काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, October 18, 2018

चंद्रपूरची मुले मिळविणार भारतासाठी ऑलिम्पिक पदक

चंद्रपूरची मुले मिळविणार भारतासाठी ऑलिम्पिक पदक

2024 मध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणारे 
चंद्रपूरची मुले मिशन शक्ती मधून पुढे येतील :ना. मुनगंटीवार
राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचा चंद्रपुरात समारोप
चंद्रपूर /प्रतिनिधी:
मिशन शक्ती मधून 2024 मध्ये चंद्रपूरची मुले ऑलिम्पिक पदकासाठी सज्ज व्हावीत, यासाठी जिल्हाभरात क्रीडा संकुल अद्ययावत करण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी औद्योगिक घराण्यांची मदत घेतली जाणार आहे. ख्यातनाम चित्रपट अभिनेते आमिर खान यांच्या हस्ते मिशन शक्ती ची सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय स्पर्धेतील महाराष्ट्रातील विजेत्यांना मुनगंटीवार यांनी पुरस्कार प्रदान केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत या समारोपीय सत्राचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले व मुली 17 वर्षाखालील मुले व मुली व 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धा व क्रीडा प्रबोधिनीचे वर्चस्व कायम राहिले. सर्व विभागांना संमिश्र यश देणाऱ्या हा स्पर्धा गेल्या चार दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी जिल्हा क्रीडाधिकारी अनंत बोबडे व त्यांच्या चमूचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्वागत केले.
महाराष्ट्राच्या सर्वदूर भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी शुभेच्छा देताना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई पुण्यापासून ते अमरावती नाशिकच्या सर्व विद्यार्थ्यांनी ताडोबाचे वाघ बघून जावे यासाठी त्यांची व्यवस्था करत असल्याची गोड बातमी या भाषणादरम्यान दिली. सध्या आयोजित होत असलेल्या चंद्रपूर येथे काही दिवसानंतर ऑलंपिकपटू सोबत तुमच्या मुलाखती होतील,असे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी मिशन शक्ती संदर्भात माहिती दिली. मिशन शक्ती अंतर्गत सहा निवडक ऑलिम्पिकच्या क्रीडा प्रकारामध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व स्तरातील गुणवान खेळाडूंची निवड करून त्यांना 2024 च्या ऑलम्पिक साठी सिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरात सर्व तालुक्याच्या ठिकाणी अद्ययावत क्रीडा संकुल तयार होत आहे. या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी रिलायन्स या उद्योग घराण्याने मदत देण्याची मान्यता दिली आहे. तर लगान व दंगल या सिनेमातून क्रीडा प्रकाराला वाव देणाऱ्या अमीर खान यांनी मिशन शक्ती ही संकल्पना उचलून धरली असून त्यांच्या हस्ते मिशन शक्तीची सुरुवात चंद्रपूर मध्ये लवकरच करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला आतापर्यंत केवळ 28 मेडल ऑलिम्पिकमध्ये मिळाले असून आता क्रीडा क्षेत्रामध्ये काटक, गुणवान अशा सर्व स्तरातील ग्रामीण भागातील मुलांना योग्य संधी देऊन ऑलिम्पिक मेडलची संख्या वाढवण्याची मनीषा असल्याचे त्यांनी सांगितले. मिशन शौर्य अंतर्गत सतरा -अठरा वर्षाचे आदिवासी विद्यार्थी एवरेस्ट सर करू शकले. त्यामुळे योग्य ट्रेनिंग दिल्यास चंद्रपूर-गडचिरोली भागातील तरुण क्रीडा प्रकारात चमक दाखवू शकतात, अशी शाश्वती आपणास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महापौर अंजलीताई घोटेकर यांनी देखील खेळाडूंशी संवाद साधला. तत्पूर्वी चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर राजेश नायडू, कुंदन नायडू, प्राध्यापक वसंतराव अकुलकर आदींची उपस्थिती होती. 
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विभागवार विजेत्यांची नावे गटानुसार पुढीलप्रमाणे आहे
या क्रीडा स्पर्धेचे प्रथम, व्दितीय व तृतिय क्रमांकाचे विजय संघ पुढील प्रमाणे- 14 वर्ष वयोगटातील मुले प्रथम बक्षिस क्रीडा प्रबोधिनी, व्दितीय पुणे व तृतिय नाशिक, 14 वर्षाखालील मुली प्रथम क्रीडा प्रबोधिनी, व्दितीय मुंबई व तृतिय अमरावती, 17 वर्षे वयोगटातील मुले प्रथम मुंबई, व्दितीय क्रीडा प्रबोधिनी व तृतिय नाशिक, 17 वर्षाखालील मुली प्रथम मुंबई, व्दितीय क्रीडा प्रबोधिनी व तृतिय नागपूर, 19 वर्षे वयोगटातील मुले प्रथम क्रीडा प्रबोधिनी, व्दितीय मुंबई व तृतिय कोल्हापूर आणि 19 वर्षाखालील मुली प्रथम मुंबई, व्दितीय पुणे व तृतिय कोल्हापूर या संघानी पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये 17 वर्ष वयोगटात नाशिक, क्रीडा प्रबोधिनी नागपूर, औरगांबाद, 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात मुंबई, लातूर, 14 वर्ष मुलांच्या गटात कोल्हापूर, क्रीडा प्रबोधिनी पुणे, अमरावती, नागपूर, 14 वर्ष मुलींच्या गटात पुणे, क्रीडा प्रबोधिनी मुंबई व अमरावती संघानी प्रावीण्या प्राप्त केलेले आहेत.
 अखर्चीत निधी खर्च   करण्‍यासाठी मुदतवाढ

