आज दि.26 नोव्हेंबर2018 रोजी जि.प.प्राथमिक शाळा शिरकळस ता.पूर्णा येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संविधान दिनाचे औचित्य साधून संपूर्ण गावात संविधान जनजागरण रॅली शाळेमार्फत काढण्यात आली.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच श्री संजयराव भोसले यांची उपस्थिती लाभली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री विष्णुपंत भोसले,श्री रामप्रसाद भोसले तसेच पत्रकार श्री धम्मपाल हनवते यांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रम प्रसंगी प्रास्तविक श्री पवार महेश सर यांनी मांडले तर विद्यार्थ्यांना मु.अ.श्री ब्रह्मा ढगे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.संविधानाची उद्देशिका म्हणून या संविधान दिनाची सांगता करण्यात आली.
Monday, November 26, 2018
भव्य राम मंदिर निर्माण हेतू संकल्प यात्रा व महाआरती
by खबरबात
मनोज चीचघरे/पवनी(भंडारा):
भव्य राम मंदिर निर्माण हेतू संकल्प यात्रा व महाआरती च्या दरम्यान भारतीय विद्यार्थी सेना व शिवसेना पवनी तालुका तफेँ भव्य श्रीराम रॅली पवनी नगरमध्ये मीरवनूक करण्यात आली, पवनी नगरीत श्रीरामच्या घोषणा देण्यात आले जय महाराष्ट्रच्या गर्जनेने संपूर्ण पवनी नगरीत वातावरण भगवामय झाले होते. श्री राम मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली, जय श्रीराम, जय हिंदूराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र अशा घोषणा देण्यात आल्या, या कार्यक्रमामध्ये प्रशांत भाऊ भुते उप तालुका प्रमुख पवनी, विजय भाऊ काटेखाये तालुका प्रमुख पवनी, जितेश खार, विद्यार्थी सेना भंडारा नरेश बावनकर, भोजराज वैद्य, सुमेद खान, देवराज बावनकर, परसराम बावनकर मोठ्या संख्येने विद्यार्थी सेना व शिवसेनेचे कार्यकरते उपस्थित होते.
भव्य राम मंदिर निर्माण हेतू संकल्प यात्रा व महाआरती च्या दरम्यान भारतीय विद्यार्थी सेना व शिवसेना पवनी तालुका तफेँ भव्य श्रीराम रॅली पवनी नगरमध्ये मीरवनूक करण्यात आली, पवनी नगरीत श्रीरामच्या घोषणा देण्यात आले जय महाराष्ट्रच्या गर्जनेने संपूर्ण पवनी नगरीत वातावरण भगवामय झाले होते. श्री राम मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली, जय श्रीराम, जय हिंदूराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र अशा घोषणा देण्यात आल्या, या कार्यक्रमामध्ये प्रशांत भाऊ भुते उप तालुका प्रमुख पवनी, विजय भाऊ काटेखाये तालुका प्रमुख पवनी, जितेश खार, विद्यार्थी सेना भंडारा नरेश बावनकर, भोजराज वैद्य, सुमेद खान, देवराज बावनकर, परसराम बावनकर मोठ्या संख्येने विद्यार्थी सेना व शिवसेनेचे कार्यकरते उपस्थित होते.
Sunday, November 25, 2018
महानिर्मिती नाट्यस्पर्धेला सोमवारपासून नाशिक येथे सुरुवात
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:
एकलहरे येथील महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रातर्फे उद्यापासून (२६ नोव्हेंबर) राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत दहा नाटके सादर होणार असून महाकवी कालिदास कलामंदिर येथे ३० नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे.
