Saturday, February 11, 2017
Wednesday, January 25, 2017
परमात्मा एक
by खबरबात
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदामौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम
मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर अंधश्रद्धा निर्मुलन, दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या बंदी, व्यसन मुक्ती, जातीय भेदभाव नष्ठ करणे, मर्यादित कुटुंब, बालविवाह प्रथा बंदी, हुंडा पद्धती बंद यावर जनजागृती करिता दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा २६ जानेवारीला संस्थेचे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम मौदा येथे हवन कार्य, झेंडावंदन, भव्य सेवक मेळावा व वनभोजन कार्यक्रम साजरा होत आहे. दरवर्षी सेवक संमेलनाच्या कार्यक्रमाला लाखो सेवकांची गर्दी होते. तर दरदिवशी हजोरोच्या संख्येत सेवक वनभोजनाकरिता येत असतात.
अंधश्रद्धा निर्मुलन, वाईट व्यसन मुक्त समाज तसेच आदर्श मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे, दुखी व गरीब मानवाला एका भगवंताचा परिचय करून देऊन निष्काम कार्ये करणारे, सत्याचे पुजारी, मानव धर्माचे प्रणेते व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा नागपूर येथील नावाजलेले गोळीबार चौक येथील टिमकी भागात एका सर्वसाधारण ठुब्रिकर कुटुंबात दि. ०३ एप्रिल १९२१ ला जन्म झाला.
बाबांच्या घरची परिस्थिती नाजूक होती. खर्च जास्त मिळकत कमी त्यामुळे त्यांना चौथी पर्यन्त शिक्षण घेऊन शाळा सोडावी लागली. त्यानंतर बाबांनी वयाच्या बाराव्या वर्षी वडिलोपार्जित विणकर व्यवसाय यात हातभार लावण्याचे काम केले. लहानपणापासूनच बाबांचा उमदा स्वभाव होता. चेहऱ्यावर तेज होते. सौष्ठव देहयस्टी होती. लहानपणापासूनच त्यांच्यात कणखरपणा होता. नितीमत्ता बाळगत होते. बाबा दयाळू स्वभावाचे होते, परमेश्वरावर त्यांचा बालपणापासूनच विस्वास होता. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे वयाच्या सतराव्या वर्षी लग्न झाले. नागपूर जिल्यात खापा गावातील निवासी श्री बाबूजी बुरडे यांची सुकन्या वाराणशी बाई हिच्या बरोबर मे १९३८ मध्ये लग्न झाले बाबांच्या घरी मुल जन्माला आले ह्याचे नाव मनो ठेवण्यात आले. नाजूक परिस्थितीतून मनोचे शिक्षण झाले व ते आज अमेरीकेमध्ये साईनस्टीट आहेत. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे बाबांनी सोने चांदीच्या दुकानामध्ये सुद्धा नौकरी केली.
महानत्यागी बाबा जुमदेवजीचा परमेश्वरावर फार विस्वास होता. तरीसुद्धा बाबांचे कुटुंब अंधश्रद्धेच्या त्रासामुळे त्रस्त होते. त्यांना पुष्कळश्या दुखाना सामोरे जावे लागले. बाबा ह्या त्रासाचा निवारा करण्याकरिता बाहेर जात होते तेव्हा नागपूर जिल्यात्तील मौदा ह्या शहरातून एक व्यक्ती बाबांच्या घरी आले. ह्या व्यक्तींनी बाबांना एक मंत्र दिले. ह्या मंत्राच्या सहायाने विधिवत कार्य करून सन २६ नोव्हेंबर १९४५ मध्ये भगवान बाबा हनुमानजी ची कृपा प्राप्त केली. तसेच भगवान बाबा हनुमानजीच्या मार्गदर्शनानुसार एका रात्रीत तीन हवन या प्रमाणे पाच दिवस त्रिताल हवन करून राक्षबंधानानंतर सहाव्या दिवशी म्हणजे २५ आगस्त १९४८ मध्ये सृष्टी निर्मात्या एका परमेश्वाची प्राप्ती केली. परमेश्वरी कृपा प्राप्ती नंतर बाबांनी हि कृपा आपल्यापर्यतच किंव्हा आपल्या परिवारापर्यतच मर्यादित न ठेवता त्याच्या कडे येणाऱ्या दुखी लोकांना बाबा परमेश्वरी कृपेच्या सहायाने मार्गदर्शन करून त्यांचे दुख दूर करीत होते. बाबांनी चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाच्या आधारे दुखी कष्टी व गरीब लोकांमध्ये परमेश्वरी कृपेबद्दल प्रचीती करून दिली व त्यांचे जीवन सुखमय केले. अश्या प्रकारे परमात्मा एक सेवक समाज निर्माण करून मानव धर्माची स्थापना केली.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर त्या कृपेचा परिचय त्यांनी सर्वसाधारण दुखी, कष्टी लोकांना बिनामुल्य करून दिला. बाबांनी कधीही कोणत्याही व्यक्तीकडून कसल्याही प्रकारची गुरु दक्षिणा घेतली नाही. तसेच कोणालाही आपल्या पाया पडू दिले नाही. बाबांनी गावो-गावी खेडो-पाडी, पायदळ, सायकल बैलगाडी किंव्हा मिळेल त्या साधनाने स्वखर्चानी प्रवास करून सर्वसामान्य माणसाला परमेश्वराबद्दल जागउन त्यांना दारू, जुव्वा, गांजा, सटटा, लॉटरी, कोंबड्याची काती, पटाची होड या सारखे अनेक वाईट व्यसन बंद करण्यास सांगून सत्य, मर्यादा, प्रेमाची शिकवण देऊन अंधश्रद्धा निर्मुलन, वाईट व्यसन, मुक्त समाज, मर्यादित कुटुंब, बालविवाह कुप्रथा बंद, हुंडा पद्धती बंद, स्त्रीभ्रूण हत्या बंदी यासारखे फार मोठे सामाजिक कार्य करून समाजात एक आगळेवेगळे स्थान त्यांनी मिळविले आहे. बाबांचे महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीशगड, आन्द्रप्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, गोवा तशेस भारताच्या इतर राज्यात लाखो कुटुंबातील लोक सेवक आहेत.