अखर्चीत निधी खर्च करण्‍यासाठी मुदतवाढ

सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 पुर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्‍जीवन करण्‍याच्‍या कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हा परिषदेला सन 2016-17 मध्‍य वितरीत केलेल्‍या रू.34.46 कोटी निधीपैकी अखर्चीत रू.13.52 कोटी निधी दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत खर्च करण्‍याच्‍या प्रस्‍तावाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मान्‍यता दिली आहे.
पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्‍जीवन करण्‍याच्‍या कार्यक्रमाला शासन निर्णय दिनांक 16.5.2016 अन्‍वये मान्‍यता देण्‍यात आली असून हा कार्यक्रम सन 2016-17 ते सन 2018-19 या तीन वर्षामध्‍ये पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट आहे. चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये 51.91 कोटी रू. दायीत्‍वाची 520 कामे आहे. त्‍यापैकी 349 कामे भौतिकदृष्‍टया पूर्ण झाली असून त्‍यासाठी रू.20.94 कोटी निधी खर्च झाल्‍यानंतरही अंदाजे 10 कोटी रू. रकमेचे दायीत्‍व प्रलंबित आहेत. यासंबंधीची देयके प्रलंबित असल्‍यामुळे प्रगतीपथावरील 165 कामे पूर्ण करण्‍यासाठी वारंवार निविदा काढून देखील कंत्राटदारांकडून प्रतिसाद प्राप्‍त होत नाही. तसेच तलावामध्‍ये पाणी असल्‍यामुळे व काही दुरूस्‍ती दगडी अस्‍तराचे काम असल्‍यामुळे सदरची दुरूस्‍तीची कामे शक्‍य झाली नाही. या कार्यक्रमामुळे पुर्व विदर्भातील तलावांची सिंचन क्षमता तुलनेने कमी निधीमध्‍ये पुनःर्स्‍थापित होवून धान उत्‍पादक शेतक-यांना संरक्षीत सिंचनाची सोय होणार आहे. त्‍यामुळे जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या उद्देशाप्रमाणे गाव जल परिपूर्ण होण्‍यास मदत होणार आहे.
सन 2016-17 मध्‍ये वितरीत केलेला निधी दिनांक 31.3.2018 पर्यंत खर्च करता येईल असे शासन निर्णयात नमूद असल्‍यामुळे यासाठी एक वर्ष मुदतवाढ देण्‍याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. या माध्‍यमातुन माजी मालगुजारी तलावांच्‍या पुनरूज्‍जीवनाच्‍या कार्यक्रमाची उद्देशपुर्ती होण्‍यास मदत झाली आहे.
 चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाचे चित्र पालटणार

चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाचे चित्र पालटणार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगणाऱ्या चंद्रपूरच्या हुतात्मा स्मारकाला लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत आवडीचे ठिकाण बनेल अशा पद्धतीने नव्या स्वरूपात तयार करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
शनिवारी सायंकाळी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी हुतात्मा स्मारकाला भेट दिली. हुतात्मा स्मारकाचे स्वरूप बदलण्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांना दिले. यावेळी महापौर अंजलीताई घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे व अन्य पदाधिकारी देखील उपस्थित होते.
महानगरपालिकेमार्फत संरक्षण भिंतीचे काम सध्या सुरू आहे. तथापि, केवळ संरक्षण भिंत व डागडुजी न करता या संपूर्ण परिसराचा विकास करण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील हुतात्मा झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे दीर्घकाळ टिकणारे छायाचित्र संरक्षक भिंतीवर उमटतील अशा पद्धतीचे नियोजन करण्याचा आग्रह त्यांनी धरला. या परिसरामध्ये लहान मुलांपासून तर वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरेल अशा सुविधा उपलब्ध करण्याचेही त्यांनी सुचविले. लहान मुलांसाठी एकीकडे प्लेगार्ड करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष निर्माण करण्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महिला व पुरुष यांच्यासाठी या परिसरात जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हुतात्मा स्मारक असल्यामुळे दुपारच्या वेळेस या ठिकाणी तरुण मुला-मुलींना अभ्यास करण्यासाठी जागा देखील उपलब्ध करण्यात यावी अशी सूचना देखील त्यांनी केली. मुलांना या ठिकाणी इतिहासाचे दर्शन होतानाच करिअर करण्याची संधी उपलब्ध होईल अशी बैठक व्यवस्था ही करण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

Tuesday, October 16, 2018

 महावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल:देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल:देवेंद्र फडणवीस

नागपूर /प्रतिनिधी:
सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांना दिवसाही मुबलक वीज उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व कृषीपंपांना नवीन वीजजोडणीसह दर्जेदार वीजपुरवठा देणाऱ्या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या महावितरणच्या नव्या योजनांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान निश्चित उंचावेल अशी ग्वाही मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई:महावितरणच्या तीन नव्या योजनांचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवर.
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात आज (दि. १६) आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजना व विद्युत वाहनांकरीता उभारण्यात आलेल्या महावितरणच्या चार्जिंग स्टेशन्स या तीन नव्या योजनांचे मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री ना. श्री चंद्रकांतदादा पाटील, गृहनिर्माण मंत्री ना. श्री. प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री ना. श्री. विष्णू सावरा, सहकारमंत्री ना. श्री. सुभाष देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. श्री. गिरीश बापट, जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन, ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री ना. श्री. जयकुमार रावल, गृह राज्यमंत्री ना. श्री. दीपक केसरकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, उद्योग राज्यमंत्री ना. श्री. प्रवीण पोटे, राज्याचे मुख्य सचिव श्री. डी.के. जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री ना. श्री. फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेद्वारे राज्यातील सुमारे ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांना दिवसाही पुरेशी वीज मिळणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना स्वस्त दराने वीज उपलब्ध होणार असून उद्योगांवरील सबसीडीचा भार सुद्धा कमी होईल. मागील ४ वर्षांत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी केलेल्या विविध प्रभावी उपाययोजनांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
यावेळी ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौरकृषी वाहिनी योजना सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून महावितरणच्या या तिनही योजना राज्याचा कायापालट करणाऱ्या ठरणार आहेत, असे सांगितले. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला राज्यातील आमदार, ऊर्जा सचिव अरविंद सिंह व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 श्याम वर्धने यांना मातृशोक

