সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, October 22, 2012

लोककला बदलली, पण तारीख बदलेना

झाडीपट्टी रंगभूमित भाऊबिजेपासून सुरू होणार नाट्यप्रयोग
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर, ता. २१ : प्रकाश, ध्वनी आणि रंगमंचाची व्यवस्था नसतानाही केवळ मनोरंजनासाठी सुरू झालेल्या झाडीपट्टीच्या लोककलेत अनेक बदल झालेत. पूर्वीच्या दंडार आणि तमाशातून नाटकात रुपांतरीत झालेल्या रंगभूमिने आज नवा आयाम घेतला. मात्र, मंडई आणि शंकरपटानिमित्त होणाèया या नाटकांच्या गावातील तारखा आजही बदलेल्या नाहीत. ही परंपरा अनेक गावांत आजही कायम असून, एकाच रात्री बहुनाटकांचा विक्रम करणाèया कुरुड येथेही ङ्केब्रुवारी महिन्याच्या दुसèया गुरुवारीच आयोजन होते.

दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या झाडीपट्टी रंगभूमीची ख्याती सर्वदूर आहे. झाडीपट्टीत दरवर्षी भाऊबिजेपासून नाटकांचा मोसम सुरू होतो. पूर्वविदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली चारही जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये नाटकाचे आयोजन केले जाते. या परिसरातील शेतकèयांना रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी, नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. स्थानिक बोली, स्थानिक कलाकार, नृत्य आणि संगीत, तसेच पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील नाटके ही या रंगभूमीची खासियत आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ ही परंपरा येथे टिकून आहे. प्रकाश, ध्वनी व्यवस्था नसताना मनोरंजनासाठी दंडार हा प्रकार खेड्यात सुरू झाला. दंडारीचे रूपांतर तमाशात आणि तमाशाचे रूपांतर नाटकात झाला. या झाडीपट्टीची आणखी एक विशेषता म्हणजे नाटकांच्या तारखा. गावात होणारे शंकरपट आणि मंडई हे दरवर्षी एकाच तारखेला भरविले जाते. त्यामुळे रात्रीला होणाèया नाटकांची तारीख कधीच बदलत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम असल्याने नाट्यरसिकांना कोणत्या गावात कधी नाटक असते, हे तोंडपाठ असतेच. एकाच रात्री बहुनाटकांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील कुरुड हे गाव प्रसिद्ध आहे. येथे ङ्केब्रुवारी महिन्याच्या दुसèया गुरुवारी नाट्यप्रयोग होतात. वडेगाव (ता. तिरोडा) आणि सालेभाटा (ता. लाखणी) येथे दरवर्षी भाऊबिजेच्या दुसèया दिवशी नौटंकी हा कार्यक्रम होतो. स्थानिक कलावंत qहदी-मराठी गाण्यांना बोलीभाषेचा रंग चढवून रात्रभर जागर करतात. हा नौटंकीचा कार्यक्रम मकरसंक्रतीपर्यंत कोणत्याना कोणत्या गावात सुरूच असतो. चंद्रपूर जिल्ह्यात मकरसंक्रांतीपासून शंकरपटांना प्रारंभ होतो. जिल्ह्यातील देलनवाडी येथे १७ आणि १८ रोजी एकाच रात्री तीन नाटकांचे आयोजन केले जाते. जिल्ह्यात कुकुडहेटी येथील २६ जानेवारीला होणारा शंकरपट प्रसिद्ध आहे. यंदा १५ नोव्हेंबरपासून नाटकांना प्रारंभ होत आहे. त्यासाठी महिन्याभरापूर्वीपासूनच बुकींग केली जात आहे. देसाईगंज वडसा येथील राजसा नाट्यमंडळाचे यंदाचे पहिले नाटक रामाटोला (जि. गोंदिया) येथे १६ नोव्हेबर रोजी होईल, तर लोकजागृती नाट्यमंडळ १५ नोव्हेंबर रोजी मुरदोली (ता. देवरी) येथे प्रारंभ करेल.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.