महानत्यागी बाबा जुमदेवजीनि मानव धर्माची स्थापना केली. मानवधर्माचा उगम हा मध्यप्रदेश मधील होसंगाबाद जिल्यात पचमडी तालुक्यातील सातपुडा पर्वतावर महाशिवरात्रीच्या पर्वावर झाला. हि यात्रा करून बाबा नागपूरला परतले व मानव धर्माची रीतसर स्थापना केली. अश्या प्रकारे महानत्यागी बाबा जुमदेवजी हे या देशातील मानव धर्माचे संस्थापक ठरले. मानव धर्माच्या रक्षणाकरिता बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरची दि ४ डिसेंबर १९६९ मध्ये स्थापना केली. माझ्यानंतर मंडळ माझे कार्य करील आणि मानव धर्माचा प्रचार व प्रसार करील असे बाबांनी सेवकांना सांगितले. तसेच एक्तेले दर्शन घडवून एकमेका साह्ये करू अवघे धरू सुपंथ या मनिप्रमाणे बाबांनी मानव सेवा हिच खरी सेवा संजून बाबांनी शेवटचा स्वास घेईस्तोवर मानवाची सेवा केली. अशा महामानवास वयाच्या ७५ व्या वर्षी ३ अक्टू १९९६ रोजी देवाज्ञा झाली.
मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य प्राथना स्थळ
मौदा येथे आश्रमाच्या दक्षिण पूर्व भागात भव्य प्राथना स्थळ उभारण्याचे काम सन २००७ पासून सुरु असून काम पुर्नत्वाश आले आहे.हे प्राथना स्थळ गोलाकार आकाराचे असून त्याचा व्यास ७० फुट व उंची ५१ फुट तसेच तीन मजलीचे आहे. प्राथना स्थळात जाण्याकरिता तीन भव्य जिने पायरी असून पायथ्याशी कुत्रिम झरा तयार करण्यात येत असून प्राथना स्थळात जाणार्या भाविक सेवकांचे पाय कुत्रिम झार्या मधून वाहणाऱ्या गार व शुद्ध पाण्याने धुतले जाणार आहेत. मानवाच्या पायाचा थेट संपर्क मेंदूशी असून तळपाय शांत झाले तर मानवाचे डोके शांत होईल व एक चित्त, एक लक्ष्य, एक भगवान या बाबांच्या शिकवणीप्रमाणे शांत चिताने मानव चिंतन व मनन करू शकेल हि या मागची कल्पना आहे.
मौदा आश्रमात रस्त्याच्या बांधकामात व सौंदर्यकरण यामध्ये शासन व मंडळ पुढे
हे आश्रम महामार्ग क्र. ६ पासून १ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. रस्त्याच्या काठाने खांब गाडून विजेचे प्रकाष्मया वातावरण असते. जेणेकरून रात्रीला येणाऱ्या जाणार्या सेवकांना त्रास होणार नाही. आश्रमात जाण्याच्या रस्त्यावर मातोश्री वाराणशी आई उद्यान याचे निर्माण करण्यात आलेले आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगीबेरंगी फुलांचा बगीचा, बगीच्यात असलेले प्राणी, लहान मुलांना खेळण्याकरिता झुला, घसरणपट्टी हे आहेत.
व्यसन मुक्ती सरकारने केली नाही ती बाबांनी केली.
भारतामध्ये सरकारने व्यसन मुक्ती मोहीम राबविली परंतु व्यसन दूर झाले नाही. परंतु या मार्गात येणाऱ्या व्यक्तीला व्यसन बंद करून आपले दुख दूर करावे लागते. त्यामुळे या मार्गात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वेसन दूर झाले. त्यामुळे प्रत्येक सेवक संमेलनात चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात कि व्यसन मुक्ती सरकारने केली नाही ती बाबांनी केली.
महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या जयंती निमित्य शासनाने सरकारी सुट्टी मंजूर करावी.
३ एप्रिल ला बाबांची जयंती सर्व देशात मनविली जाते. शोभा यात्रा भरपूर प्रमाणात निघते यामध्ये बाबांचे सेवक असतातच. परंतु इतर लोकपण असतात. यामध्ये शासनाची नौकरी करणारे लोक पण आहेत. शाळकरी मुले असतात यांना बाबांच्या जयंतीचा भरपूर फायदा घेता येत नाही. त्यामुळे शासनाने ३ एप्रिलला जयंती निमीत्य शासनाने सरकारी सुट्टी द्यावी अशी मागणी मंडळाची व सर्व सेवकांची आहे.