26 ते 30 नोव्हेम्बर दरम्यान राज्यभरातील महानिर्मितीच्या चंद्रपूर,कोराडी,खापरखेडा,पारस,भुसावळ, परळी,मुंबई,उरण,पोफळी आणि नाशिक असे एकूण 10 नाट्यसंघ आपल्या नाट्यकलेचे प्रदर्शन करणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सकाळी १० वाजता महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंह यांच्या हस्ते होणार आहे. औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे अध्यक्षस्थानी असतील. प्रकल्प संचालक विकास जयदेव, वित्त संचालक संतोष आंबरेकर, सतीश चवरे, कैलास चीरूटकर, नितीन नांदूरकर, संजय मारूडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोमवारी चौकशी, चिसौकां ही नाटके सादर होणार आहेत
सायंकाळी 5 वाजता कोराडी विद्युत केंद्रातर्फे "चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी"हे नाटक सादर करण्यात येणार आहे.
26 नोव्हेम्बरला नाट्यस्पर्धेचे उद्धघाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसनीस यांचे हस्ते होणार आहे तर परीक्षक म्हणून
संजय आर्विकर (नागपूर) जुगलकिशोर ओझा (कराड़)
सुजाता देशमुख (नाशिक) हे कार्यभार सांभाळणार आहेत.
तर २७ नोव्हेंबरला ४७ एके ४७, दी गेम ऑफ डेस्टिनी ही नाचके सादर होतील. २८ नोव्हेंबरला षडरूपी, अश्वथा, २९ नोव्हेंबरला पारध, गेट वेल सून आणि ३० नोव्हेंबरला प्रतिबिंब, शूऽऽ कुठे बोलायचं नाही ही नाटके होणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शुक्रवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे. ही नाटक सर्वांसाठी मोफत होणार असून अधिकाधिक रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे
को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या एटीएमचे उद्घाटन
by खबरबात
मनोज चीचघरे/पवनी (भंडारा):
दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटिव बँक भंडारा शाखा आजगाव एटीएम चे उद्घाटन व शेतकरी जनजागृती समारंभचे मा, ,माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रफूल भाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रम चे अध्यक्ष मा, विलास भाऊ श्रृंगारपवार, माजी राज्यमंत्री विषेश अतिथी
मा, बंडुभाऊ सावरबांधे,
माजी राज्यमंत्री, नानाभाऊ पंचबूधे माजी राज्यमंत्री ,मा अशोक मोहरकर,मा लोमेश भाऊ वैद्य, तोमेश्वर पंचभाई पं,सं,सदस्य पवनी सौ, चित्राताई सावरबांधे, जि.प.सदस्य भंडारा मानीकराव ब्राम्हणकर,विवेकानंद कुझ्ँकर जि.प.उपाध्यक्ष विजय सावरबांधे, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी व समस्त सचांलक मंडळ बीडीसीसीचे सुनील भाऊ फूडे,सदाशीव वलधरे,संजय बंरडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
जीवनातील व्यथांचे उत्तर रामकथेत: मुरलीधरजी महाराज
by खबरबात
चंद्रपूर /प्रतिनिधी:
जीवनातील व्यथांचेे उत्तर राम कथेत आहे,मनुष्य जीवन निश्चतच अमुल्य आहे, मनुष्य जीवन अनेक व्यथामुळे कठिण वाटते.या व्यथा नष्ट करण्याचे उत्तर श्री रामकथेत आहे,असे प्रतिपादन पूज्य संत मुरलीधरजी महाराजांनी केले यांनी राम कथा महोत्सव च्या दुसऱ्या दिवशी कथा सांगतांना केले.
स्थानिक चांदा क्लब ग्राउंडवर श्री राम सेवा समिती तर्फे 9 दिवसीय राम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी ते बोलत होते.
कथेच्या प्रारंभी आयोजक रघुनाथ मुंदडा परिवाराच्या हस्ते श्री राम चरित्र मानस ग्रंथाचे पूजन करण्यात आले . त्यानंतर सामुहिक हनुमान चालीसा पठण करून श्री मुरलीधरजी महाराज यांनी कथेला सुरुवात केली.उपस्थित
शेकडो राम भक्तांना राम कथा सांगतांना ते म्हणाले, मनुष्य जीवन परमेश्वराला मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे,पाप आणी पुण्य हे मनुष्य करू शकतो या जीवनात विवेकाचा उपयोग करतो, प्राणी असे करू शकत नाही त्यामुळे मनुष्य जीवनात हरी नाम स्मरण करावे. या जगात राम नामच आपले सर्व काही आहे, बाकी सर्व या जगात राहून जाईल. जे आपले नाही त्या मागे न धावता राम नामाचा जप कामी येईल. प्रति स्पर्धेत लोक धनाच्या मागे लागले आहे, परंतू जीवनात धन कामी येत नाही ज्याच्या जवळ धन आहे तो भजन करू शकत नाही,भजन करण्यासाठी मन पाहिजे.
