काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, June 12, 2013

जेडीयु-भाजप युती तुटणार?

जेडीयु-भाजप युती तुटणार?


 पाटणा (बिहार)
लोकसभेची निवडणूक होण्याआधीच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी युती तोडण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांना लोकसभेसाठी निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख केल्यामुळे नितीशकुमार भाजपवर नाराज झाले आहेत.
मोदींना राजकीय स्पर्धक मानणा-या नितीशकुमार यांनी मोदींच्या हाती महत्त्वाची जबाबदारी येताच भाजपशी असलेली युती तोडण्याचे संकेत दिले आहेत. आजपासून (बुधवार) संयुक्त जनता दल (जेडीयु) पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन कटिहार येथे सुरू झाले आहे. या अधिवेशनादरम्यान जेडीयु-भाजप युतीचे भवितव्य निश्चित होईल, असे नितीश समर्थक सांगत आहेत. मात्र संयुक्त जनता दल (जेडीयु) पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी अद्याप युती तोडण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. पक्षातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे शरद यादव यांनी सांगितले. नितीशकुमार समर्थक मात्र नरेंद्र मोदी यांच्याशी नेत्याशी जुळवून घेणे अवघड असल्याचे बोलत आहेत.
दरम्यान, नितीशकुमार यांच्या हालचाली भाजपमध्येही नाराजी पसरली आहे. भाजपशी असलेली युती तोडायचीच असेल तर नितीशकुमार यांनी आधी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा; अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सी. पी. ठाकूर यांनी केली आहे.
 नक्षल जोडप्याचा विवाह

नक्षल जोडप्याचा विवाह

गडचिरोली- मागील वर्षभरापासून नक्षल्यांची कंबर मोडणाèया गडचिरोली पोलिसांना आणखी एक मोठं यश मिळालं आहे. तब्बल २८ नक्षलवाद्यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या घटनेमुळं नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला असूनदुसरीकडे पोलिसांचं मनोधैर्य उंचावलं आहे. गडचिरोली पोलिस मुख्यालयात आज झालेल्या एका कार्यक्रमात या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं. याचवेळी एका नक्षल जोडप्याचा विवाह पार पडला.
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये परिवर्तन यात्रेवर अमानूष हल्ला चढवणाèया नक्षलवाद्यांना गडचिरोलीतील एका घटनेनं मोठा हादरा दिला. ही घटना म्हणजे २८ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. गडचिरोली पोलिसांनी मागील तीन महिन्यांपासून नक्षल्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेण्याचा अनोखा उपक्रमहाती घेतला. नवजीवन योजना असं या उपक्रमाचं नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून नक्षल्यांच्या घरोघरी जाऊन कुटुंबीयांना नक्षल चळवळीचे धोके आणि शासनाच्या मदतीचे स्वरुप पोलिसांनी समजावून सांगितले. त्यामुळं कुटुंबीयांनी चळवळीतील मुला-मुलींचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश आलं. त्यामुळंच आज २८ युवा नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. या २८ जणांत ८ महिला आणि २० पुरुष आहेत. या सर्वांना त्यांच्या हुद्यानुसार बक्षीसाची रक्कम देण्यात आली. कमांडरला एक लाख तर दलम सदस्यांना ७५ हजार रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला. सोबतच नक्षल्यांच्या कुटुंबीयांनाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला नागपूर क्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अनुपकुमार qसहनक्षल सेलचे उपमहानिरीक्षक रवींद्र कदमज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांमध्ये अनेक जण मोठ्या कारवायांमध्ये सहभागी होते. मरकेगाव हत्याकांडपुस्टोला बॉम्बस्ङ्कोट,हत्तीगोटा चकमक अशा हादरवणाèया कारवायात सहभागी या नक्षल्यांनी चळवळीत जाऊन भ्रमनिरास झाल्याचं सांगितलं. अनेकदा जबरदस्तीनं तर काहीवेळा पोलिसांची भीती दाखवून चळवळीत सहभागी करून घेतल्याचे अनुभव या नक्षल्यांनी सांगितले.
 एकाचवेळी २८ नक्षल्यांनी आत्मसमर्पण करणंहे गडचिरोली पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे. मात्रआता या नक्षल्यांच्या पुनर्वसनाचं काम तेवढ्याचं तळमळीनं झालं तरंच त्याचा प्रभाव पडू शकेल. पण सध्या तरी त्यांना काय ङ्कायदे मिळणार आहेतयाची कोणतीही माहिती नसल्यानं हे नक्षली संभ्रमात आहेत. यासंदर्भात विचारणा केल्यावर आत्मसमर्पण योजनेचे सर्व ङ्कायदे त्यांना मिळतील आणि लवकर मिळतीलअसं पोलिसांनी सांगितलं.