पुरुषोत्तम डोरले मौदा
अरुण शेंद्रे, धानला
Wednesday, January 04, 2017

सप्रेम पत्र
by खबरबात
मित्रांनो,
आज म्हणजे चार जानेवारीला मी वयाची ८४ वर्षं पूर्ण करून नववर्षात प्रवेश करतोय! तारेवरून संथपणे ओघळणाऱ्या पाण्याच्या थेंबांप्रमाणे इतकी सारी वर्षं अंगावरून ओघळून गेलीत! या क्रमात लवकरच केंव्हातरी पुढला क्षण नसणारा एक दिवस येणं ठरलेलं आहे. याचा अर्थ जी.ए. म्हणतात त्या प्रमाणे जीवनात 'स्वभाव आणि आयुष्य यांच्या मर्यादा ओळखून सारे आवरत येण्याचा काळ कधी तरी अटळपणे येतोच' जो आता माझ्या बाबतीत आलाय! वयाच्या आणि मनाच्या अशा अवस्थेत साऱ्या गतायुष्याचे एक-वाक्यी सार आपल्याला सांगता येईल का ही उत्सुकता मनात ज्या क्षणी जागली त्या क्षणीच 'इट वॉज गुड टु लिव्ह' म्हणजे 'जगणं समाधानदायी होतं' हे सारांशदायी फ्लॅशी वाक्य मनात तरळून गेलं, आणि पाठोपाठ आपल्या असल्या जगण्यामागच्या सारसुत्राची यशोtगाथा म्हणून नव्हे तर केवळ प्रायोगिक 'डाटा' म्हणून जाहीर वाच्यता करावी असा अनावर मोह झाला.
वरील संदर्भात अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे मी आयुष्यभर मनात आलं त्या प्रमाणे अविवेकी आणि बेछूटपणे वागलोय. इतक्या धाडसातून मी तगून उरलोय हे माझंच मला नवल आहे. ऐन पंचविशीत अत्यंत अनपेक्षितपणे मी सुरक्षित अशा मध्यमवर्गीय हमरस्त्यावरून म्हणजे 'हाय वे' वरून अचानकपणे आडमार्गावर म्हणजे 'माय वे' वर फेकला गेलो. त्या बदलानंतर आजपर्यंत मी जसा जगलो आणि त्यातून तगलो त्याचं यथातथ्य वर्णन असणारी म्हणून माझं जीवनगाणं झालेली वसंत सावंतांची एक कविता मुद्दाम खाली देतो आहे.
"सभोवती जग फिरत असते आपल्याच नादात एक युगांत होत असतो
त्याचे पडसाद उमटत राहतात जीवनभर ; मी वाट लटपटत चालत असतो
समोर भन्नाट माळ आणि ग्रीष्माचा झळाळ, खोल वणवा लागलेला
कोणी नसतो आसपास, पाठीवर ओझे आणि अक्षितिज मी एकटाच चाललेला
कुणाला हाक मारावी असा कुणी नाही जवळ, रक्ताचे नातेवाईक दूर
मतलबी आशांचे पुतळे, तयाची सहानभूती खोटी; कसे भरून आले ऊर
अशा वेळी गेंड्याची कातडीही फाटते.. सर्वभक्षक काळ जाणवत होता
एका अतर्क्य क्षणी मी सावरलो एवढे खरे, मला सावरणारा आत उभा होता"
थोडक्यात नियोजनपूर्वक म्हणजे पूर्ण विचारांती मी जीवनाची आखणी मुळीही केलेली नव्हती त्यामुळे जगलेल्या दीर्घ आयुष्यात जे घडत गेलं ते सारं जवळपास योगयोगी या नात्यानं अपघाती होतं. मात्र माझ्या आजवरच्या अश्या बेछूट जगण्यात कळत वा नकळत जे एक सूत्र उमटून आलेलं आज मला दिसतंय ते नेटक्या शब्दात सांगणारं सुचेता कडेठाणकरांचं एक वचन मला अलीकडेच योगायोगानं गवसलं. 'अपने होने पे मुझको यकीन आ गया' या गोबीच्या वाळवंटातल्या आपल्या धाडसी प्रवासावरच्या अनुभव लेखात त्या म्हणतात,""आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व क्षमता अजमावून बघण्याची संधी आपण स्वतःला किती वेळा देतो? संयम आणि संस्काराच्या आपण आखून घेतलेल्या मर्यादांमध्ये राहण्याच्या अट्टहासामुळे मर्यादांपलीकडे भासणाऱ्या काही गोष्टी करण्यासाठी आपण धजावताच नाही. आपल्याला असलेल्या या मर्यादा आहेत की आपल्या सोयीसाठी आपणच बांधून घेतलेले बांध आहेत, हे आपण पडताळूनच बघत नाही. आपल्यामध्ये असणाऱ्या प्रचंड शक्तीची जाणीव आपण स्वतःला होऊच देत नाही. आपल्या आयुष्यात आपल्या परीने अशक्य आणि अवघड वाटणाऱ्या गोष्टी करून बघण्याची, आपल्या सोयीच्या आणि सवयीच्या त्या परिघातून बाहेर येण्याची थोडीशी तयारी दाखवली तर आपली आपल्या स्वतःलाच नवी ओळख होते."
वेगळ्या शब्दात आत्मभान येणे वा आत्मज्ञान होणे म्हणजेच कवी सावंत म्हणतात 'तो' आपल्या आत उभा असल्याची प्रचिती येणं! विल्यम जेम्स या मानसशास्त्रज्ञानं आपल्या 'व्हेरायटीज ऑफ रीलिजस एक्स्पेरिअन्स' या गाजलेल्या ग्रंथात या मानसिक परिवर्तनाला धार्मिक परिभाषेत 'कॉन्व्हर्शन' म्हटलेलं आहे. अर्थात या साठी यातनामय नाईलाजांची किंमत मोजावी लागते! शॉर्ट कट असा नसतोच! असो!