संपत्ती सोबत येणारे सुख तो परियंतच असते, राम स्मरनाणी येणारे सुख चिरकाल टिकते. असा संदेश महाराजांनी आपल्या प्रबोधनातून दिला.
आयोजनात योगदान देणारे कैलास सोमाणी, गौरीशंकर मंत्री, संजय बनकर, राजू माहेश्वरी, दिलीप राठी, राजू बंग, हरीश सोमाणी यांचा मुरलीधर महाराज यांचे हस्ते सम्मान करण्यात आला अशी माहिती समितीचे सुनील तिवारी यांनी दिली. दुसऱ्या दिवशीच्या ही कार्यक्रमाला राम भक्तांनी प्रचंड उस्फुर्त प्रतिसाद देत या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
धरतीआबा क्रांतिसूर्य बीरसा मुंडा जयंती महोत्सव सोहळा
by खबरबात
बिरसा क्रांती दल जिल्हा शाखा चंद्रपुरतर्फे संविधान दिनानिमित्य आयोजन
चंद्रपूर : दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ह्या वर्षी सुद्धा दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी आदिवासी समाजामध्ये संविधानाचे व बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदानप्रदानास होऊन वैचारिक क्रांती निर्माण होणाच्या द्रुष्टीकोनातुन 'क्रांतिसुर्य बिरसामुंडा यांच्या 143 व्या जयंती' महोत्सवाचे आयोजन इंदिरानगर चंद्रपुर येथे बिरसा क्रांती दल चंद्रपुरच्या विद्यमाने होत असून कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ मडावी संस्थापक अध्यक्ष ' बिरसा क्रांती दल तर उद्घाटक अरविंद भाडिकर मुख्य आभियंता ' महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ' चंद्रपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे..
तेव्हा समस्त आदिवासी बांधवांना विनंती आहे की ' होणाऱ्या कार्यक्रमास आपण सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व या ऐतिहासिक संघर्षात खंबीरपणे उपस्थित राहावे .अशे आव्हाहन कार्यक्रमाचे आयोजक जितेश कुळमेथे व समस्त आदिवासी समाज इंदिरानगर चंद्रपुर यांनी केले आहे..
चंद्रपूर : दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ह्या वर्षी सुद्धा दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी आदिवासी समाजामध्ये संविधानाचे व बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदानप्रदानास होऊन वैचारिक क्रांती निर्माण होणाच्या द्रुष्टीकोनातुन 'क्रांतिसुर्य बिरसामुंडा यांच्या 143 व्या जयंती' महोत्सवाचे आयोजन इंदिरानगर चंद्रपुर येथे बिरसा क्रांती दल चंद्रपुरच्या विद्यमाने होत असून कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ मडावी संस्थापक अध्यक्ष ' बिरसा क्रांती दल तर उद्घाटक अरविंद भाडिकर मुख्य आभियंता ' महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ' चंद्रपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे..
तेव्हा समस्त आदिवासी बांधवांना विनंती आहे की ' होणाऱ्या कार्यक्रमास आपण सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व या ऐतिहासिक संघर्षात खंबीरपणे उपस्थित राहावे .अशे आव्हाहन कार्यक्रमाचे आयोजक जितेश कुळमेथे व समस्त आदिवासी समाज इंदिरानगर चंद्रपुर यांनी केले आहे..
राष्ट्रीय आदिवासी छात्र संघातर्फे तालुका स्तरीय प्रबोधन कार्यक्रम
by खबरबात
चिमूर/रोहित रामटेके
चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथे आज दि.२५/११/२०१८ ला तालुका स्तरीय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघातर्फे करण्यात आला.