 दरम्यानयावेळी एका नक्षल जोडप्याचा विवाह पोलिसांच्या पुढाकारानं विधिवत लावून देण्यात आला. या मंगल सोहळ्याला गडचिरोली शहरातील गणमान्यआत्मसमर्पित नक्षल्यांचे नातेवाईक आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ऑर्बिटच्या विज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

ऑर्बिटच्या विज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर


यश बांगडे, रुपम वासेकर, नितीन पेंदाम प्रथम पुरस्काराचे मानकरी

चंद्रपूर : ऑर्बिट सायन्स अ‍ॅकडमी ऑङ्क एज्युकेशनच्या वतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या आठवी ते दहावीच्या विद्याथ्र्यांसाठीच्या विज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, आठवीतून यश बांगडे, नववीतून रुपम वासेकर, तर दहावीतून नितीन पेंदाम या विद्याथ्र्याने प्रथम क्रमांक मिळविला.
चंद्रपूर तालुका सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने संचालित येथील आर्बिट सायन्स अकॅडमी ऑफ एज्युकेशनच्या वतीने १९ मे रोजी स्थानिक मातोश्री विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात आठवी, नववी आणि दहावीच्या सुमारे २५० विद्याथ्र्यांना सहभाग घेतला होता. विद्याथ्र्यांना भावी शैक्षणिक जीवनात स्पर्धा परीक्षा, प्रवेश पूर्व परीक्षांचा सराव होण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. या स्पर्धेचा निकाल नुकताच संस्थेने जाहीर केला आहे. यात वर्ग आठवीतून प्रथम यश अविनाश बांगडे, द्वितीय ओशीन यशवंत पाचभाई, तृतीय शिवानी राजीव धकाते, वर्ग नववीतून प्रथम रुपम दिलीप वासेकर, द्वितीय गायत्री राजीव विठोलकर, तृतीय गौरव लभाने, वर्ग दहावीतून प्रथम नितीन रघुनाथ पेंदाम, द्वितीय स्नेहा पांडुरंग बोढाणे, तृतीय सोमेश विनोदराव आदेवार यांचा समावेश आहे.

प्रथम क्रमांकांच्या यशस्वी विद्याथ्र्यांस दोन हजार ५१ रुपये, द्वितीय एक हजार ५१ आणि तृतिय क्रमांकाच्या विद्याथ्र्यांस ५५१ रुपये बक्षिसासह सन्मानचिन्ह देण्यात येईल. सहभागी विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

Monday, June 10, 2013

दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

घुग्घुस : घुग्घुस परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. एक घटना आज तर दुसरी काल रात्रीच्या सुमारास घडली. 
आज चंद्रपूरकडून भरधाव येणार्‍या ट्रकने (एमएच- ३५ एच- १६५५) समोर जात असलेल्या दुचाकीला (एमएच-३४ एएफ-६९0२ ) मागून धडक दिली. यात रवी लोंडबाजी खडतर रा. भिवारपूर वॉर्ड व अमित वाघमारे रा. गोपालपुरी चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रशांत सूर्यभान लोखंडे रा. बालाजी वॉर्ड चंद्रपूर गंभीर जखमी झाला. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
दुसरी घटना काल रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. सिद्धांत सूर्यभान ताडपेली आप्या दुचाकीने जात असताना अचानक त्याचे वाहन एसीसी सिमेंट रस्त्यावरील दुभाजकाला आदळले.यात तो गंभीर जखमी झाला.नागपुरात उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. 
संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला

संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला

वर्धा- कारंजा (घा.) तालुक्यातील जसापूर (किनाळा) येथील चार जण तळेगाव (श्या.) येथे शनिवारी रात्री ७ वाजता जेवण करायला गेले होते. त्यापैकी तिघेजण रात्री उशिरा घरी सुखरुप पोहचले. एकाचा आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास नजीकच्या राष्ट्रीय महामार्ग ६ वर गुरुदेव सॉ मिलजवळ संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद वामनराव खोडे (५0) रा. जसापूर (किनाळा) असे मृतकाचे नाव आहे. आपल्या वडिलाची सोबतच्या तिघांनी हत्या केल्याचा आरोप मृतकाच्या मुलाने केला आहे. पोलीस सूत्रानुसार, शनिवारी रात्री प्रमोद खोडे हा शरद खोडे (४८) या लहान भावाच्या वाहनाने चुलतभाऊ विजय खोडे (४0) व प्रमोदने शेती ठेक्याने दिली ते विलास गवारी (४0) यांच्यासोबत जसापूर येथून तळेगावला जेवण करायला गेला होता. रात्री उशिरा प्रमोदशिवाय अन्य तिघेही घरी पोहचले. अशातच आज पहाटे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात मृतदेह पडून असल्याची माहिती तळेगाव पोलीस चौकीला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता मृतकाच्या खिशातील कृषी केंद्राच्या बिलावरून सदर इसम प्रमोद खोडे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून ओळख पटविली. वास्तविक, प्रमोद हा तिघांसमवेत जेवण करायला गेला होता. परतताना तो त्यांच्यासोबतच घरी का परतला नाही. तो परतला नाही याची माहिती सोबतचा त्याचा भाऊ व चुलत भाऊ व अन्य एकाने त्याच्या कुटुंबीयांपासून दडवून का ठेवली. यावरून प्रमोदच्या मृत्यूबाबत संशय बळावला आहे. प्रमोदची हत्या करून मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर टाकून अपघाताचा बनाव केला असावा, असाही संशय एकंदर घटनाक्रमावरून लक्षात येत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणी तळेगाव चौकीत र्मग दाखल केला आहे. पोलीस सदर प्रकरणाचा तपास करून रहस्यावरून पडदा हटविते वा अपघाताचे स्वरुप देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर) ■ याप्रकरणी कारंजा (घा.) पोलिसांनी प्रमोदसोबत जेवण करायला गेलेले शरद खोडे, विजय खोडे व विलास गवारी या तिघांना रात्रीला अटक केली. याप्रकरणी आर्वी पोलिसांची टाळाटाळ सुरू असल्याने प्रकरण पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचले. यानंतर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे समजते. तिघांनाही अटक पित्याची हत्याच- मुलगा स्वप्निलची तक्रार ■ प्रमोद खोडे यांची सोबत गेलेल्यांनीच हत्या केली, अशी तक्रार देण्यासाठी मुलगा स्वप्निल आर्वी पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र पोलिसांनी तळेगाव पोलिसांकडे बोट दाखवून तिकडे पाठविले. तळेगाव पोलिसांनीही टाळाटाळ केली. नंतर नातेवाईक व नागरिक संतप्त झाल्याने अखेर पोलिसांनी लेखी तक्रार स्वीकारली. 