श्याम वर्धने यांना मातृशोक

नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मितीचे संचालक तथा सल्लागार(खनिकर्म) श्री श्याम वर्धने यांच्या मातोश्री गंगुबाई दौलतराव वर्धने वय ९४ वर्षे यांचे क्रीम्स हॉस्पीटल,रामदास पेठ, नागपूर येथे आज सोमवार १५ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
भिवापूर पंचायत समिती येथुन मुख्य सेविका म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले प्रभाकर वर्धने, अनंत वर्धने, श्याम वर्धने व मुलगी मंगला धोपटे तसेच मोठा आप्त परिवार आहे.
मंगळवार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता त्यांचेवर अंबाझरी घाट, नागपूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. 
श्याम वर्धने 
फलॅट क्रमांक ४०५, जगत टॉवर, टिळक नगर, लॉ कॉलेज चौक, नागपूर 
मोबाईल ९७६४१०७५७५
 चंद्रपूर वीज केंद्रात आपत्ती व्यवस्थापन सप्ताह यशस्वीरीत्या संपन्न

चंद्रपूर वीज केंद्रात आपत्ती व्यवस्थापन सप्ताह यशस्वीरीत्या संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात ८ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन सप्ताह निमित्ताने विविध स्तुत्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ९ ऑक्टोबर रोजी आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाचे उदघाटन करण्यात आले व ५०० मेगावाट संच क्रमांक ८ येथे मॉक ड्रील प्रात्याक्षिके घेण्यात आली. अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांसाठी अग्निशमन प्रात्याक्षिके घेण्यात आली तसेच चेम्ररी प्रशिक्षण केंद्र येथे मानवी जीव वाचविण्याचे कौशल्य या संदर्भात इंडियन सोसायटी फॉर अॅनेस्थॉलॉजी चंद्रपूर यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन सप्ताहाच्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे होते. त्यांनी सप्ताह निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांची मुक्त कंठाने प्रशंसा केली व यथोचित मार्गदर्शन केले व विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व प्रमाणपत्र वितरीत केले.
याप्रसंगी उप मुख्य अभियंते अनिल आष्टीकर, मधुकर परचाके, राजेशकुमार ओसवाल, अधीक्षक अभियंते सुहास जाधव, अनिल पुनसे, अनिल गंधे, कार्यकारी अभियंते शालिक खडतकर, बाळू इंगळे, शिवशंकर पडोळे, इंदल चव्हाण, सराग, अजय बगाडे, सर्व विभाग प्रमुख, संघटना प्रतिनिधी, अभियंता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरक्षितता अधिकारी चव्हाण व आभार प्रदर्शन प्रशांत कठाळे यांनी केले. सप्ताहाच्या यशस्वितेसाठी विद्युत विभाग, सुरक्षा विभाग, प्रशिक्षण विभाग व अग्निशमन विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Monday, October 15, 2018

पशुपक्ष्यांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन डिसेंबरमध्ये:प्रदर्शनीत कुक्कुटपालनाचा सहभाग

पशुपक्ष्यांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन डिसेंबरमध्ये:प्रदर्शनीत कुक्कुटपालनाचा सहभाग

कुक्कुटपालन प्रदर्शन साठी इमेज परिणाम
संग्रहित 
मुंबई/प्रतिनिधी:
 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे हे उपक्रम वाढीस लागले आहेत. शेतकऱ्यांना पशुधनाचा फायदा घेता यावा यासाठी जालना जिल्ह्यात राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन डिसेंबर महिन्यात केले जाणार आहे. या प्रदर्शनासाठी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग उपस्थित राहणार आहेत. देशभरातील मान्यताप्राप्त विविध जातिवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, घोडे, वराह तसेच जातिवंत कुक्कुट पक्षी यांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. पशुपालकांमध्ये पशुपालनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे हा यामागचा उद्देश असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी जवळपास 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पशुपालकांत पशुपालनाची आवड निर्माण व्हावी, यासह देशी/ संकरित पशुधनाचे जतन व संवर्धन करणे, तसेच पशुधनाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी हे प्रदर्शन घेतले जाणार आहे. जालन्यात जवळपास 150 एकर जागेवर हे प्रदर्शन होणार असून, या प्रदर्शनामध्ये सेल्फ साफिसिएंट गावाचा सेटअप उभारला जाणार आहे. या प्रदर्शनात आधुनिक गोपालन, म्हैसपालन, शेळी- मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन आदी गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात इतर राज्यांचा सक्रिय सहभाग असेल. सोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 100 पशुपालकांचा सहभाग असेल. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट पशुधनास रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.



