चंद्रपूर किल्ल्याच्या भिंतीवर जाहिरात पेन्टीग करणा-यावर गुन्हे दाखल
चंद्रपूर/प्रतिनिधी
शहरातील ऐतिहासीक गोंडकालीन किल्लाच्या भिंतीवर जाहीरातीची पेंन्टीग करण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच समोर आलेले होते. यासंदर्भात आज पुरातत्व विभागाच्या चंद्रपूर शहरातील कार्यालयाकडुन स्थानीक शहर पोलीस स्टेशनला भारतीय पुरातत्व संरक्षण कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

चंद्रपूर शहरातील ऐतिहासीक किल्ला परकोटाची स्वच्छता मागील 500 दिवसापासुन सुरू आहे. खंडहर प्राप्त किल्लाचे गतवैभव प्राप्त करण्याच्या दृष्टीने तसेच पर्यटनाच्या विकास दृष्टीने स्वरूप बदलण्याचे महत्वपूर्ण कार्य इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने सुरू आहे. एकीकडे स्वच्छता होत असतांना मात्र याच किल्ल्याच्या भिंतीवर जाहीरात पेन्टींगचे काम सुरू असल्याची माहीती स्थानीक नागरीकांनी इको-प्रो ला दिली त्याची दखल घेत इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी याची माहीती पुरातत्व विभागाच्या अधिकारी वर्गाला दिली. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी इको-प्रो कडून करण्यात आली होती. त्याची त्वरीत दखल घेत संपुर्ण प्रकरणाची तपासणी पुरातत्व विभागाने केली.
आज स्थानीक शहर पोलीस स्टेशन ला श्री प्रशांत शिंदे, वरिष्ठ संरक्षण सहायक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, चंद्रपूर उपमंडळ, चंद्रपूर यांनी ‘भारतीय प्राचीन स्मारक व पुरातत्व स्थळ अवशेष अधिनिअम 1958 व सुधारीत कायदयानुसार ‘संशोधन आणि विधीमान्यकरण अधिनिअम 2010 च्या कलम 30 (1) नुसार आज गुन्हा दाखल केलेला आहे. यात जाहीरात केलेल्या शहरातील स्थानीक व्यवसायीक प्रतिष्ठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करित आहे.