडसे,शिवसेना

दिंडोरी
हरिश्चंद्र चव्हाण, भाजप विरूद्ध डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी
७५ महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय

७५ महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय

नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने बंदी घातलेल्या २५० महाविद्यालयांपैकी ७८ महाविद्यालयवरील बंदी मागे आज मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. तर ७५ महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतला आहे -
 सामना पेपरची होळी

सामना पेपरची होळी

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमध्ये भाजपच्या नितीन गडकरींवर टीका करण्यात आली होती.गडकरींवरील याच टीकेवर पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर चौकात सामना पेपरची होळी करून निषेध व्यक्त केला आहे.
 चला उरकुया भूमीपूजन

चला उरकुया भूमीपूजन

लोकसभेची निवडणूक निवडणूक आयोगातर्फे जाहीर झाल्यास आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी विकासकामे करीत असल्याचा आव आणून उद्घाटन व भूमिपूजन समारंभ करीत आहेत
मा. खा. हंसराज भैय्या अहीर यांचा भद्रावती तालुक्यातील विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ, तर कांग्रेस ने सहकार मेळावा आयोजित केला. संजय देवतळे यांच्या प्रचाराचा नारळ असल्याचे बोलले जात आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी भूमिपूजन, भद्रावती येथील मल्हारीबाबा सोसायटी येथे नवीन सुपर बस थांब्याचे उद््घाटन ■ खुले रंगमंच लोकार्पण, ग्रा.पं. भवन, शाळेची संरक्षण भिंत भूमिपूजन, धामणी येथे काँक्रीट रोड व पाणी योजना- लोकार्पण करून नागरिकांना एकप्रकारे पुढील पाच वर्षासाठी आश्वस्त करण्याचा प्रकार आहे.


जिल्ह्यात अतिदुर्गम, आदिवासी भाग म्हणून कोरपना तालुक्याकडे बघितले जाते. या तालुक्याचा विकास अद्यापही पाहिजे तसा झाला नाही. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित होती. विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून खा. हंसराज अहिर यांनी स्थानिक विकास निधीतून सिमेंट रस्त्याचे बांधकाम मंजूर केले. हे बांधकाम गडचांदूर, वडगाव, नारंडा, वनसडी, कन्हाळगाव, चनई, जैतापूर येथे होत असून या सिमेंट काँक्रिट रस्त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवार (४ मार्च)ला खा. हंसराज अहीर यांच्या हस्ते पार पडला.
मागील साडेचार वर्षापासून ताटकळत बसलेल्या मतदारांची मात्र यानिमित्ताने चांदी होत आहे. असा प्रकार अनेक ठिकाणी सुरू असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे तेही यात मागे नाही. काल परवापर्यंत विकासकामांच्या नावाखाली लोकांना निव्वळ गाजर दिले जात होते. परंतु, आता संपूर्ण वरोरा-भद्रावती मतदार संघात विकासकामांची श्रृंखला सुरू झाली आहे. यानिमित्ताने पालकमंत्री धावत पळत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करीत असून लोकसभेच्या पार्श्‍वभूमिवर हे मतांचे गणित असल्याची चर्चा संपूर्ण मतदार संघात सुरू आहे. सुदैवाने मागील चार 'टर्म'पासून या मतदार संघातील लोकांनी संजय देवतळे यांना विश्‍वास दर्शविला आणि त्यांना आमदारकी मिळाली. परंतु, वरोर्‍याचा पाहिजे तसा विकास आजही झाला नाही. नागपूर महामार्गाच्या पलिकडे असलेले आनंदवन मात्र, वरोरा शहराच्या तुलनेत विकसित झाले. या आनंदवनाचे नाव आता पर्यटन विभागाच्या नकाशावर कोरले जाणार आहे. असे असताना ज्या वरोरा शहराने 'आनंदवन' दिले तेथील नागरिक मात्र आनंद मिळवण्यासाठी वणवण भटकत आहेत. अशातच काँग्रेसमध्ये उमेदवार बदलीचे संकेत काँग्रेसनेच दिले. यंदाची लोकसभा बाबू नाही तर संजूभाऊ लढवतील अशी चर्चा काँग्रेस वतरुळात असतानाच वरोर्‍यातील विकासकामाला अचानक गती आली आणि पालकमंत्र्यांनी गावोगावी, गल्लोगल्ली शेकडो फलक झळकवले. आणि या फलकाचे उद््घाटन धावत पळत केले. अनेक ठिकाणी तर शेतीच्या रस्त्यासाठी शेतकर्‍यांनी परवानगी दिली नसतानाही भूमिपूजन आटोपून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत आहे.
शेतकर्‍यांच्या परवानगीविना भूमिपूजन झाल्यामुळे शेतकरी संतापले आणि चालू झालेल्या रस्त्याचे काम बंदही पाडण्यात आले. याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडेही केली. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतची मंजूरी न घेता अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन काही ठिकाणी केले जात आहे. गावात बगिच्यांचे सौंदर्यीकरण, मंदिरासाठी सभागृहाचे बांधकाम, संरक्षण भिंती, शहरातील-गावातील अंतर्गत रस्ते अशा विविध विकासकामांची श्रृंखला मागील काही दिवसात नागरिकांना बघायला मिळाली. परंतु, हे दिवास्वप्न तर नाही ना, अशीही चर्चा नागरिकांत आहे. कारण एक वर्षापूर्वी वरोर्‍यात केलेल्या अनेक विकासकामांच्या भूमिपूजनानंतर प्रत्यक्षात मात्र काम सुरू झाले नाही. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे शहराच्या मध्यभागी असलेला एकमात्र तलाव. कधीकाळी हा तलाव वरोर्‍याची आण-बाण-शान होता. परंतु, आता या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकलगतचे अतिक्रमणही आजपर्यंत हटविण्यात आले नाही. असे एक ना अनेक प्रश्न चुटकीसरशी सोडविण्याचा प्रयत्न लोकसभेची उमेदवारी मिळण्याच्या पार्श्‍वभूमिवर पालकमंत्री तर करीत नाही ना, असाही प्रश्न यानिमित्ताने चर्चेचा ठरला आहे.
काही वर्षापूर्वी वरोरा तालुक्याला औद्योगिक परिसराचे स्वरुप प्राप्त झाले आणि याठिकाणी ऊर्जा निर्मिती करणार्‍या कंपन्यांनी बस्तान मांडले. बेरोजगार लोकांना यानिमित्ताने रोजगार मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, दुर्दैवाने येथे परप्रांतीयांचाच भरना वाढतच गेला. यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण शेतकर्‍यांसाठी जीवघेणे ठरले. पालकमंत्र्यांकडे राज्याच्या प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी असताना त्यांच्याच क्षेत्रातील नागरिक प्रदुषणामुळे त्रस्त झाले आहे. असे असले तरी काही का असेना वरोरा शहराचा विकास हा विषय पालकमंत्र्यांनी हाताळला, हे महत्त्वाचे.
काँग्रेसने महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडला

काँग्रेसने महाराष्ट्रातून प्रचाराचा नारळ फोडला

निवडणूका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आचार संहिता लागू होण्यापूर्वी काँग्रेसने आज महाराष्ट्रातून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. आज औरंगाबाद येथे त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत राहुल गांधींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच काँग्रेसने केलेल्या विकासकामांचा पाढाही त्यांनी जनतेसमोर वाचला.
पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भाजप पक्ष ‘वन मॅन पार्टी’ बनत असल्याची खोचक टीका केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज आपल्या औरंगाबाद येथील जाहीर सभेत विरोधकांवर हल्ला बोल करत अडवाणींच्या टीकेचे समर्थन केले आहे. देश कोणी एक व्यक्ती चालवत नाही असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींचे नाव न घेता जाहीर टीका केली आहे.

Monday, March 03, 2014

मनसेला महायुतीत आणणार - नितीन गडकरी

मनसेला महायुतीत आणणार - नितीन गडकरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात सोमवारी एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये राजकारणावर चर्चा
शिर्डी ते दिल्ली धावणार रेल्वे

शिर्डी ते दिल्ली धावणार रेल्वे

होळी सणांचे महत्व लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने शिर्डी ते दिल्ली या दरम्यान ८ खास ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन वातानुकूलित असून त्या होळी महोत्सवानिमित्त सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रेल्वे प्रवक्ता यांनी दिलेल्या माहितीनूसार, गाडी नंबर ०४०११ (आठवडयातून एकदा धावणारी ) एसी सुपरफास्ट ही गाडी साईनगर शिर्डीमधून सकाळी १० वाजता सुटणारी गाडी शुक्रवारी (७ मार्च) पासून २८ मार्चपर्यंत रोज दिल्लीसाठी निघेल. ही गाडी दुस-या दिवशी सकाळी ८:१५ वाजता दिल्लीत पोहोचेल. ही गाडी आठवडयातून चार ट्रीप करणार आहे. तर गाडी नंबर ०४०१२ ही गाडी दिल्लीतून सकाळी ११:५५ मिनिटांनी बुधवारी (५ मार्च रोजी) पासून २६ मार्चपर्यंत धावणार आहे. ही गाडी दुस-या दिवशी शिर्डीमध्ये सव्वा अकरा वाजता पोहोचेल. शिडीमधून निघणारी ही गाडी मनमान, भुसावळ, खांडवा, इटारसी, हबीबगंज, भोपाळ, झांसी, ग्वालियर, आग्रा, कॅन्टोमेंट आणि मथूरा या स्थानाकावर थांबणार आहे.

पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बदलून देणार

पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बदलून देणार

२००५ पर्यंतच्या पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बदलून देण्याच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. ग्राहकांना २००५ पर्यंतच्या नोटा १ जानेवारी २०१५ पर्यंत बदलता येणार आहेत. या निर्णयामुळे नोटा बदलण्याची घाई करणा-या व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.
बनावट नोटांना रोखण्यासाठी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००५ पर्यतच्या नोटा ३१ मार्च पर्यंत जमा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा कालावधी कमी असल्याचे आरबीआयच्या लक्षात आल्याने त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात ५०० आणि १००० नोटा मोठया प्रमाणात बनावट असून त्या चलनामध्ये आहेत. या नोटांना आळा घालण्यासाठी आरबीआयने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. २००५ पर्यंतच्या सर्व नोटा जवळच्या शाखांमध्ये जमा कराव्या लागणार आहेत. ग्राहकांना त्या बदलून घेता येणार आहेत. परंतू या कालावधीमध्ये आता १ जानेवारी २०१५ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.