आदिवासिंना ७० वर्षात ५ व ६ अनुसूची चा लाभ घेण्यासाठी तसेच आदिवासिंच्या मुलांच्या वस्तीगृहातील डिबीटी(डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर)हि आज वस्तीगृहातील मुलांना मिळत नाहीत यासाठी गंभीर चर्चा करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.विशाल वाकोडे(प्रदेश कार्याध्यक्ष, भारतीय युवा मोर्चा),उद्घाटक मा.प्रा.शैलेंद्र वागधरे, प्रमुख उपस्थिती मा.संदीप कोवे, मा.जयेश मेश्राम,मा.चंद्रकांत गेडाम,मा.वैशाली कंनाके, दिगांबर गोंगले, मा.प्रा.गुणवंत वाघमारे, विठ्ठल येडमे, मा.विकास अंबादे, एकनाथ गोंगले इ. उपस्थित होते.
तर कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी आदिवासी छात्र संघ,भारतीय विद्यार्थी मोर्चा तसेच अनेक गावातील लोकांचे सहकार्य लागले
128 वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता पुरस्कार वितरण सोहळा
by खबरबात
धुळे, प्रतिनिधी
बुधवार दि 28 नोव्हेंबर 2018 स्थळ समता भूमी महात्मा फुले स्मारक पुणे या ठिकाणी मा प्रतिभा पाटील माजी राष्ट्रपती भारत सरकार यांच्या शुभहस्ते मा शरद पवार माजी कृषिमंत्री भारत सरकार याना या वर्षाचा समता पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री उपेंद्र कुशवाह मानव संसाधन राज्यमंत्री भारत सरकार व मा ना गिरीश बापट पालकमंत्री पुणे जिल्हा हे उपस्थित असतील
तसेच मा ना विजय शिवतारे जलसंपदा राज्यमंत्री म राज्य,मा ना दिलीप कांबळे समाजकल्याण राज्यमंत्री म राज्य ,मा सौ मुक्ता टिळक ,महापौर पुणे,व मा श्री राहुल जाधव महापौर पिपरी चिंचवड यांची सन्माननीय उपस्थित राहणार आहे
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे तरी धुळे जिल्ह्यातील सर्व समता सैनिकांनी व भुजबळ समर्थकांनी पुणे येथे होणाऱ्या समता पुरस्कार वितरण सोहळ्याला हजरोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेश बागुल यांनी केले आहे
शिवसेनेच्या महाआरतीला बळसाणे ग्रामस्थांची गर्दी
by खबरबात
गणेश जैन/ धुळे, खबरबात
बळसाणे - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व महाराष्ट्र राज्यातील हजारो शिवसैनिक अयोध्या ला रवाना झालेत प्रभू श्रीराम मंदिरा चे बांधकाम लवकर सुरू व्हावे व मंदिराची पहिली विट रचण्याचे आमंत्रण शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना मिळाल्याने राज्यभर शिवसैनिकांमध्ये जल्लोष पूर्ण वातावरण तयार झाले आहे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसैनिक अयोध्या ला गेले आहेत.