 कुक्कटपालन व्यवसायात तोटा झाल्याने पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या

कुक्कटपालन व्यवसायात तोटा झाल्याने पत्नीचा खून करून स्वतः केली आत्महत्या


 

  उस्मानाबाद/प्रतिनिधी:
कुक्कटपालन व्यवसायात सातत्याने हो
पत्नीचा खून साठी इमेज परिणामरा तोटा, पावसाअभावी नापिकी, कर्ज कसे फेडायचे या नैराश्येतून शिराढोण (जि. उस्मानाबाद) येथील एका शेतकऱ्याने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आला.येथील शेतकरी रामभाऊ गुलाबराव यादव (वय 55) हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय करतात. या व्यवसायात त्यांची पत्नी सीताबाई यादव (वय 50) या मदत करतात. यादव कुटुंबाकडे शेतीसाठी व कुक्कुटपालन व्यवसायासाठी बँकेचे जवळपास साडेतीन लाख रुपयांचे कर्ज होते. हे पती- पत्नी शेतातस वास्तव्यास असतात. गेल्या तीन ते चार वर्षात पावसाअभावी नापिकीमुळे उत्पन्नात घट आली आणि कुक्कुटपालन व्यवसायत सातत्याने नुकसान व तोटा झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हे पती- पत्नी तणावाखाली होते, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे रामभाऊ यादव यांनी मध्यरात्री झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून केला व त्यानंतर स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माजीद शेख, पोलिस उपनिरीक्षक महेश कांबळे, पोलिस नाईक बाबासाहेब मोराळे, अमोल उंबरे, दयानंद गाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.



महावितरणच्या तीन अभिनव योजनांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महावितरणच्या तीन अभिनव योजनांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स आणि उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) कृषीपंपांना नवीन वीजजोडणी या तीन योजनांचे उद्घाटन मंगळवारी (दि. १६) दुपारी १२ वाजता राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.
मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील (मंत्री, महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)), मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार (मंत्री, वित्त आणि नियोजन, वने) मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे (मंत्री, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क), मा. ना. श्री. मदन येरावार (राज्यमंत्री, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) व सामान्य प्रशासन) आणि राज्याचे मुख्य सचिव श्री. डी. के. जैन हे उपस्थित राहणार आहेत. 
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्य नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत करण्यात आले बदल

धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्य नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत करण्यात आले बदल

नागपूर पोलीस बंदोबस्त साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि दिनांक 18/10/2018 रोजी नागपूर शहरातील ‘‘दिक्षाभुमी’’ येथे धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा 62 वा सोहळा समारोह दिक्षाभुमी नागपूर येथे संपन्न होणार असुन हया सोहळयात सहभागी होण्यासाठी फार मोठया प्रमाणावर बौद्ध भाविक रेल्वे, बस मधून तसेच खाजगी बस मेटॅडोर, जिप, कारने व इतर वाहनांनी दिक्षाभुमीवर येतात. त्यामूळे पो.स्टे. धंतोली, गणेशपेठ, सिताबर्डी हद्दीत रस्त्यावर फार मोठया प्रमाणावर गर्दी होऊन रहदारीस अडथळा होवून एखादे वेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता यते नाही. 
यास्तव दिक्षाभुमी जवळच्या परिसरातील रस्त्यावरील वाहतूकीचे नियंत्रण करण्यासाठी व सर्वसाधारण नागरिकांची गैरसोय होऊ नये. हयाकरीता खालील नमूद मार्गावर सर्व प्रकारच्या वाहन धारकांना आपली वाहने
नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. हया संबंधी दिनांक 04/10/2018 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक 17/10/2018 चे सकाळी 06.00 ते दिनांक 19/10/2018 चे रात्री 24.00 वाजे पर्यंत सदरची अधिसूचना अंमलात राहील