मनोहर सप्रे
साभार फेसबूक
Saturday, November 12, 2016

वाघांसह शेतकरी संरक्षणही महत्वाचे
by खबरबात
- बंडू धोतरे
गोंडपिंपरी तालुक्यात घनदाट जंगल आहे. कुशीत अनेकांच्या उपजिविकेची शेती आहे. त्यात राबून उत्पन्न घेतले जाते. मात्र, जंगलाच्या शेजारची ही शेती वन्यप्राण्यांमुळे नष्ठ होत आहे. रात्रीच्या वेळी वन्यजीव शेतात येतात. पिकांची नासाडी करतात. हे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे शेतकरी त्रासला, वैतागला. वन्यप्राण्यापासून या पिकाचे रक्षण करण्यासाठी त्याने शेतीभोवती वीजतारांचे कुंपण केले. त्यास वीज प्रवाह सोडतात. एक नोव्हेंबरच्या रात्री वीजप्रवाह सुरू करून शेतकरी घरी परतला. आतातरी वन्यजीव नासधूस करणार नाहीत, या आशेनं तो रात्रभर निवांत झोपला. पण, एक चिंत वारंवार सतावत होती. कुण्या मनुष्याला वीजेचा धोका होऊ नये, म्हणून वीजप्रवाह सकाळीच बंद करणे गरजेचे होते. त्यासाठीच तो सकाळीच उठला. त्याने शेत गाठले. धुऱ्यावर गेला. येथील चित्र बघून धक्का बसला. हा नुसता धक्का नव्हता, तर त्याच्या हातून झालेला खून होता. कुंपणच्या जवळच जंगलाचा राजा पडला होता. तो मृतावस्थेत होता. इतक्यात व्यायामासाठी निघालेले तरुण आले. त्यांना हकीगत सांगितली. त्या वाघास रस्त्याच्या कडेला झाकून ठेवले. नंतर, दिवसभरात शेतातच गड्डा खोदला. रात्रीच्या वेळेस सदर युवक व शेतमालकाचे दोन नातेवाईकांच्या मदतीने मृत वाघास ओढत नेले. खड्डयात पुरले. पुरावे नष्ट करून गुन्ह्यापासून दूर पळण्यासाठी ते वाट शोध होते.
तीन नोव्हेंबरच्या दुपारी परिसरात काणकुण सुरू झाली. वाघ मेला, वाघ मेला बायामाणसं बोलू लागले. चर्चा गावभर झाली. पण, खात्रीशिर माहिती नव्हती. चार नोव्हेंबरला गावाचे नावे चर्चेत आले. वनविभाग खळबळून जागे झाले. इकडे शेतमालकाची धाकधूक वाढली होती. उद्या घटना उघड झाली, तर आपले काही खरे नाही, याची कल्पना त्याला आली. तो वनविभागाच्या कार्यालयात आला. छातीवर हात ठेवत हिंमत केली. घटनेची कबुली दिली. वीजप्रवाहाने वाघ मेला जी!, असे तो सांगत होता. वनाधिकारी घामघूम झाले. आता चौकशी लागणार, पंचनामा होणार? अगदी तसेच झाले. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बुजविलेला खड्डा खोदला. माती बाहेर काढली. बघतात तर काय वाघाचा मृतदेह होता. आरोपी शेतकऱ्यास ताब्यात घेतले. गुन्हा नोंद केला. वाघाचे शव वैद्यकीय तपासणीसाठी पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
काही फायदेशीर मुद्दे

विज प्रवाहाने वन्यप्राणी मारण्याच्या घटना चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहासात नव्या नाहीत. पण, अशा पद्धतीने अवैधरित्या विज प्रवाह सोडण्याच्या कृत्याचे कुणीही समर्थन करणार नाही. परंतु, अश्या घटनेत वाघ काय, कुठलेही वन्यप्राणी मारले जाणार नाही याकरीता प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाघ आणि शेतकरी दोन्ही वाचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले, तरच जिल्ह्यात व्याघ्र संवर्धनाची चळवळ यशस्वी होऊ शकते.
- 1. शेतकरी शेतपिक नुकसानीच्या समस्येपासून मुक्त होतील
- 2. मोठ्या प्रमाणात शेतपिक वाटपाची गरज वनविभागास पडणार नाही
- 3. वन्यप्राणी मृत्यूच्या घटना घडणार नाहीत
- 4. शेतपिक नुकसानी वाचल्याने पीक उत्पन्न दुपटीने वाढ होण्याची शक्यता
- 5. शेतपिक सुरक्षित राहत असल्याने काही शेतकरी बांधवाना दुबार पीक घेण्याची संधी मिळणार
- 6. वाघ-वन्यप्राणी आणि वनविभाग कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत मिळेल.
Saturday, June 04, 2016

दोन शब्द.. राजीनाम्याविषयी...
by खबरबात
- एकनाथराव खडसे
- Ø माझ्यावर ज्यांनी आरोप केले, मात्र त्यांनी पुरावे दिले नाहीत.
- Ø गेल्या ४० वर्षाच्या राजकीय जीवनात मी अनेक पदं भूषविली,
- पण यापूर्वी असा ‘मिडीया ट्रायल’ चा अनुभव कधी घेतला नव्हता.
- Ø पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या जमिनीचा बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेला टी.डी.आर. घोटाळा उघडकीस आणला. एफ्.आय.आर. दाखल करायला लावला शासनाची गेलेली टी.डी.आर. वगैरे धरून रु.४०० कोटी मुल्याची जमीन शासनास परत मिळवून दिली.