शिवसेनेच्या वतीने श्रीराम मंदिरात महाआरती
हिंदू धर्मियांच्या अस्मितेचा आदर सन्मान व्हावा यासाठी दुसाणे सर्कल मधील बळसाणे येथील श्रीराम मंदिरात (ता.२४) रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिरात श्रीराम प्रभू चरणी शिवसेने तर्फे महाआरती करण्यात आली*
गावातील मुख्य चौकात उभारलेल्या श्रीराम मंदिरात शिवसैनिक व ग्रामस्थांमार्फत महाआरती करून *श्रीराम जय राम जय जय राम या नावाचा मोठ्या ने जयघोष करण्यात आला* याप्रसंगी श्रीराम मंदिरात बळसाणे ग्रामस्थ व शिवसेना पक्षाचे पदधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाआरती चे आयोजन साक्री तालुक्याचे *शिवसेना उपतालुका प्रमुख बळसाणे येथील महावीर जैन यांनी केले होते*
कार वाचविण्याच्या प्रयत्नात टँकर उलटली
by खबरबात
करंजा (घाडगे)/ उमेश तिवारी, खबरबात
येथील चक्रीघाट जवळील राष्टीय महामार्गलगतच्या पांडे पट्रोलपंपावरून पेट्रोल भरून चारचाकी (कार) विरुद्ध दिशेने नागपूरला जात असताना चारचाकी (कार) वाचविण्याचा प्रयत्नात नागपूर वरून मुबाईकडे जाणाऱ्या HP गॅसचा टँकर क्र. MH12 QG 1460 हा पलटी झाला दोन ते तिनदा पलटी झाला ही घटना आज सकाळी ८.३० ते ९.०० च्या सुमारास घडली.
२ जण गंभीर जखमी
या घटनेने टँकरचे तोंड नागपूरकडे उलटले त्यातील क्लिनर शनी चोबे वय १८ वर्ष रा. फतेपुर (उप्र) गँभिर जखमी असून चालक आशिष प्रजापती वय २८ वर्ष रा. चेंबूर (मुबंई) हा किरकोळ जखमी आहे त्यांना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयातील उपचारांनंतर नागपूरला पूढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या घटनेत जर कारला टँकरची धडक बसली असती तर प्राणहानी झाली असती असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. PSI केंद्रे पुढील तपास करीत आहे.
चंद्रपुरात श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन
by खबरबात
८ दिवस चालणार कार्यक्रम
चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान भव्य श्री रामकथा महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे आहे.शनिवारी 24 नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य शोभायात्रेने या रामकथेला शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील लक्ष्मीनारायण मंदिरातून दुपारी 12.30 वाजता शोभायात्रेस प्रारंभ झाला.
या शोभायात्रेत विशेष आकर्षण हे अग्रभागी धर्मध्वजा धारण केलेले दोन अश्वस्वार युवक गुंजन व्यास आणि कौशिक व्यास हे होते.सोबतच शोभायात्रेत मातोश्री विद्यालय येथील पन्नास मुलींचा लेझीम पथक, भजन मंडळ, तर शेकडो मंगल कलशधारी महिला, श्री राम लक्ष्मण जानकीची हुबेहूब झाकी सर्वांचे लक्ष वेधत होती. कथा प्रवक्ता श्री संतमुरली धरजी महाराजांच्या सुंदर रथा पुढे शेकडो धर्म प्रेमी स्त्री-पुरुष शिस्तबद्ध पणे शोभायात्रेत चालत होते. या सोबतच हनुमानजींहि झाकी हि या शोभेयात्रेत विशेष आकर्षण ठरली. हि दिव्य शोभायात्रा वाजत-गाजत अयोध्या धाम चांदा क्लब मैदानावर पोहोचली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्रीमती किसनी देवी मुंदडा,ब्रिजमोहन रघुनाथ मुंदडा परिवार,समितीचे अध्यक्ष श्री सत्यनारायण तिवारी, मुख्य यजमान श्री मोतीलाल अग्रवाल यजमान श्री ओमप्रकाश अग्रवाल, सुरेश अग्रवाल, मुरलीमनोहर व्यास, यांनी श्री रामायण पूजन केले.
हा संपूर्ण कार्यक्रम आठ दिवस चालणार असून दररोज विविध कार्यक्रम कथांचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी आयोजन समितीचे पदाधिकारी शीर रोडमोल गोहतोल,श्री अभय अग्रवाल. ओमप्रकाश सारडा, सुरेश राठी,गोपीकिसन पोद्दार,मुन्ना बाबू बांगला,पंकज मंदडा,पुनमचंद तिवारी, ललित कासट,राजगोपाल बंग,श्रीकांत भट्टळ,प्रदीप माहेश्वरी,जुगल किशोर सोमाणी,सुधीर बजाज,राजेश काकाजी, पंकज शर्मा, सुनील तिवारी, मनोज जाजू,निशांत भट्टळ, राजू व्यास,संजय वनकर,ऋषिकांत जाखोरीया, रुपेश राठी यांनी विशेष परिष्करम घेतले,तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पत्रकार श्री मुरली मनोहर व्यास यांनी केले.
