সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, September 14, 2018

आजपासुन 'स्वच्छता ही सेवा'अभियान

जिल्हापरिषदेतर्फे वढा येथुन  शुभारंभ

15 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर पर्यंत जिल्हाभर अभियान. प्रत्येक गावात होणार श्रमदान

चंद्रपुर (प्रतिनिधी)  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत संपुर्ण देशात 15 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान चंद्रपुर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार असुन त्याचा शुभारंभ आज चंद्रपुर जिल्हयातील तीर्थक्षेत्र वढा  या गावातुन होणार आहे.  

या कार्याक्रमाला मा. श्री. हंसराज अहीर ,केंद्रीय गृहराज्यमंत्री  भारत सरकार,  मा. श्री. सुधीर मुनगंटीवार , वित्त , वने ,नियोजन महाराष्ट्रराज्य तथा पालकमंत्री जिल्हा चंद्रपुर , श्री. नाना शामकुळे , आमदार चंद्रपुर विधानसभा क्षेत्र  , मा. श्री. देवरावजी भोंगळे,अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपुर,  मा.श्री. कुणाल खेमणार जिल्हाधिकारी चंद्रपुर, मा. श्री. जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषदेतील सर्व सभापती , पंचायत समीती सभापती , उपसभापती व सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

          नागरीकांमध्ये स्वच्छतेबाबतची व्यापक जनजागृती करण्यासाठी सर्वांना स्वच्छतेची शपथ देउन स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत स्वच्छ आरोग्यपुर्ण आणी नवीन भारताच्या निर्मीतीसाठी पुर्ण निष्ठेने आपला परिसर , कार्यालय, सार्वजनिक स्थळी स्वच्छता ठेवण्याचा तसेच स्वच्छतेची आवड अधिकाधिक निर्माण  करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सर्वांनी संकल्प करावा. स्वच्छता ही सेवा अभियान दिनांक 15 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर 2018 या कालावधीत यशस्वीरीत्या राबवावयाचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालये, शाळा, गावांमधील परिसर स्वच्छ सोयींयुक्त करण्यासाठी या अभियानात प्रत्येकाने सक्रीयरीत्या सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

          जिल्हयातील सर्व गावे स्वच्छ करण्याच्या दृष्टीने या अभियानाअंतर्गत ग्रामस्तरीय अधिकारी , कर्मचारी , मुख्याध्यापक , शिक्षक , ग्रामविकास अधिकारी , गटसमन्वयक , समुहसमन्वयक, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका , आशा स्वयंसेविका , रोजगार सेवक हे या अभियानाचे संवादक म्हणुन गावातील लोकप्रतिनिधी , ग्रामपंचायतींचे सदस्य, सरपंच, विध्यार्थी, पालक यांच्याशी संवाद साधुन स्वच्छतेचे महत्व पटवुन देत या अभियानात घेणा-या विविध उपक्रमात सर्वांना उत्स्फुर्तपणे सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

          गाव आणी तालुका पातळीवर स्वच्छता मेळाव्याचे आयोजन , शौचालयांना शंभर टक्के वापर करणा-या ग्रामपंचायतीतील सरपंच , सदस्य, ग्रामसेवक, गावकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे.  गृहभेटी अंतर्गत आंतरव्यक्ती संवादातुन उदबोधन , शौचालय वापर, ग्रामस्तरीय वातावरण निर्मीतीसाठी ग्रामसभा घेणे , कलापथकाच्या माध्येमातुन  , लघुपट दाखविणे , शालेय विघ्यार्थ्यांची गावातुन स्वच्छता फेरी , गावातील ग्रामस्थांनी गावातच श्रमदान करणे, गावातील सार्वजनीक शौचालय , बसस्थानक, बाजाराची ठीकाणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या , पाण्याच्या स्त्रोतांचे परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. जनजागृतीवर प्रामुख्याने भर देउन शालेय स्वच्छता दुत, पाणी व स्वच्छता या विषयांवर वक्तृत्व व  निबंध स्पर्धा  , चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , या विविध उपकमांचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन , जिल्हा परिषद यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

 

 

 

चंद्रपुर जिल्हयात आज स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ वढा या तीर्थक्षेत्रापासुन होणार असुन , स्वच्छता ही राष्ट्रभक्ती  आहे त्यामुळे सर्वांनी यात सहभागी होउन मोठया प्रमाणात लोकसहभाग देउन व्यापक स्वच्छतेची चळवळ निर्माण करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.