टायर फुटला : तीन जण ठार

टायर फुटला : तीन जण ठार

मुलचेरा : चौडमपल्ली ते आष्टी रस्त्या दरम्यान असलेल्या महाकाली मंदिराजवळच्या वळणावर ट्रकचा समोरचा टायर फुटून ट्रक अनियंत्रित झाल्याने ट्रकची एस..टी बसला सामोरासमोर धडक बसली. या भीषण अपघातात ३ जण ठार झाले तर ४ जण गंभीर असून ३१ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सदर अपघात आज दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास घडला.
अहेरी आगाराची नागपूर - अहेरी बस एम.एच.-१४ बि.टी.-0८१६ आष्टीवरून अहेरीकडे जात असताना विरूद्ध दिशेने आलापल्लीवरून तेंदूचे पोते भरून महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट्रचा ट्रक एम.एच-३३ ४१३८ येत होता. सदर ट्रक महाकाली मंदिरासमोरच्या वळणावर येताच ट्रकचा समोरचा टायर अचानक फुटला. त्यामुळे समोरून येणार्‍या एस.टी बसला ट्रकची जबर धडक बसली. यात ट्रकचालक बंडु घटनास्थळीच ठार झाला. एस.टी. बसचा चालक अजय कहाते व चौडमपल्ली येथील बसमधील प्रवासी कमला मंथनवार यांना तत्काळ आष्टी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला.
एस.टी बसमधील ३१ प्रवसी किरकोळ जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच अहेरी आगाराचे तिकीट निरीक्षक राज वैद्य, तिकीट संग्रहक आय.एस पठाण व आगार प्रमुख घटनास्थळी पोहोचले. दुपारनंतर रिमझिम पाऊस येत असतानासुद्धा आष्टी ग्रामीण रूग्णालयात नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी जमलेली होती.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळातर्फे किरकोळ जखमींना ५00 रुपये तर मृतकांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी पाच हजार रूपये सानुग्रह मदत देण्यात आली.
अपघातग्रस्त ट्रक आलापल्ली येथील अमोल रापेल्लीवार यांच्या मालकीचा असून ओव्हरलोडमुळे ट्रकचा टायर फुटल्याची चर्चा घटनास्थळी होती. सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत ट्रकचालकाचा मृतदेह ट्रकमध्येच फसुन होता.
वाहनचालक गुरूदास गेडाम व वाहक पठाण यांनी अहेरीवरून नागपूरला जाणारी बस क्र. ८९५८ मध्ये जखमीेंना उपचारासाठी आष्टी ग्रामीण रूग्णालयात आणले. किरकोळ जखमींना उपचारानंतर सुटी देण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयांना प्रवेशबंदी