1) काछीपुरा चौक (कृषी महाविद्यालय वस्तीगृह) सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद
ते माताकचेरी चौका पर्यतचा दोन्ही बाजूचा मार्ग
2) काछीपुरा चौक (कृषी महाविद्यालय वस्तीगृह ) सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद
कल्पना बिल्डींग (रामदासपेठ) टी पॉईन्ट पर्यतचा दोन्ही बाजुचा मार्ग
3) माताकचेरी चौक ते कृपलानी टर्निंग, वर्धा रोड सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद
4) माताकचेरी चौक ते निरी रोड ”टी“ पॉईन्ट सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद 
5) माताकचेरी चौक ते लक्ष्मी नगर चौका पर्यतचा सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद
6) काछीपुरा चौक ते बजाज नगर चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद
7) बजाजनगर चौक ते लक्ष्मीनगर चौक कडे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद
8) फुड पाकीट/जेवन वाटप करणारी वाहनांना सुध्दा उपरोक्त मार्गावर प्रवेश बंदी राहील.वर नमूद क्र. 6 मधील रोड हा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच शहर परिवहन व्यवस्थेद्वारे भाविकांचे सोयीसाठी वापरण्यात येणारे बसेसकरीता तात्पुरते बस स्थानक करीता वापरण्यात येईल.

वाहतूक वळविण्याचे मार्ग 
1) लोकमत चौकाकडून काचीपूरा चौकाकडे जाणारी वाहतूक ही कल्पना बिल्डींग टी पॉईन्ट येथे उजवे वळण घेवून रामदासपेठ मार्गे युनिर्व्हसिटी लायब्ररी चौक मार्गे जाईल.

 2) वर्धा कडून कृपलानी टर्नींग मार्गे माता कचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक ही वर्धा रोड वरून अजनी चौक पुल,अजनी चौक येथे डावे वळण घेवून आर.पी.टी.एस. मार्गे जातील. तसेच लोकमत चौकाकडून कृपलानी टर्निंग मार्गे माता कचेरी चौका कडे जाणारी वाहतूक वर्धा रोड वरून अजनी पूल चौक येथे उजवे वळन घेवून आर.पीटी.एस.मार्गे जाईल.

3)अलंकार टॉकीज चौकाकडून काचीपूरा चौकाकडे जाणारी वाहतूक ही नॉर्थ अंबाझरी मार्गावरून शंकरनगर चौक व युनर्व्हसीटी लायब्ररी चौक मार्गे जाईल.

4)लक्ष्मीनगर चौकाकडून माता कचेरी चौकाकडे जाणारी वाहतूक ही बजाजनगर चौकाकडे व आठ रस्ता मार्ग जाईल.

5)निरी टी पॉईन्ट ते माता कचेरी चौका कडे जाणारी वाहतुक ही आर.पी.टी.एस व अजनी मार्गे जाईल.

6)बजाजनगर चौकाकडून लक्ष्मीनगर चौकाकडे जाणारी वाहतूक व्ही.एन.आय.टी. 
चौक, अभ्यंकर मार्गे जाईल.

7)ऐनवेळी निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार व आवश्यकतेनुसार कर्तव्यावरिल वाहतूक 
पोलीस अधिकार्यांना एखादा मार्ग बंद करुन योग्य मार्गाने वाहतूक वळविण्याचे 
अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

 धम्मचक्र सोहळयात दिक्षाभुमी या ठिकाणी येणाऱ्या बौद्ध भाविकांनी आपली वाहने 
खालील ठिकाणी पार्क करावीत

1)हिस्लॉप कॉलेज हॉकी ग्राऊन्ड
2) मॉरेस कॉलेजचे हॉकी ग्राउंड (यशवंत स्टेडीअम समोरील मैदान
3) हडस हायस्कूल येथिल पटांगण 
4) आय.एम.ए. हॉल 
5) धरमपेठ हायस्कूलचे पटांगण 
6) धरमपेठ कॉमर्स कॉलेजचे पटांगण
7) इंडियन जिमखानाचे पटांगण
8) न्यु इंग्लीश हायस्कूलचे पटांगण
09) गृहरक्षक दल (होमगार्ड कार्यालय) कॉगेस्र नगर कार्यालयाचे पटांगण 
10) बजाजनगन बास्केट बॉल मैदान
11) परांजपे शाळा, लक्ष्मीनगर 
12) सायटीफीक को ऑप.सोसा. लक्ष्मीनगर
13) लक्ष्मीनगर झोन कार्यालय पटांगण 
14)एल. ए. डीकॉलेज,नागपूर 
15) पासेस पार्कींग औद्योगीक प्रशिक्षण केन्द्र (ITI) पटांगण तरी नागपूर शहरातील सर्व वाहन चालकांनी व सर्व नागरिकांनी या आव्हानाचे पालन करून आपली होणारी गैरसोय टाळावी व वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे.

