সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, September 07, 2018

शिक्षक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कारंजा/प्रतिनिधी:
विद्यार्थ्यांनामध्ये शिक्षकांविषयी वैचारिक दिशा बदलावी आणि आपल्याला घडविणाऱ्या शिक्षका विषयी विचार व्यक्त करण्याच्या हेतूने वर्ग ६ ते ९ च्या विद्यार्थ्यांकरिता शालेय स्तरावर सनशाईन स्कुल, कारंजा च्या वतीने वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. वर्ग ६ व ७ च्या गटाकरिता " प्रगति पथावरील दीपस्तंभ म्हणजे शिक्षक!"हा विषय होता ज्यामध्ये प्रथम क्रमांक कु. खुशी महिले, द्वितीय ओम विरुळकर आणि तृतीय क्रमांक कु. लावण्या मुने तसेच वर्ग ८ व ९ करिता "तंत्रज्ञान युगातील शिक्षक आणि शिक्षणातील गरूड झेप!" या विषयावर मत व्यक्त करतांना प्रथम क्रमांक कु.श्रेया जाधव, द्वितीय क्रमांक शुभम गुप्ता व तृतीय क्रमांक हितेश मालखेडे व तनुश्री रमधम यांची निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून प्रा. सौ. पखाले व सौ. इंदिरा कालभुत उपस्थित होत्या, या प्रसंगी उपस्थित संस्थाध्यक्ष प्रेम महिले, मुख्याध्यापिका सौ. संगीता चाफले व उपस्थित शिक्षकांनी सर्व विजेते व सहभागी विदयार्थी यांचे अभिनंदन केले. या प्रसंगीं बोलताना परीक्षकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संचालन वर्ग ७ ची विद्यार्थ्यांनी कु. सिद्धी कापगते व वर्ग ६ ची विद्यार्थ्यांनी कु. खुशी महिले यांनी केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.