चंद्रपूर जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयांना प्रवेशबंदी

चंद्रपूर- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नीत ७२१ कॉलेजेसपैकी तब्बल ५०० कॉलेजेसमधीलप्रवेश गोठवण्यात आले आहेत सुमारे ३३७ कॉलजेसमध्ये नियमित शिक्षक नाहीत तर १६१कॉलेजेसमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्याने त्यांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्तावसहसंचालकांकडे पाठवण्यात आला आहे त्यामुळे विद्यापीठाची निम्म्याहून प्रवेश क्षमता कमी झालीआहे .यात चंद्रपूर जिल्ह्यातील ४४ महाविद्यालयाचा समावेश आहे. 
बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी पदवी कोर्ससाठी प्रवेशाची तयारी सुरू केली होती परंतु ,विद्यापीठाच्या निर्णयानंतर आता विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे दरम्यान विद्यापीठालाअशाप्रकारचा आदेश काढण्यासाठी ​ मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून दणका सहन करावालागला सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्थेचे संचालक सुनील मिश्रायांनी हायकोर्टात याचिका दाखल करून विद्यापीठ संलग्नीत कॉलेजेसमध्ये शिक्षक नेमले नसतानाहीविद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असल्याचा दावा केला होता 
याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने विद्यापीठाला नोटीस बजावली १२ जूनपर्यंत उत्तर सादरकरण्याचा आदेश दिला मात्र शिक्षक नियुक्त नसलेल्या कॉलेजसमधील प्रवेश हे याचिकेच्यानिकालावर अवलंबून राहतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जोखमीवर प्रवेश घ्यावेत त्याला विद्यापीठजबाबदार असेल असे आदेशात नमूद केले 
त्या आदेशानंतर विद्यापीठ प्रशासन हादरले विद्यापीठाने तात्काळ एकही नियमित शिक्षक नसलेल्याकॉलेजेसची यादीत तयार केली तसेच शनिवारी रात्री ती यादी संकेतस्थळावर प्रकाशित केली .३३७ कॉलेजेसमध्ये कायद्यानुसार नियुक्त केलेले शिक्षक नाहीत परंतु विद्यापीठाने मान्यता दिलेलेअंशकालीन शिक्षक तिथे आहेत त्यासंदर्भात हायकोर्टात सविस्तर उत्तर सादर करण्यात येणार आहेपरंतु न्यायालयच्या पुढील आदेशापर्यंत तेथील प्रवेश रोखण्यात आले आहेत असे बीसीयुडीसंचालक डॉ अरविंद चौधरी यांनी मटा ला सांगितले 
दरम्यान ज्या कॉलेजमध्ये गेल्या शैक्षणिक सत्रात ५० टक्क्यांहून कमी प्रवेश झालेत त्याकॉलेजेसची मान्यता काढण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता त्या आदेशानुसार १६१कॉलेजेसची यादी तयार करण्यात आली आहे तसेच त्या कॉलेजेसची मान्यता रद्द करण्याचाप्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालकाना पाठवण्यात आला आहे सहसंचालकांचा आदेश येईपर्यंत त्याकॉलेजेसमधील प्रवेश रोखण्यात आले आहेत असे चौधरी यांनी सांगितले 


विदर्भ शारीरिक शिक्षण महाविद्यालय, गडचांदूर, जि.चंद्रपूर
चंद्रपूर शारिरीक शिक्षण महाविद्यालय चंद्रपूर

२२४) भाऊराव पाटील चटप शारिरीक शिक्षण महाविद्यालय राजूरा जि. चंद्रपूर

२२५) श्री निकेतन कॉलेज ऑफ एज्युकेशन नागभीड

२२६) अँड़ यादवराव धोटे स्मृती महाविद्यालय, राजूरा जि. चंद्रपूर

२२७) संत शुन्योजी महाराज शिक्षण महाविद्यालय गडचांदूर जि. चंद्रपूर

२२८) राजीव गांधी कला महाविद्यालय शंकरपूर ता. चिमूर जि. चंद्रपूर

२२९) राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महा., नागभीड जि. चंद्रपूर

२३0) प्रियदर्शनी महाविद्यालय, रामपूर (आर्वी) ता. राजूरा जि. चंद्रपूर

२३१) जिजामाता कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायंस अँण्ड टेक्नॉलॉजी सुमठाणा

२३२) कमलाई महाविद्यालय व्याहाड खुर्द ता. सावली जि. चंद्रपूर

२३३) इंदिरा गांधी महाविद्यालय, मेन रोड चंद्रपूर

२३४) स्व. राजे तेजसिंहराव भोसले कॉलेज ऑफ मॅनेजमेंट चंद्रपूर

२३५) महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय चंद्रपूर

२३६) शंकरअय्या देशमुख महाविद्यालय, वरोरा जि. चंद्रपूर

२३७) विद्यासागर कॉलेज वरोरा, जि.चंद्रपूर

२३८) दत्तगुरू साईमॉं शिक्षणशास्त्र महाविद्यालय मुल, जि. चंद्रपूर.