                                                     
{नागपूर पोलीस}

Friday, October 12, 2018

अप्रतिम ऑफर्स तुमच्या अ‍ॅमेझॉनवर!

अप्रतिम ऑफर्स तुमच्या अ‍ॅमेझॉनवर!

😇 जबरदस्त सेल,

👍 या महागाईच्या काळात अ‍ॅमेझॉन घेऊन आलाय महाबचतीचा जबरदस्त सेल

👌 ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ऑफर्स.. फक्त 15 ऑक्टोबरपर्यंत

🤝 चला तर मग तुमच्या आवडीच्या आणि गरजेच्या प्रॉडक्टवर किती डिस्काउंट आहे? चेक करा आणि या अप्रतिम ऑफरचा लाभ घ्या.._

🛍 शॉपिंग करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://kavyashilpnews.blogspot.com/p/blog-page_65.html?m=1

🤗 _ग्रेट ऑफर्स.. ग्रेट डिल्स!_

 विजेची वाढती मागणी लक्ष्यात घेऊन आराखडा तयार करा:प्रा.देशमुख

विजेची वाढती मागणी लक्ष्यात घेऊन आराखडा तयार करा:प्रा.देशमुख

नागपूर/प्रातिनिधी:
भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्ष्यात घेऊन नागपूर जिल्ह्यात वीज वितरणाचे जाळे मजबूत करण्यासाठी पुढील १० वर्षाचा विकास आराखडा तयार करण्याची सूचना जिल्हा विदुत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख यांनी आज केली. 
महावितरणच्या काटोल रोड येथील कार्यालयात जिल्हा विदुत नियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी बोलताना प्रा. देशमुख म्हणाले, नागपूर जिल्ह्यात राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात ऊर्जा खात्याशी निगडित अनेक विकास कामे सुरु आहेत. यातील अनेक कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असून हि कामे पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखण्डित आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. पण भविष्यात विजेचे मागणी आणि वीज ग्राहकांची संख्या वाढणार आहे. यासाठी आतापासून नियोजन करणे गरजेचे आहे. 
वीज चोरांच्या विरोधात महावितरण आणि एसएनडीएलने कडक कारवाई करावी. वीज चोरांची हयगय करू नये. तसेच तक्रार निवारण केंद्रात येणाऱ्या वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करून त्यांचे समाधान करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले .
या बैठीकीला महावितरण आणि एसएनडीएलचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी खामला येथील ३३/११ कि. व्हो. उपकेंद्राचा आढावा घेण्यात आला. सोबतच कन्हान येथील परिसरास वीज पुरवठा करण्यासाठी नवीन भूमिगत वाहिनी टाकण्यासाठी चर्चा करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. पण कामे करतेवेळी संबधित यंत्रणा महावितरण अथवा एसएनडीएलला विश्वासात घेत नाही. परिणामी मोठा प्रमाणात वीज वाहिन्यांचे नुकसान होत आहे. या विषयावर चर्चा झाली. बैठीकीला मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता मनीष वाठ, नारायण आमझरे, उमेश शहारे , एसएनडीएलचे बिझनेस हेड सोनल खुराणा यांच्यासह महावितरण आणि एसएनडीएलचेअधिकारी उपस्थित होते.
 पोंभुर्णा पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी माझ्या भगिनींची कंपनी असल्‍याचा अभिमान:मुनगंटीवार

