कोराडी वीज केंद्रात इलेक्ट्रिशियन व फिटर पदासाठी अर्ज केलेल्या शिकाऊ उमेदवारांनी कागदपत्रे सादर करावी: मुख्य अभियंता
महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या आस्थापनेवर २०१८ या सत्रामध्ये इलेक्ट्रिशियनच्या २२ जागा व फिटरच्या १३ जागा शिकाऊ उमेदवार म्हणून भरण्याकरिता कोराडी वीज केंद्र परिपत्रक १८३ दि. ११ जानेवारी २०१८ अन्वये ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सूचना प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्यास ट्रेडनिहाय अनुक्रमे २८६१ व १३९७ इतके ऑनलाईन अर्ज करण्यात आले आहेत.
तरी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांची आय.टी.आय. गुणपत्रिका, आधार कार्ड व आरक्षण अंतर्गत असल्यास जात प्रमाणपत्र इत्यादी मुख्य अभियंता कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोराडी यांचे उर्जाभवन प्रशासकिय कार्यालयातील मानव संसाधन विभागात संबंधित कागदपत्रे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सादर करावी.
तारीखनिहाय कागदपत्रे सादर करण्याकरिता तपशील पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण उमेदवार ६ ऑक्टोबर, महानिर्मितीचे प्रकल्पग्रस्त ७ ऑक्टोबर, प्रकल्पबाधित गावातील उमेदवार ८ ऑक्टोबर, महानिर्मिती कर्मचाऱ्यांचे पाल्य ९ ऑक्टोबर २०१८ निश्चित करण्यात आली आहे. कागदपत्रे सादर न करणाऱ्या उमेदवाराचा निवड प्रक्रियेत विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असे कोराडी वीज केंद्र प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.