२३९) कै. नारायणसिंग उईके शारीरिक शिक्षण महाविद्यालय, चिमूर, जि. चंद्रपूर

सत्र २00९-२0१0

२४0) श्री नामदेवराव वडेट्टीवार महाविद्यालय सिंदेवाही जि. चंद्रपूर

२४१) ग्रामगिता महाविद्यालय चिमूर जि. चंद्रपूर

२४२) गोंडवाना कॉलेज ऑफ आर्टस कॉर्मस जिवती, जि.चंद्रपूर

२४३) चिंतामणी कॉलेज ऑफ कॉर्मस अँण्ड सायंस, पोभुर्णा, जि. चंद्रपूर

२४४) राजर्षी छत्रपती शाहू महाराज कला व वाणिज्य महा. बाबुपेठ

२४५) महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मिंडाळा, ता. नागभीड

२४६) राजीव गांधी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन चिमूर जि. चंद्रपूर

२४७) स्व. भिमाजी वरभे वाणिज्य अँण्ड सायन्सवरिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर

२४८) आचार्य विनोबा भावे कॉलेज ऑफ आर्टस, कॉर्मस अँण्ड सायंस, चंद्रपूर

२४९) व्यंकटेश्‍वरा कॉलेज ऑफ सायंस, कॉर्मस अँण्ड मॅने.स्टडीज, घुग्गुस

२५0) अब्दुल अजीज धमानी महाविद्यालय नागभीड जि.चंद्रपूर

२५१) इंदिरा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (विरूर स्टेशन)

२५२) स्व. भिवाजी वरभे कला व वाणिज्य वरिष्ठ महा. बोथली ता. चिमूर

२५३) चिंतामणी आर्टस अँण्ड सायंसकॉलेज गोंडपिपरी जि. चंद्रपूर

२५४) राजीव गांधी कला महाविद्यालय पाटन, ता. जिवती, जि. चंद्रपूर

२५५) रामजल पुगलीया इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँण्ड टेक्नॉलॉजी चंद्रपूर

२५६) हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी, मोरबा चंद्रपूर

२५७) श्री साई कॉलेज ऑफ इंजिनीअरींग अँण्ड टेक्नॉलॉजी लोणारा

सत्र २0१0-११

२५८) चिमुर सायन्स अँण्ड कॉर्मस कॉलेज, चिमुर, जि. चंद्रपूर

२५९) फेअरीलॅण्ड कॉलेज ऑफ सायंस कॉर्मस अँण्ड मॅनेजमेंट, भद्रावती

२६0) आचार्य विनोबा भावे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वरोरा

२६१) आचार्य विनोबा भावे आर्टस, कॉर्मस अँण्ड सायंस कॉलेज, ब्रम्हपुरी

२६२) आचार्य विनोबा भावे आर्टस, कॉर्मस अँण्ड सायंस कॉलेज, बल्लारपूर

२६३) जैनुद्दीन जव्हेरी महाविद्यालय, तुकूम, जि. चंद्रपूर

सत्र २0११-१२

२६४) निरंजन सायंस, कॉर्मस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ताळोबा रोड, चंद्रपूर

२६५) महाराष्ट्र इंस्टिट्युट ऑफ फार्मसी चौगान फाटा आरमोरी रोड (बेताला)

२६६) जैनुद्दीन जव्हेरी महाविद्यालय, बल्लारपूर जि. चंद्रपूर.