- Ø मंत्री झाल्यानंतर मंत्रीमंडळ तसेच विधी मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत जनहिताचे ११९ निर्णय घेतले.
- Ø भोसरी, पुणे येथील एमआयडीसी च्या जमिनीचा मोबदला ४८ वर्षानंतर या क्षणापर्यंत मूळ मालकाला दिला गेला नाही. या जमिनीचा निवाडा झालेला नसल्याचे व भूसंपादन अपूर्ण असल्याने भूसंपादन प्रक्रिया नव्याने राबविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, एम.आय.डी.सी. यांच्या अहवालात नमूद आहे. सदरचा व्यवहार बेकायदा व नियमबाह्य नव्हे; तर, तो दोन व्यक्तीमधील (Person to Person) असा कायदेशीर व्यवहार आहे. या संबंधीचे सर्व पुरावे सविस्तरपणे दिले. मात्र, त्याला प्रसिध्दी न देता माझ्यावर एकांगी आणि निराधार आरोप करण्यात आले.
- Ø येरवडा, पुणे येथील खाजगी बिल्डरने हडप केलेली १० एकर जमीन शासनास परत मिळवून दिली.
- Ø वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेली बेकायदा अतिक्रमणे काढून ती जमीन वक्फ बोर्डाकडे परत मिळावी म्हणून निर्णय घेतला.
- त्यामुळे अनेक जण दुखावले गेले.
- Ø महाराष्ट्रात भाजपाच्या हितासाठी, पक्षाच्या विस्तारासाठी मी काम केलं आहे.
- Ø माझ्यावरील आरोप सिध्द झाल्यास मी मंत्रीपदावरच काय, राजकीय जीवनातून माघार घेईन. पण अधिकृत पुरावे सादर करा. बिनबुडाचे, निराधार आरोप करु नका, असे मी वारंवार म्हटले आहे. निराधार आरोपांमुळे भाजपा आणि राज्य सरकार बदनाम होत आहे.
- Ø हॅकर म्हणजे चोर. त्यावर प्रसार माध्यमांनी विश्वास ठेवला, पण माझ्यावर नाही. मी दिलेल्या पुराव्यावर त्यांचा विश्वास नाही.
- Ø मला बदनाम करणाऱ्यांचीही चौकशी करा. मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
- Ø माझ्यावरील आरोपांच्या बातम्या देतांना माध्यमांनी पुरावे छापले असते, तर मला आनंदच झाला असता.
- Ø मी भरपूर लेखी पुरावे दिले. माझ्या web site (www.nathabhau.com) वर ते उपलब्ध करुन दिले. लेखी खुलासे केले. मात्र, ते न छापता, प्रसिध्दी माध्यमांनी कट केल्याप्रमाणे मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर शरसंधान केले.
- Ø भाजपानं नैतिक मूल्यांचं नेहमीच पालन केलं आहे.
- Ø माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपातून जोपर्यंत मी मुक्त होत नाही, तोपर्यंत मी मंत्री पदावर राहणार नाही.
- Ø आरोप करणाऱ्यांना केवळ माझा मानसिक छळ करायचा आहे. भाजपाला आणि मला बदनाम करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. Ø या सर्व घडामोडीत भाजप माझ्या पाठीशी राहिला, त्याबद्दल भाजपचे आभार. आणि यापुढेही पक्ष माझ्या पाठिशी राहील, असा मला विश्वास आहे.
Friday, May 27, 2016

आत्याच्या जमिनीवर भाच्याने केला बळजबरीने ताबा
by खबरबात
चंद्रपूर - आत्याच्या शेतजमिनीवर भाच्याने बळजबरीने ताबा घेतला असून, दरम्यान, याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. याप्रकरणी मोहन पावडे त्याच्या दोन साथीदाराविरोधात वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नागरी येथील नारायण श्रावण पावडे यांनी आपल्या दोन मुलींना नागरी येथील भूमापन क्र. २४४ ची जमीन मुलगी पुष्पा सुरेशराव झाडे चंद्रपूर आणि सिंधु बाबारावजी पिसे हिंगणघाट यांना बक्षीसपत्र करून दिली. या जमिनीवर मोहन बंडू पावडे याने बळजबरी करीत जमिनीवर ताबा करून ठेवला आहे. २१ मे रोजी जमीनमालक पुष्पा झाडे आणि सिंधु पिसे जमिन ताब्यात घेण्यासाठी शेतावर गेल्या. तेव्हा मोहन बंडू पावडे व त्याच्या इतर दोन साथीदाराने शेतमालक पुष्पा आणि सिंधु यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. झाडे, पिसे यांनी याची पोलिसांत तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पावडे आणि त्याच्या दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वडिलांनी बक्षीसपत्र करून दिलेल्या जमिनीचा सातबारा पुष्पा झाडे आणि सिंधु पिसे यांच्या नावाने आहे. प्रत्यक्षात जमिनीच्या मालक दोन्ही बहिणी आहेत. मात्र, त्यांच्या जमिनीचा भाचा मोहन बंडू पावडे याने ताबा घेतला. त्याची वहिवाटही तो करीत आहे. शेती मालक असल्याची आवश्यक कागदपत्रे घेऊन त्या दोन बहिणी शेतजमिनीवर कब्जा करण्यासाठी शेतावर गेल्या. तेव्हा मोहन बंडू पावडे, त्याचे साथीदार अंकुश शेलोकर, गजानन सातपूते यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती.

