पुतळ्यावर धूळ अन् कुजलेल्या माळा हे वृत्त सकाळने प्रकाशित केल्यानंतर शहरातील पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव मनपाने ठेवला आहे. चार महिन्यानी आली पुतळ्यांचे सौंदर्यीकरणसाठी मनपाला जाग आली आहे . यात मुख्यत: गांधी चौकातील महात्मा गांधींचा पुतळा, आझाद बागेतील महात्मा ज्योतिबा फुले व नेताजी सुभाषचंद्र बोस, जटपुरा गेट परिसरातील महात्मा गांधी, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे तसेच बागेजवळच्या राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या पुतळ्याचा यात समावेश आहे.
१६ मे २०१३ रोजी प्रकाशित वृत्त
पुतळ्यावर धूळ अन् कुजलेल्या माळा
चंद्रपूर : राष्ट्रहितासाठी आपले आयुष्य वेचणाèयांच्या कार्याची आठवण नव्या पिढीला होत राहावी, म्हणून या थोर महात्म्यांचे पुतळे बांधण्यात येतात. मात्र, जयंती आणि पुण्यतिथीशिवाय इतर दिवशी त्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने पुतळ्यांवर सध्या प्रदूषणाची धूळ आणि कुजलेल्या माळा दिसत आहेत.
महात्मा गांधी
शांतीच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाèया राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे शहरात तीन पुतळे आहेत. गांधी चौकात महानगरपालिकेच्या नवीन वास्तूसमोर हा संगमवरी दगडांचा पुतळा आहे. जयंती,पुण्यतिथीशिवाय स्वातंत्र्यदिन आणि गणराज्यदिनी गांधीजींच्या पुतळ्याला माळा घालून नमन केले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणारे मोर्चे गांधी चौकातूनच निघत असल्याने आंदोलनकर्ते याच पुतळ्याला माळ चढवून आंदोलनाला प्रारंभ करतात. सध्या या पुतळ्यावर चंद्रपूरच्या प्रदूषणाची धूळ माखलेली आहे.
गांधीजींचा दुसरा पुतळा राजीव गांधी कामगार भवनात आहे. काँग्रेसचे कार्यक्रम वगळता येथे अन्य कुणी माळा चढवीत नाहीत. तिसरा पुतळा शहराच्या दर्शनी भागात आहे. महात्मा गांधी जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त जटपुरा गेटसमोर महात्त्मा गांधीजींचा पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण दोन ऑक्टोबर १९६९मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते, तर ग्रामविकासमंत्री नरेंद्र तिडके यांच्या उपस्थितीत झाले होते. शहरात प्रवेश करताना जटपुरा गेटसमोर काळ्या रंगात हा पुतळा आहे. येथे नियमित देखभाल असते. त्यामुळे पुतळ्यावर धूळ qकवा कुजलेल्या माळा दिसत नाहीत.
----------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
गांधी चौकातून जटपुरा गेटकडे जाताना गोलबाजारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण २० मे १९६९ रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले. तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, रिपब्लिकन पक्षाचे नेते बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे हेसुद्धा उपस्थित होते. दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुवर्तनदिन, सहा डिसेंबर महापरिनिर्वाणदिन, १४ एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीदिनी या पुतळ्यासमोर अनुयायी मोठ्या संख्येने नतमस्तक होतात. सध्या पुतळ्यावर रस्त्यावरील धूळ आणि कुजलेले हार गेल्या अनेक दिवसांपासून आहेत.
-----------
महात्मा जोतिबा ङ्कुले/नेताजी सुभाषचंद्र बोस
आझाद बागेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असून, त्याचे अनावरण नऊ मार्च १९६८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाले होते. सध्या या पुतळ्याची रंगरंगोटी जुनी झाली आहे. याच दिवशी बागेतच महात्मा जोतिबा ङ्कुले यांच्याही पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या पुतळ्याचीसुद्धा तीच अवस्था आहे.
------------------
राजे विश्वेश्वरराव महाराज
अहेरी संस्थानचे राजे विश्वेश्वरराव महाराज हे चंद्रपूर-गडचिरोली माजी खासदार होते. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून आझाद बागेच्या कोपèयात मुख्य मार्गावर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार qशदे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. मात्र, आज या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्याच्या माहिती ङ्कलकावरील अक्षरेच गायब झाली आहेत. येथे केवळ वर्षातून जयंती आणि पुण्यतिथी दोनच दिवशी माळ घातली जाते. वर्षभर पुतळ्याकडे कुणीच लक्ष देत नाही. त्यामुळे कुजलेल्या माळा तशाच गळ्यात पडून आहेत. पुतळ्याची रंगरंगोटीसुद्धा करण्यात न आल्याने प्रतिमेची अवमानजनक स्थिती झाली आहे.
-----------------------
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते, राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृतिनिमित्त स्मारक समितीच्या वतीने आझाद बागेत पूर्णाकृती बांधण्यात आला. त्याचे अनावरण २५ सप्टेंबर १९८७मध्ये भारताचे तत्कालीन ऊर्जामंत्री वसंतराव साठे यांच्या हस्ते झाले होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तत्कालीन अध्यक्ष जे. ईश्वरीबाई यांची उपस्थिती होती. सध्या या पुतळ्यावरही कुजलेले हार अनेक दिवसांपासून तसेच पडून आहेत.
इंदिरा गांधी
प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहाच्या समोर इंदिरा गांधीजींचा पुतळा आहे. त्याचे भूमिपूजन तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सरोजताई खापर्डे यांच्या हस्ते १८ ङ्केब्रुवारी १९८७ मध्ये झाले होते. अनावरण सोहळ्याला केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे आणि माजी मंत्री वामनराव गड्डमवार यांची उपस्थिती होती. आज या पुतळ्यावरही धूळ माखलेली आहे.