Sunday, June 09, 2013

अनिकेत आमटे

अनिकेत आमटे

आलापल्ली पासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर मीरकल या गावाजवळ 'Glory of Allapalli' हे ठिकाण आहे. 12 महिने पाणी असलेला तलाव त्या ठिकाणी आहे. तसेच अतिशय उंच झाडांचे जंगल तिथे आहे. त्यात सागवाना करिता हे जंगल प्रसिद्ध आहे. प्रचंड मोठे खोडांचे घेर असलेले सागवान वृक्ष येथे बघायला मिळतात. पाणी आणि जंगल असल्याने वन्य प्राणी व पक्षी पण भरपूर प्रमाणात आढळतात. या वर्षी वन खात्याच्या सहकार्याने त्या निसर्ग सौदर्य असलेल्या व अनेक पशुपक्षांचे प्राण असलेल्या तलावाजवळ एक सिमेंटचे मंदिर बांधले. त्यामुळे प्राण्यांच्या वास्तव्याला प्रचंड धोका निर्माण झालाय. कायद्याने अशा ठिकाणी बांधकाम करायला नक्कीच बंदी असणार. त्या मंदिराचे वनखात्याच्या कार्यालयात रुपांतर झाले तरच प्राणी व जंगल वाचेल. अन्यथा कोणीतरी वाटसरू किंवा भिकारी बाबा त्या ठिकाणी येउन वास्तव्य करेल आणि नंतर लोक त्याला संत बनवतील. मग धर्मशाळा, हॉटेल, दुकाने आणि नंतर मीरकल बाबाची जत्रा सुरु व्हायला वेळ लागणार नाही. अश्या काही घटना आपल्या देशात-राज्यात नेहमीच घडतात. फेसबुक हे माध्यम मित्रांच्या-लोकांच्या संवेदना जागृत करते यात खरच समाधान वाटते. तरुणाई व देश अश्या अनेक अनुचित घटनांनी अस्वस्थ होतात याचे पण समाधान आहे. भावना व्यक्त करायला एक छान व्यासपीठ मिळाले आहे. या प्रतिक्रियांचा नक्कीच काहीतरी फायदा होईल. आजू बाजूच्या गरीब अशिक्षित आदिवासी बांधवांना जेवण देऊन मूर्तीची स्थापना केली आहे. आदिवासी बिच्चारे आहेत. त्यांना कोणीही काहीही सांगून फसवू शकत. ते लवकर विश्वास ठेवतात. अजून आदिवासी बांधवांमध्ये पर्यावरण - प्राणी - पक्षी यांच्या संवर्धना विषयी जागृती निर्माण झालेली नाही. त्यात त्यांचा दोष नाही. कायमच अर्धपोटी असलेली लोक या गोष्टींचा विचार तरी कसा करतील? पण वनखात्याने करायलाच हवा.
वर्धा नदी पात्रात आंदोलन

वर्धा नदी पात्रात आंदोलन

चंद्रपूर जिल्ह्यातल्या बारमाही नद्यांची इथल्या उद्योगांनीच गटारे केली आहेत. पर्यावरण दिनाच्या निमित्तानं या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी वर्धा नदी पात्रात आंदोलन केलं. 
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा या एकट्या नदीवर एकूण ३० मोठे उद्योग आहेत. यात पेपर मिल, औष्णिक वीज केंद्रे, सिमेंट कारखाने, आणि केमिकल कारखान्यांचा समावेश आहे. आगामी काळात आणखी २० ऊर्जा निर्मिती केंद्रे याच नदीवर प्रस्तावित आहेत. या सर्व उद्योगांपैकी एकाही उद्योगाने प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळेव्यतिरिक्त प्रदूषण रोखणारी यंत्रे लावलेली नाहीत. त्यातही मोठ्या प्रमाणात रासायनिक टाकाऊ पदार्थ पाण्यात सोडणाऱ्या बल्लारपूर पेपर मिलचा मोठा वाटा आहे. या उद्योगाच्या विषारी पाण्याने बल्लारपूर शहरातील वर्धा नदीचे पाणी काळवंडून गेले आहे. तिकडे चंद्रपूर ‘एमआयडीसी’तील विविध कारखान्यांनी इरई आणि वर्धा या नद्यांच्या प्रदूषणात भर घातली आहे. चंद्रपूरला पहिल्यांदाच संजय देवतळे यांच्या रुपात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळाले आहे. त्यातही देवतळे यांच्याकडे पर्यावरण खात्याचा कारभार आहे. मात्र, असे असले तरी स्थिती सुधारली नाही. अनेक निवेदने, विनंत्या करूनही कारवाई होत नाही. 