Wednesday, April 27, 2016

मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मितीस मान्यता
by खबरबात
मुंबई दि.२६ एप्रिल : गेल्या ३० वर्षात महाराष्ट्रात वाढलेली लोकसंख्या, खातेदारांची संख्या, महसुली गावे, तलाठ्यांकडे वेळोवेळी मोठ्या प्रमाणात सोपविण्यात आलेली कामे इत्यादींमुळे राज्यातील तलाठ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा वाढला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वाढीव तलाठी साझा व मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यास आज मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे दिली.
खडसे पुढे म्हणाले की, तलाठी साझा पुनर्रचना समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात यावी व या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतीम निर्णयासाठी सादर करण्यात यावा, असाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
महसूल विभाग लोकाभिमुख विभाग असून प्रशासकीय सुविधेसाठी राज्याचे एकूण सहा महसूली विभागात विभाजन करण्यात आले आहे. या विभागांच्या अधिनस्त एकूण ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २,०९३ मंडळ अधिकारी कार्यालये आणि १२,३२७ तलाठी साझे आहेत. तलाठी हा गाव पातळीवरील महत्वाचा कर्मचारी आहे. राज्यातील तलाठी साझा निर्मितीसाठी निकष निश्चित करण्याच्या उद्देशाने १९७४ साली डी.एन.कपूर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने निश्चित केलेल्या निकषानुसार १९८३ साली तलाठी साझांची निर्मिती करण्यात आली. आजमितीस राज्यात १२,३२७ तलाठी साझे अस्तित्वात आहेत. मात्र, वर उल्लेख केल्याप्रमाणे तलाठ्यांवर कामाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्यामुळे तसेच यासाठी तलाठ्यांच्या संघटनेने तलाठी साझांची पुनर्रचना करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी, २०१४ रोजी राज्य शासनाने नागपुरच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तलाठी साझा पुनर्रचना समिती गठीत केली होती. या समितीने गेल्या ऑगस्ट मध्ये आपला अहवाल शासनास सादर केला होता. त्यानुसार नवीन तलाठी साझा निर्मितीबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

वेंडर अॅक्टची अमंलबजावणीसाठी निर्देश
by खबरबात
केंद्रिय राज्यमंत्री हसंराज अहिर
नागपूर - वेंडर अॅक्ट कायदयांची अमंलबजावणी करण्यांचे दृष्टीने तातडीने कारवाई करावे असे निर्देष केंद्रिय रसायन व खते राज्यमंत्री हसंराज अहिर यांनी नागपूर विभागीय आयुक्तांना दिले. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी ना. अहिर यांची भेट घेवून, वेंडर अॅक्टची राज्यात अमंलबजावणी होत नसल्यांचे निदर्शनास आणून देत या कायदयाची अमंलबजावणी करण्यांची मागणी केली होती. या कायदयाची अमंलबजावणी होत नसल्यांने ना. अहिर यांनी नाराजी व्यक्त करीत, अमंलबजावणीच्या सुचना दिल्यात.नाम. अहिर यांचे आदेश प्राप्त होताच, नागपूर विभागाचे आयुक्त तथा प्रादेशीक संचालक, नगर परिषद प्रशासन नागपूर यांनी त्यांचे क्षेत्रातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांना दिनांक 17/3/2016 रोजी कार्यालयीन आदेश पाठवून, अमंलबजावणी करण्यांचे निर्देश दिले आहे.
देशात ‘द स्ट्रिट वेंडर्स प्रोटेक्षन आॅफ लाईव्हलीहूड अॅंड रेग्युलेशन आॅफ स्ट्रिट वेंडीग अॅक्ट 2014 पारित केले आहे. या कायदयामुळे देशातील फुटपाथवर किरकोळ व्यवसाय करणा—यास सरंक्षण देण्यात आले आहे. महानगर पालिका, नगर पालीका व नगर पंचायतीच्या क्षेत्रात हा कायदा लागू असून, प्रत्यक्षात मात्र हा कायदा अजूनही अमंलात आणल्या न गेल्यांने अनेक नगर पालीकाचे क्षेत्रात फुटपाथ हटावच्या नावाखाली किरकोळ व्यवसाय करणा—या गरीबांना हुसकावून लावले जात आहे. या पाष्र्वभूमीवर श्रमिक एल्गारने वेंडर अॅक्ट कायदयाची अमंलबजावणी करावी अशी मागणी लावून धरली असून, या कायदयाची सोप्या भाषेत माहिती देणारे पुस्तक प्रकाशीत केले व फुटपाथ व्यावसायीकांचा मेळावाही घेण्यात आला.
