गुणी प्रियांकाने काढले मायबापाचे नाव
-
Tags: football competition, priyanka, chandrapur, vidarbha
वडील दिवसभर लाकडावर करवत फिरवून सुतारकाम करतात आणि आई अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करते. तुटपुंज्या कमाईवर चालणाऱ्या कुटुंबातील प्रियांकाला परदेशात जाण्याची संधी आली. मात्र, जिथे दोन वेळ खाण्याची चिंता. तिथे परदेशात जाण्याचे स्वप्न म्हणजे फुकटचा टाइमपास! मात्र, प्रियांकाचे हे स्वप्न पूर्ण झाले. युवाशक्तीकडून मदत मिळाली अन् प्रियांका जर्मनीला चालली आहे.
समाधी वॉर्डातील काळाराम मंदिराजवळ राहणारे विठ्ठल वांढरे हे सुतारकाम करतात. पत्नी शारदा या अंगणवाडीत मदतनीस आहेत. प्रियांका ही त्यांची मुलगी. ती एफ. ई. एस. गर्ल्स महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षाला शिकते आहे. प्राथमिक शिक्षण घेत असताना ती खो-खो, कबड्डी खेळायची. पुढे व्हॉलीबॉल खेळू लागली. यात तिने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. खेळातील तिचे कौशल्य पाहून महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक वानखेडे यांनी तिला फुटबॉलकडे वळविले. त्यातही ती पारंगत झाली. यंदा नागपूरच्या क्रीडा विकास संस्थेतर्फे तिला चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यातही तिने सर्वांना जिंकले. त्यातूनच जर्मनीतील बर्लिन येथे होणाऱ्या डिस्कवर फुटबॉल वुमेन्स टुर्नामेंटसाठी तिची निवड झाली. त्यासाठी पाच हजार रुपये नोंदणी शुल्क, 50 हजार रुपये प्रवास, निवास, साहित्य खर्च आणि एक लाख रुपये अतिरिक्त खर्च होता. यातील एक लाख रुपये क्रीडा विकास संस्थेने भरले. मात्र, उर्वरित 60 हजार रुपयांचा खर्च कुठून करायचा, याची चिंता प्रियांकाचे वडील विठ्ठल वांढरे यांना लागली होती. त्यामुळे ते खासदार-आमदारांच्या दारी फिरत होते. माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पाच हजार रुपये, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पाच हजार आणि आमदार विजय वडेट्टीवारांनी पाच हजार रुपये दिले. मात्र, ही रक्कम कमीच पडत होती. अशातच ऍड. महेश काबरा यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी युवाशक्तीचे अध्यक्ष बंटी भांगडिया यांच्याशी बोलणे करून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी उर्वरित संपूर्ण खर्च युवाशक्ती करेल, असे आश्वासन देत 50 हजार रुपयांचा धनादेश दिला. वेळेत मिळालेल्या या मदतीमुळे प्रियांकाला जर्मनीला जाण्याची संधी मिळाली आहे. संबंधित बातम्या
प्रतिक्रिया
On 01/06/2011 11:38 AM amol said:
हे एक प्रेरणा देणारी घटना आहे.परिस्थिती शी लडून कसा विकार सादावा हे चंद्रपूर वासियान साठी चांगले उदहरण आहे.
On 01/06/2011 09:41 AM renuka said:
अभिनंदन....Best luck
On 01/06/2011 09:09 AM Bhagyesh said:
Good , keep it up