अवघा महाराष्ट्र दुष्काळी झळांनी भाजून निघाला असताना पाण्याचे महत्त्व ना उद्योगांना आहे ना शासनाला... पाणी नसल्याने उद्योग बंद पडतील तेव्हाच प्रशासनाचे डोळे उघडतील का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
चंद्रपुरात बोगस पदव्यांचा उद्योग

चंद्रपुरात बोगस पदव्यांचा उद्योग

दीड ते दोन लाखांत पीएचडी, एमबीए, बीईच्या पदव्या


चंद्रपूर : औद्योगिक, व्यवसायिक आणि विविध नामांकीत कंपन्यांसह महाविद्यालयात नोकरी मिळविण्यासाठी दीड ते दोन लाखांत पीएचडी, एमबीए, बीईच्या पदव्या विक्रीचा उद्योग सुरू असल्याची माहिती आहे. स्थानिक बंगाली कॅम्प मार्गावरील गुलशन प्लाझामध्ये ही अकॅडमी असून, तिवारी नामक परप्रांतिय या पदव्यांची विक्री करीत आहे. त्याने आतापर्यंत अनेकांना गंडविले आहे.
अवघ्या दीड ते दोन लाखांत पीएचडी खरेदी केलेल्या दहा ते बारा प्राध्यापकांवर कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर पदव्यांचा हा उद्योग उघड झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सीएमजे विद्यापीठातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे २५ हून अधिक पदवीधरांनी अशा स्वरूपाच्या पदव्या खरेदी केल्या आहेत. वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक qकवा सहायक प्राध्यापक होण्यासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५ टक्के गुण तसेच नेट वा सेट परीक्षा उत्तीर्ण असावे लागते. नेट qकवा सेट परीक्षा उत्तीर्ण नसल्यास पीएचडी असावी लागते. साधारणपणे पीएचडी पूर्ण करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागतो तसेच भरपूर वेळ द्यावा लागतो. तथापि, काही कामचुकारांनी या संशोधनकार्यास ङ्काटा देत मेघालयमधील सीएमजे विद्यापीठाकडून दीड ते दोन लाखांत पीएचडी पदवी खरेदी करण्याचा शहाणपणा केला. या विद्यापीठात दीड qकवा दोन लाख दिल्यानंतर एक ते दीड महिन्यात संशोधनकार्य पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जात होते. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. हा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, राज्य शासनाने  तडकाङ्कडकी एक परिपत्रक जारी करून अशा प्राध्यापकांच्या सेवा संपुष्टात आणण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच सर्व संशयित पीएचडी प्रमाणपत्र आणि संशोधनकार्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
अवघ्या दीड ते दोन लाखांत पीएचडी मिळत असल्याने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २० ते २२ पदवीधरांनी सीएमजे विद्यापीठाकडे पैसे भरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी दहा ते बारा पदवीधरांना प्रमाणपत्र मिळायचे आहे. त्यामुळे या पदवीधरांना मोठा आर्थिक ङ्कटका बसणार आहे. चंद्रपूर शहरातील काही नामांकित महाविद्यालयांत सध्या अंशकालीन म्हणून कार्यरत प्राध्यापकांचाही यात समावेश आहे. वेतनश्रेणी वाढीसाठी तीन ते चार कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनीही बोगस पीएचडी मिळविली आहे. यापैकी दोन शिक्षक बारावीच्या शिकवणीसाठी मप्रसिद्धङ्क आहेत.


चंद्रपुरातील सीटीपीएस, बिल्ट, एमईएल, सिमेंट कंपन्या आणि वेकोलित पदोन्नती आणि नोकरी मिळविण्यासाठी सीएमजे विद्यापीठाकडून पदव्या घेतल्या आहे. या सर्व पदव्या बोगस असून, दिशाभूल केल्याचे आता स्पष्ट होत आहे.