केंद्रीय राज्यमंत्री ना. हसंराज अहिर यांनी वेंडर अॅक्टच्या अमंलबजावणीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी त्यांचे आभार मानून, यामुळे किरकोळ व्यावसायीकांना लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Friday, April 22, 2016

तेलंगानात कामासाठी गेलेल्या युवकांची सुटका
by खबरबात
- श्रमिक एल्गारच्या प्रयत्नाला यश
सावली - युवक मागील 2—3 महीण्यापासुन तेलंगाना येथील कंपनीत कामावर गेले असता त्यांची मजुरी न देता परत येऊ देत नसल्याची तक्रार श्रमिक एल्गारच्या माध्यमातुन मजुरांच्या पालकांनी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचेकडे केली होती.त्यानंतर चंद्रपूर पोलीसांनी तेलंगाना पोलीसांशी संपर्क साधुन सर्व मजुरांची मजुरीसहीत सुटका होऊन घरी परतले
सावली तालुक्यातील चारगांव येथील चंद्रशेखर गजानन गावतुरे, समिर शामकुमार मडावी, जयपाल अरूण गेडाम, नागेश कपिल कुमरे, राकेश शांताराम गुरगुले, मोसम पत्रू आत्राम, शरद वेटे, रामा भैयाजी मोहुर्ले हे युवक 7 फरवरी 2016 पासून तेलंगानातील येमुलवाडा येथिल श्रीराम कोरी या दगडाच्या खदानीत काम करीत होते. 2 महीण्याचा कलावधी लोटल्यानंतरही मात्र मजुरांना गावाकडे परत येण्यासाठी मनाई केल्या जात होते, मजुरांचा छळ केल्या जात होते व मजुरीही दिल्या जात नसल्याने याबाबत पालकांनी श्रमिक एल्गारकडे तक्रार केली होती. नेहमीप्रमाणे मजुरांची अडचण लक्षात घेता ठेकेदाराचे तावडीतुन मजुरीसह सुटका करण्याचे निवेदन श्रमिक एल्गारचे माध्यमातून पालकांनी चंद्रपूरचे पोलीस उपअधिक्षक राजपूत यांचेकडे सादर केले. या प्रकरणाची दखल घेत राजपूत यांनी युवकांना सोडविण्यासाठी प्रयत्न करुन येमुलवाडा पोलीसांकडे संपर्क साधला यामुळे 8 मजूरांची सूटका होऊन 90 हजार रुपये मजुरीसह गावाकडे परत आले. यामुळे मजूर व पालकांनी श्रमिक एल्गार व चंद्रपूर पोलीसांचे आभार मानले आहे

Wednesday, April 20, 2016

ट्राली उलटून दोन ठार
by खबरबात
ट्रॅक्टरची ट्राली उलटून दोन ठार; पंधरा जखमी
कोलीतमारा-पारशिवनी रस्त्यावरील घटना
कोलीतमारा-पारशिवनी रस्त्यावरील घटना

वाघाच्या हल्ल्यात ठार
by खबरबात
चंद्रपुरात गुंजेवाही जंगलात वाघाच्या हल्ल्यात ५५ वर्षीय महिला ठार
Tuesday, March 01, 2016

शासनातर्फे नुकसान भरपाई जाहीर
by खबरबात
मुंबई दि.1 मार्च : राज्यात 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2016 पर्यंत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना पुढीलप्रमाणे दिली.
- नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी कोरडवाहू शेतीसाठी 6,800 रुपये, फळपिकासाठी प्रतिहेक्टरी 13,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये याप्रमाणे शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.
- · नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास, मृत्यु झाल्यास प्रती गाय किंवा प्रती म्हैस रुपये 30 हजार, प्रती बैल 25 हजार रुपये, प्रती गाढव रुपये 15000, प्रती शेळी/मेंढी/डुक्कर रु.3,000 याप्रमाणे प्रती कुटुंब पाच जनावरांच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. व्यक्तीचा मृत्यु झाल्यास मृताच्या वारसांना प्रतीव्यक्ती चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईसाठी असलेली पूर्वीची वयाची अट काढून टाकण्यात आली आहे.
- · पाणी टंचाई लक्षात घेता नदी, नाले इत्यादी स्त्रोतांपासून विद्युत मोटारीद्वारे अवैध पाण्याचा उपसा होत असल्यास अशा मोटारी जप्त करण्याचे तसेच इलेक्ट्रीक कनेक्शन काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रती व्यक्ती 40 लिटर या हिशेबाप्रमाणे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून येत्या 4 मार्च पासून मी स्वत: मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाऱ्याची, पाण्याची व पिकाची स्थिती यांचा अंदाज घेण्यासाठी जाणार आहे, असे मंत्री खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
- · औरंगाबाद विभाग या विभागात नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला. तर याच जिल्ह्यात 9 लहान आणि 3 मोठी जनावरे मिळून 12 जनावरे मृत पावली. बीड जिल्ह्यात 2 मोठी, लातूर जिल्ह्यात 1 मोठे उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लहान व 6 मोठी मिळून 7 जनावरे मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची एकूण संख्या 22. घरे अथवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान नाही.
- · औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्ह्यांमध्ये वरील काळात पडलेला पाऊस असा. औरंगाबाद 0.04, जालना 0.46, परभणी 6.86, हिंगोली 10.36, नांदेड 9.07, बीड 8.11, लातूर 19.13, उस्मानाबाद 12.15 .
- · नाशिक विभागामध्ये मालेगांव शहरात आंगावर झाड पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु तर ग्रामीण भागात एका बैलाचा वीज पडल्यामुळे मृत्यु, धुळे तालुक्यात एका बैलाचा मृत्यु, अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु. धुळे व गारबरडी येथे वीज पडल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यु झाला.
