मंगरुळ-वडद येथील तलावातील घटना
बुटीबोरी, : मंगरुळ-वडद तलावावर पार्टीसाठी गेलेल्या आशीर्वादनगरातील सहा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 22) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. सर्व मृत तरुण 20 ते 22 वयोगटातील असून, नागपुरातील आशीर्वादनगरातील रहिवासी आहेत. त्यामुळे या परिसरावर वृत्त धडकताच शोककळा पसरली.
नागपूर-वर्धा मार्गावरील डोंगरगावपासून आठ किलोमीटर अंतरावर मंगरुळ गाव आहे. तिथे डोंगरपायथ्याशी निसर्गरम्य तलाव असल्याने वन्यजीवांची भ्रमंती होत असते. येथे नेहमी पर्यटक येत असतात. रविवारी सुटीचा दिवस असल्याने नागपुरातील आशीर्वादनगरातील अकरा तरुण फिरण्यासाठी या परिसरात गेले होते. भोजनानंतर त्यांना मासेमारीचा मोह झाला. त्यापैकी सात जण नावेत बसले. काही दूर गेल्यानंतर नावेत पाणी शिरल्याने नाव एका बाजूला झुकल्याने ते सर्व जण पाण्यात पडले. सातपैकी केवळ एक जण सुदैवाने बचावला. मृतांमध्ये चेतन आदमने, हर्षल आदमने, मकसूद शेख, गोवर्धन खेटे, राहुल बानोदे, रामा शिवरकर यांचा समावेश आहे. यातील चेतन व हर्षल आदमने हे सख्खे भाऊ आहेत.
सायंकाळ झाल्यानंतरही मुले घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, घटनास्थळ नेमके कोणत्या पोलिस ठाण्यात येते यावरून बुटीबोरी, कुही, उमरेड पोलिसांत संभ्रम होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तिन्ही पोलिस ठाण्यांचे ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागले नव्हते. सोमवारी सकाळपासून मृतदेहांची शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. मृतांतील दोघे जण ऑटोचालक, तर उर्वरित शिक्षण घेत होते.