- नागपुर -अमरावती महामार्गावरिल खापरी (बारवकर)येथे मराठा आरक्षण समर्थक आंदोलकांचा चक्का जाम
- वाहनांच्या लांबच लांब रांगा!
- पोलिसांनी काढली समजुत
- आंदोलक उग्र मात्र कोणतिही अनुचित घटना घडली नाही
- छत्रपती शिवरायांच्या नांवाचा जय घोषमात्र महाराष्ट्र शासन मुर्दाबाद चे नारे
वार्ताहर -कोंढाळी/गजेंद्र डोंगरे
: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाच्या गगन भेदी जय घोषा सोबतच एक मराठा लाख मराठा च्या उद् घोषांनी बुधवारचे दुपारी 12-30वाजता नागपुर - अमरावती -मुंबई महामार्ग क्र सहा वरील कोंढाळी नजिकच्या खापरी (बारवकर)-चंदनपारडी चौफूली जय -जय- जय- जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे घोषांनी दणानून गेले. या प्रसंगी मराठा आरक्षण आंदोलकानी राष्ट्रिय महामार्गावर गनिमी काव्याने मालवाहू व ट्राक्टर ची मोठ मोठी टायर महामार्गाच्या जानारी व येणार्या मार्गावर पोलिस घटनास्थळी पोहन्या पुर्विच महामार्गाच्या पुर्ण लेन वर टायर पेटविल्याने महामार्ग बाधित झाला होता. या प्रसंगी आंदोलक फारच आक्रमक असले तरी महामार्गावरील ऋग्णवाहिकांना मार्ग कढून देत होते तर आंदोलकानी अन्यवाहनांना ईजा न पोहचविता आपले आंदोलन उग्र केले , या घटनेची माहितक मिळताच काटोल चे उपविभागिय पोलीस अधिकारी विक्रम कदम व कोंढाळी चे ठाणेदार अजय अहिरकर आपल्या पोलिस ताफ्या सह घटना स्थळ गाठून उग्र आंदोलकांची जमजुत काढून महामार्गावरील पेटते टायर महामार्गावरून हटवुन महामार्गावरिल खोळंबलेली वाहतुक सुरू केली. या प्रसंगी सुजित बारवकर, रवी गुंड,अनिल बारवकर, कार्तिक अहिरराव, निखील जाधव सह शेकडो आंदोकांनी आरक्षण समर्थनार्थ व महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत मार्ग मोकळा केलाया प्रसंगी विजयसिंह रणनवरे, बाळासाहेब जाधव, रणजीत गायकवाड सह सेकडो मराठा आंदोलकांनी आंदोलन केले.
नागपुर -अमरावती महामार्ग मोकळा झाल्यावर कोंढाळी पोलीसांनी-या प्रकरणी कलम 143 ,341,135 प्रमाणे ए कुन 17 आंदोलन कार्त्यांवर-कार्यवाही केलयाची माहिती कोंढाली पोलीस यांनी दिली आहे