पोंभुर्णा पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी माझ्या भगिनींची कंपनी असल्‍याचा अभिमान:मुनगंटीवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 नवरात्र हा आदिशक्‍ती, मातृशक्‍तीचा उत्‍सव आहे. मातृशक्‍ती सुदृढ व सशक्‍त करायची असेल तर महिलांचे सक्षमीकरण अत्‍यंत गरजेचे आहे. पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्‍कुटपालन प्रकल्‍प हा दुर्गम भागातील महिला सक्षमीकरणाचे प्रभावशाली उदाहरण आहे, असे कौतुकोदगार राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. हा प्रकल्‍प माझ्या मतदार संघातला त्‍यातही माझ्या भगिनींचा आहे. याचा मला सार्थ अभिमान असल्‍याचेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
12 ऑक्टोंबर रोजी पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांद्वारे संचालित कुक्‍कुटपालन संस्‍थेच्‍या पहिल्‍या वार्षीक सर्वसाधारण सभेत ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, साधारणतः कंपनी असे म्‍हटले तर टाटा, बिर्ला अशी मोठी नावे डोळयासमोर येतात. पोंभुर्णा महिला पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. ही कंपनी माझ्या भगिनींची कंपनी आहे. याचा मला खरोखर अभिमान आहे, असेही ते म्‍हणाले.
या मतदार संघात रोजगार व स्‍वयंरोजगाराला चालना देणारे अनेक प्रकल्‍प आपण राबवित आहोत. चिचपल्‍ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राची दखल सिंगापूरच्‍या प्रसार माध्‍यमांनी घेतली आहे. मत्‍स्‍यपालन, दुग्‍धव्‍यवसाय आपण या भागात राबविणार आहोत. 15 नोव्‍हेंबर पर्यंत टुथपिक तयार करण्‍याचा प्रकल्प आपण कार्यान्‍वीत करणार आहोत. पोंभुर्णा येथे मॉडेल पंचायत समिती आपण उभारत आहोत. युवक-युवतींना स्‍पर्धा परिक्षांच्‍या तयारीसाठी साहित्‍य उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने अद्ययावत वाचनालय उभारत आहोत. पोंभुर्णा येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र निर्माण होत आहे. शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने मुल आणि पोंभुर्णा तालुक्‍यात टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने सधन शेतकरी प्रकल्प आपण राबवित आहोत. पोंभुर्णा येथे सुसज्‍ज अशी ग्रामीण रूग्‍णालयाची इमारत उभी होत आहे. चिचडोह सिंचन प्रकल्‍प आपण पूर्ण केला आहे. लवकरच हा प्रकल्‍प शेतक-यांच्‍या सेवेत रूजु होणार आहे. विशेष बाब म्‍हणून मुल व पोंभुर्णा तालुक्‍यातील शेतक-यांना विहीरी आपण उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत, असेही त्‍यांनी सांगीतले. 
पंतप्रधानांसमोर आपल्‍या प्रकल्‍पाचे निर्भीडपणे सादरीकरण करणा-या श्रीमती कुंतीबाई धुर्वे यांचे कौतुक करत ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, मिशन शक्‍तीच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी माऊंट एवरेस्‍टवर झेंडा फडकविला. 28 आणि 29 ऑक्‍टोंबरला बल्‍लारपूर येथे युथ एमपॉवरमेंट समीट आपण आयोजित करीत आहोत. त्‍या माध्‍यमातुन मिशन सेवा, मिशन स्‍वयंरोजगार, मिशन कौशल्‍य विकास, मिशन फॉरेन सर्विसेस, मिशन सोशल वर्क, मिशन उन्‍नत शेती या सहा मिशनची सुत्री आपण अमलात आणत आहोत. हा जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगारयुक्‍त व्‍हावा हेच आपले ध्‍येय असल्‍याचे ना.सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.
यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अल्‍का आत्राम, नगर पंचायत अध्‍यक्षा श्‍वेता बनकर, गजानन गोरंटीवार, अविनाश परांजपे, जि.प. सदस्‍य राहूल संतोषवार, न.प. उपाध्‍यक्ष रजिया कुरैशी, जिल्‍हा परिषद सदस्‍य गौतम निमगडे, पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, न.प. सदस्‍य अजित मंगळगिरीवार, ईश्‍वर नैताम, माजी सरपंच राजू मोरे, पोंभुर्णा महिला पोल्‍ट्री प्रोडयुसर्स कंपनी लिमी. च्‍या अध्‍यक्षा यमुना जुमनाके, कुंतीबाई धुर्वे, तहसिलदार श्रीमती टेमकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.