সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, September 16, 2018

चंद्रपुरच्या ऐतिहासिक वारसा संवर्धनसाठी केंद्र सरकार गंभीर:हंसराज अहीर

हंसराज अहिर यांची केंद्रीय मंत्री डाॅ. महेश शर्मा यांचे सोबत सकारात्मक चर्चा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपुर चा ऐतिहासिक वारसा जतन करण्यास केंद्र सरकार गंभीर असून ना. हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने केंद्रीय सांस्कृतीक व पर्यटन मंत्राी डाॅ. महेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय पुरातत्व विभागाचे केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. चंद्रपुर मधील ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास नागरिकांचा पुढाकार उल्लेखनीय असून सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन ना. डाॅ. महेश शर्मा यांनी दिले.
चंद्रपुर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची ठरलेल्या या बैठकीत चंद्रपुर किल्ला परकोट, गोंडराजे समाधी स्थळ सौंदर्यीकरण, ऐतिहासिक गोंडराजे राजमहल सद्याचे जिल्हा कारागृह, सराय इमारत, रामाळा तलाव, पुरातत्व विभागाचे संग्रहालय, जूनोना जलमहल, भद्रावती विजासन लेणी, संसद आदर्श ग्राम चंदनखेड़ा येथील किल्ला आदि विषयावर सकारात्मक निर्णय झाले.
चंद्रपुर येथील 500 दिवसा पासून सुरु असलेल्या किल्ला स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने तुटलेल्या किल्ला भिंत व बुरुजे यांची त्वरित दुरस्ती करण्याकरिता टप्पा-टप्पाने बांधकाम करण्याचे निर्देश देण्यात आले, किल्ल्याच्या सभोवताल सुरु असलेले संरक्षण भिंतीचे बांधकामास गति देण्यास दोन टप्प्यात 34 कोटिचा निधि मंजूर करण्यात आल्याचे यावेळी सांगितले, किल्ला व संरक्षण भिंत यामधुन पाथ वे , सायकल ट्रैक चा प्राकलन तयार करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या, गोंडराजे समाधी स्थळ येथे उद्यान आणि लाइट, साउंड शो करिता आवश्यक कामे विभाग करेल व गरज असल्यास इतर संस्थेस काम करण्यास परवानगी देण्यात येईल असेही या बैठकीत ठरले. शहरातील कारागृह इतरत्रा हलवून गोंडराजे राजमहल संवर्धन करून पर्यटन दृष्टया संपूर्ण परिसर विकास करण्याबाबत लवकरच केंद्रीय समिति पाहणी करणार आहे, सोबतच ही समिती इको-प्रो किल्ला स्वच्छ्ता अभियान, जटपुरा गेट, जूनोना जलमहल, सराय इमारत, संग्रहालय पाहणी करेल. जूनोना जलमहल विभागाकड़े घेणे आणि सौंदर्यीकरण करणे, सराय इमारतीच्या जतन करण्यास तांत्रिक सहकार्य भारतीय पुरातत्व विभाग देणार असे ठरले. पुरातत्व विभागाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे संग्रहालयाच्या कामास गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
विशेषतः चंद्रपुर मधील गोंड़कालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करिता या महत्वपूर्ण बैठकीस ना. हंसराज अहीर यांचेसह सांस्कृतिक पर्यटन मंत्राी डाॅ. महेश शर्मा, खात्याचे सचिव, भारतीय पुरातत्व विभाग च्या महानिदेशक डाॅ. उषा शर्मा, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे, बिमल शहा, जानबीज शर्मा, जाॅइंट डायरेक्टर, टी जे अलोने, निदेशक, स्मारक, नागपुर सर्कल पुरातत्व अधीक्षक डाॅ. इजराइल हाशमी, प्रशांत शिंदे उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.