- · नाशिक जिल्ह्यात पडलेला पाऊस मालेगांव-2, नांदगांव-5, धुळे-6, यावल-4.3, मुक्ताईनगर-0.7, नगर अकोले-35, राहूरी -8.4, अहमदनगर-2, पाथर्डी-21, जामखेड-2.3
- · नागपूर विभागात अवकाळी पाऊस व गापीटीमुळे वर्धा जिल्ह्यात सात घरांचे तर गोंदिया जिल्ह्यात 21 घरांचे अंशत: नुकसान. भंडारा जिल्ह्यात वीज पडल्यामुळे म्हशीचे रेडकू व 22 शेळ्या मृत. · अमरावती विभागात वरील काळात एकूण 14 मी.मी. पाऊस पडला. वादळी पाऊस व गारपीटीमुळे अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात रब्बी पिकांचे व फळ पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 17 गावे बाधीत झाली आहेत. वाशिम जिल्ह्यात 5 गावांमध्ये नुकसान झाले आहे. अमरावती विभागात 61, यवतमाळ जिल्ह्यात 59 व वाशिम जिल्ह्यात 13 गावांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 गाय व 1 वासरु वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडले.
- नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान
- शासनातर्फे नुकसान भरपाई
- मुंबई दि.1 मार्च : राज्यात 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2016 पर्यंत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना पुढीलप्रमाणे दिली.
- · नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी कोरडवाहू शेतीसाठी 6,800 रुपये, फळपिकासाठी प्रतिहेक्टरी 13,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये याप्रमाणे शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.
- · नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास, मृत्यु झाल्यास प्रती गाय किंवा प्रती म्हैस रुपये 30 हजार, प्रती बैल 25 हजार रुपये, प्रती गाढव रुपये 15000, प्रती शेळी/मेंढी/डुक्कर रु.3,000 याप्रमाणे प्रती कुटुंब पाच जनावरांच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. व्यक्तीचा मृत्यु झाल्यास मृताच्या वारसांना प्रतीव्यक्ती चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईसाठी असलेली पूर्वीची वयाची अट काढून टाकण्यात आली आहे.
- · पाणी टंचाई लक्षात घेता नदी, नाले इत्यादी स्त्रोतांपासून विद्युत मोटारीद्वारे अवैध पाण्याचा उपसा होत असल्यास अशा मोटारी जप्त करण्याचे तसेच इलेक्ट्रीक कनेक्शन काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रती व्यक्ती 40 लिटर या हिशेबाप्रमाणे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून येत्या 4 मार्च पासून मी स्वत: मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाऱ्याची, पाण्याची व पिकाची स्थिती यांचा अंदाज घेण्यासाठी जाणार आहे, असे मंत्री खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
- · औरंगाबाद विभाग या विभागात नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला. तर याच जिल्ह्यात 9 लहान आणि 3 मोठी जनावरे मिळून 12 जनावरे मृत पावली. बीड जिल्ह्यात 2 मोठी, लातूर जिल्ह्यात 1 मोठे उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लहान व 6 मोठी मिळून 7 जनावरे मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची एकूण संख्या 22. घरे अथवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान नाही.
- · औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्ह्यांमध्ये वरील काळात पडलेला पाऊस असा. औरंगाबाद 0.04, जालना 0.46, परभणी 6.86, हिंगोली 10.36, नांदेड 9.07, बीड 8.11, लातूर 19.13, उस्मानाबाद 12.15 .
- · नाशिक विभागामध्ये मालेगांव शहरात आंगावर झाड पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु तर ग्रामीण भागात एका बैलाचा वीज पडल्यामुळे मृत्यु, धुळे तालुक्यात एका बैलाचा मृत्यु, अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु. धुळे व गारबरडी येथे वीज पडल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यु झाला.
- नाशिक जिल्ह्यात पडलेला पाऊस मालेगांव-2, नांदगांव-5, धुळे-6, यावल-4.3, मुक्ताईनगर-0.7, नगर अकोले-35, राहूरी -8.4, अहमदनगर-2, पाथर्डी-21, जामखेड-2.3
- नागपूर विभागात अवकाळी पाऊस व गापीटीमुळे वर्धा जिल्ह्यात सात घरांचे तर गोंदिया जिल्ह्यात 21 घरांचे अंशत: नुकसान. भंडारा जिल्ह्यात वीज पडल्यामुळे म्हशीचे रेडकू व 22 शेळ्या मृत.
- अमरावती विभागात वरील काळात एकूण 14 मी.मी. पाऊस पडला. वादळी पाऊस व गारपीटीमुळे अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात रब्बी पिकांचे व फळ पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 17 गावे बाधीत झाली आहेत. वाशिम जिल्ह्यात 5 गावांमध्ये नुकसान झाले आहे. अमरावती विभागात 61, यवतमाळ जिल्ह्यात 59 व वाशिम जिल्ह्यात 13 गावांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 गाय व 1 वासरु वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडले.
Thursday, February 25, 2016

समारंभासाठी मद्य अनुज्ञप्ती शुल्कात कपात
by खबरबात
एकनाथराव खडसे
मुंबई : राज्यातील मद्य निर्माण करणाऱ्या निर्माण्यांकडून मिळणारे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याची पध्दत सध्या उत्पादनाच्या टप्प्यावर आहे. या पध्दतीत मद्याचे कमी उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस जास्त अनुज्ञप्ती शुल्क व जास्त मद्य उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस फारच कमी प्रमाणात अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यात येते. परीणामी लहान उद्योजकांचे नुकसान होत होते. त्यामुळे या पध्दतीत बदल करुन आता मद्य निर्माता तो उत्पादित करीत असलेल्या प्रत्येक बॉक्स मागे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे जास्त मद्य उत्पादन करणाऱ्या निर्मात्यास सध्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात शुल्क भरावे लागेल. तर, कमी उत्पादन करणाऱ्या मद्य उत्पादकास कमी शुल्क भरावे लागेल. यामुळे महसुलामध्ये वाढ होईल, अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज मंत्रालयात दिली.