नागपूर/प्रतिनिधी
नंदनवन येथील के.डी.के अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एन. एस. एस (राष्ट्रीय सेवा योजना) च्या वतीने दिनांक ११ सप्टेंबरला हनुमान नगर येथील मनपाच्या लालबहादूर शास्त्री माध्यमिक शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी नागपूर शहराचे माजी प्रदेशिक परिवहन अधिकारी शरदजी जिचकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" या संत तुकाराम महाराजांनी म्हटलेल्या औळींनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली व उपस्थित विद्यार्थांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले. त्याचप्रकारे झाडांचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे म्हणत त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना किमान एका तरी वृक्षाची लागवड करून वसुंधरेचे रक्षण करावे तरच निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे संबोधन केले. वृक्षारोपण करून आपले काम येथेच संपत नाही तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्याचप्रकारे वृक्ष मानवी जीवनचक्राचा एक अविभाज्य घटक आहे, झाडे प्रदुषणापासून आपले रक्षण करतात, याकरिता आज होत असलेल्या अवैध वृक्षाची कत्तल थांबवण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन केले व रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी योग्य वृक्ष लागवड केली पाहिजे, असे ते म्हणाले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय पुंड, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थीगन, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक के.डी.के अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एन. एस. एस (राष्ट्रीय सेवा योजना) ची विद्यार्थिनी श्रृतीका बाबाराव पुंड व इतर विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात के.डी.के अभियांत्रिकी महाविद्यालय, डाॅ.डी.पी.सिंग (प्राचार्य) डाॅ.ए.एम.बदर(उप प्राचार्य), डाॅ.ए.पी.फरतोडे. डॉ. तुशार.आर.शेळके (एन.एस.एस ईचार्ज) आणि ईतर एन.एस.एस च्या वालेंटियर्रस चे सहकार्य प्राप्त झाले.