वडिलांचे नाव - आनंदराव चव्हाण
आईचे नाव - श्रीमती प्रेमलाताई चव्हाण
जन्मतारीख - 17 मार्च 1946
जन्मठिकाण - इंदोर (मध्यप्रदेश)
पत्नीचे नाव - श्रीमती सत्त्वशीला
मुले - एक मुलगा, एक मुलगी
कायमचा पत्ता - पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड. जि. सातारा (महाराष्ट्र), 415410.
सध्याचा पत्ता - 11, रेस कोर्स रोड, नवी दिल्ली 110001.
शिक्षण - कऱ्हाड नगरपालिका शाळा क्रमांक सातमध्ये सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण दिल्ली येथे, त्यानंतर बी. ई. (ऑनर्स), एम. एस. (बीआयटीएस) पिलानी (राजस्थान) आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ (अमेरिका).
व्यवसाय - इंजिनिअर, टेक्नॉलॉजिस्ट
कारकीर्द
1991-1995, 1995-1998 - लोकसभा सदस्य, सायन्स व टेक्नॉलॉजीच्या मंत्रालयाचे सल्लागार समिती सदस्य
1992-93 - इलेक्ट्रॉनिक ऍटोमिक एनर्जीचे मंत्रालयाचे सल्लागार सदस्य
1994-1996 - सायन्स, माहिती आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वनखात्याच्या मंत्रालयातील सल्लागार समितीचे सदस्य
1995-96 - अर्थ आणि नियोजन मंत्रालयातील स्थायी समितीचे सदस्य, ग्रामीण आणि शहरी भाग मंत्रालयातील रचनात्मक विकास समितीचे सल्लागार सदस्य, सार्वजनिक विकास क्षेत्रातील समितीचे सल्लागार सदस्य, कनिष्ठ कायदा मंडळाचे विशेष निमंत्रीत, व्यवसाय मार्गदर्शन समितीचे सदस्य
1996-99 - कॉंग्रेसचे सचिव, संगणक पुरवठा समिती सदस्य
1997 - विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मूलभूत विकासासह त्याच्या धोरणाच्या अंमलबजावणी समितीचे सल्लागार सदस्य
1998-99 - राज्यसभा सदस्य. केंद्रीय गृहखात्याच्या विविध धोरणांच्या समितीचे सदस्य, 1998-99 व एप्रिल 2002 ते फेब्रुवारी 2004 ः अर्थ नियोजन समितीचे सल्लागार सदस्य. 2000-2001 - कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते.
एप्रिल 2002 - राज्यसभा सदस्य
ऑगस्ट 2002 ते फेब्रुवारी 2004 - संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य
मे 2004 ते 22 मे 2009 व 28 मे 2009 ते आजपर्यंत - पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री
क्रीडा व अन्य क्षेत्र -
सदस्य- इंडियन इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली, इंडियन हॅबीटॅट सेंटर नवी दिल्ली, जिमखाना क्लब नवी दिल्ली
परदेश दौरे - अमेरिका, फ्रान्स, जपान, इंग्लंड, पाकिस्तान, बांगला देश, तैवान, जर्मनी, श्रीलंका, नेपाळ, ओमन, बहामास, चीन, हॉंगकॉंग, इंडोनेशिया, इटली, मलेशिया, नेदरलॅंड, पनामा, पोतुर्गाल, सिंगापूर, स्विर्त्झलॅंड, तजाकीस्तान, थायलंड.
पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असलेली सध्याची खाती -
* पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री
* विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
* भूविकास शास्त्र विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
* पर्सोनेल पब्लिक ग्रॅव्हन्सी ऍण्ड पेन्शन विभागाचे राज्यमंत्री
* संसदीय कार्यालयीन मंत्री
पृथ्वीराज चव्हाण -
अभ्यासू, देशपातळीवर काम केलेला नेता अशी प्रतिमा.
निर्विवाद निष्ठावान घराणे.
वडील दाजीसाहेब ऊर्फ आनंदराव चव्हाण हे पंडित नेहरूंपासून 11 वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात.
आई प्रेमलाकाकी चव्हाण खासदार.
1991, 96 आणि 98 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी.
2002 पासून आजपर्यंत राज्यसभा सदस्य.
2009 पासून केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान कार्यालयाबरोबरच विज्ञान तंत्रज्ञान, संसदीय कार्य, कार्मिक आदी खात्यांचे राज्यमंत्री.
अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस.
हरियाना आणि जम्मू-काश्मीर राज्याचे प्रभारी.