Saturday, November 24, 2018
डम्पिगमुळे जीव टांगणीला
by खबरबात
चिमूर:- भारतामध्ये नदी स्वच्छतेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहे. संपूर्ण भारतातील सर्व नद्या प्रदुषण मुक्त करण्याचा मानस आहे . पण नगर परिषद चिमुर कडुन नदिच्या पात्रामध्येच डम्पीग लावण्यात येउन नदि स्वच्छतेचे तीन- तेरा वाजविण्यात आले. डम्पीग चिमूर शहरालगत असल्यामुडे नागरिक व जनावरे यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धन समितीचे मुख्याधिकारी यांना घेराव
नदिचे पात्र प्रदुषित होउ नये आणी जनता व जनावरे यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी पर्यावरण संवर्धन समीती चीमुर कडुन डंम्पीग हटविण्यासाठी चिमुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज शहा यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. यावेडी पर्यावरण संवर्धन समीती अध्यक्ष कवडु लोहकरे, निखील भालेराव, ऋषिकेश बाहुरे, संदिप कीटे, सौरभ गायकवाड, केमदेव वाटगुरे, प्रफूल शेडामे, पंकज बंडे, समीर बंडे, आशीष ईखारे,मोहण सातपैसे आदि पर्यावरण समीती सदस्य होते
धनगर आरक्षणविषयक 'एल्गार महामेळावासाठी सभा
by खबरबात
धुळे/ गणेश न्याहलदे, खबरबात
जैताणे गावात मनमाड येथे होत असलेल्या ,एल्गार महामेळाव्याच्या'निजोजन करण्यासाठी व माहिती संदर्भात धनगर समाज आरक्षण कृती समिती जिल्हा नाशिक चे पदाधिकारी मा श्री मच्छिन्द्र जी बिडगर, श्री राजाभाऊ खेमनार,श्री भगवान शेरमाने, तसेच श्री झुलाल आण्णा पाटील यांनी जैताणे येथील समाज बांधवांनी बैठक घेतली या बैठकीचे आयोजन जैताणे ग्रामपालिकेचे माजी उपसरपंच व जैताणे गावातील धनगर समाजाचे नेते श्री अशोक मुजगे यांनी केलेदि 30/11/2018 रोजी उत्तर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या सर्व लोकांसाठी धनगर समाज आरक्षण कृती समिती जिल्हा नाशिक च्या वतीने मनमाड ता नांदगाव जि नाशिक येथे धनगर समाजाचे नेते मा श्री गोपीचंद जी पडळकर व श्री उत्तमराव जी जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार महामेळाव होणार आहे त्या संदर्भात निजोजन करण्यासाठी या महामेळाव्याची माहिती देण्यासाठी विठ्ठल मंदिर जैताणे या ठिकाणी मोठी बैठक पार पडली। श्री अशोक मुजगे यांनी प्रास्ताविक करताना जैताणे गावातील समाज बांधवांनी आत्ता पर्यंत आरक्षण अंमलबजावणी साठी केलेल्या विविध आंदोलनाची माहिती प्रमुख उपस्थिताना दिली
व श्री मच्छिन्द्र बिडगर यांनी सांगितले की धुळे ,जळगाव ,नंदुरबार ,नाशिक,या चारही जिल्ह्यातील सर्वात मोठा धनगर समाज या जैताणे गावात राहतो म्हणून या मेळाव्यात या गावाची उपस्थित सर्वात जास्त प्रमाणात असली पाहिजे, या मेळाव्या प्रसंगी श्री बापू भलकारे,बाजीराव पगारे,पंकज पगारे,सागर बोरसे,किरण पगारे,जितेंद्र पेंढारे ,गणेश न्याहळदे,व सर्व धनगर समाज बांधव उपस्थित होते





