इको-प्रोचीच्या मागणीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पंतप्रधानांकङे पाठपुरावा
संग्रहित |
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातिल गोंडकालिन ऐतिहासिक ‘बालेकिल्ला-राजमहल’मधील ‘जिल्हा कारागृह’ स्थानातरीत करण्याची मागणी इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचेकडे केलेली आहे सदर विषयाबाबत त्वरीत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
चंद्रपूर शहरातिल गोंडकालिन ऐेतिहासिक वारसा संरक्षण व संवर्धन करण्यासाठी इको-प्रो संस्था प्रयत्नशिल आहे. याचाच एक भाग म्हणुन गोंडकालिन ऐतिहासिक किल्ला-परकोटाचे मागील 500 दिवसापासुन सातत्याने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मात्र चंद्रपूर शहर तसेच जिल्हयातील अनेक ऐतिहासिक वारसा अदयापही दुर्लक्षीत व उपेक्षितच आहे.
चंद्रपूर शहरातिल गोंडराजे यांचा राजवाडा किंवा बालेकिल्ला येथे ब्रिटीश काळापासुन कैदयाचे कारागृह बनवुन त्यात कैदयांना ठेवण्यात येत आहे. स्वांतत्रप्राप्तीनंतर सुध्दा ‘जिल्हा कारागृह’ याच राजवाडयात अजुनही कायम आहे. चंद्रपूर वैभवशाली व गौरवपुर्ण इतिहास आपणास जतन करून पुढच्या पिढीपर्यत पोहचवावा लागेल याकरिता शासनाने आग्रही भुमीका घेणे अत्यंत गरजेचे आहे.
चंद्रपूरचा गोंडकालीन इतिहास म्हणजे आदीवासी गोंडराजे यांनी आपले राज्य निर्माण करीत एखादया भुप्रदेशावर 550 वर्ष राज्य करावे असा इतिहास देशात आणी जगात क्वचितच मिळेल. गोंडराज्यांनी चंद्रपूर, विदर्भासह छत्तीसगडपर्यत आपले राज्य विस्तारले होते. गोंडराज्यांचा उल्लेख अनेक तत्कालिन पत्रव्यवहार, बखरी, पोवाडे तसेच इतिहासकार यांनी नोंद घेतलेली आहे. चंद्रपूरच्या क्षेत्रात 11 किमी लांबीचा परकोट, समाध्या, मंदीरे अनेक वास्तु बांधलेल्या आहेत. ते आजही भक्कम स्थितीत असुन गोंडकालीन वैभवशाली गौरवपुर्ण इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.
यासोबतच गोंडराजे हिरशहा (इ.स. 1497-1572) यांनी आपली राजधानी बल्लारपुरहुन चंद्रपूर येथे हलवुन सुरू असलेल्या चंद्रपूरच्या तटाचे कामास सुरूवात केली. या किल्लाचे तटासोबतच चार दरवाजे आणी पाच खिडक्याचे बांधकाम केल्यानंतर तटाच्या आत राहण्यास राजमहल-बालेकिल्ल्याचे बांधकाम केले. या बालेकिल्लातुनच पुढे चंद्रपुर राज्यांचा राजकारभार चालत असे. पुढे 1751 मध्ये भोसल्यासोबत झालेल्या युध्दात गोंडराज्य हे भोसल्यांच्या ताब्यात गेले तेव्हा येथे याचा उपयोग फौजफाटा व दारूगोळा ठेवण्यास होत होता. मात्र 1818 मध्ये मराठे-इंग्रज युध्दात चंद्रपूरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेले तेव्हा हा राजवाडा इंग्रजांनी उध्वस्त केलेला होता. यांनतर याचा वापर इंग्रजांनी कारागृह तयार करून कैदीना ठेवण्यासाठी केला.
परंतु, आज देश स्वतंत्र होऊन 72 वर्ष लोटली असतांना सुध्दा गोंडराज्याचे ऐतिहासिक वारसा असलेले बालेकिल्ला-राजमहल’ मात्र कारागृहच आहे. कधी काळी या राज्यांचे राजे, राजपरिवार राहत असतिल तिथे मात्र विवीध गुन्हयातील शिक्षा भोगणारे कैदी राहत आहेत. शासनाचे धोरण असतांना सुध्दा अदयापही अशी कारागृहे शहराबाहेर हलविण्यात आलेली नाहीत ही शोकातिंकाच म्हणावे लागेल. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांना पर्यटकांना वंचीत राहावे लागत आहे. सदर ‘बालेकिल्ला-राजमहल’ कारागृह मुक्त करण्याची गरज आहे. अशी मागणी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी निवेदनातुन केलेली आहे.