काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 27, 2016

मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मितीस मान्यता

मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मितीस मान्यता

मुंबई दि.२६ एप्रिल : गेल्या ३० वर्षात महाराष्ट्रात वाढलेली लोकसंख्या, खातेदारांची संख्या, महसुली गावे, तलाठ्यांकडे वेळोवेळी मोठ्या प्रमाणात सोपविण्यात आलेली कामे इत्यादींमुळे राज्यातील तलाठ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा बोजा वाढला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वाढीव तलाठी साझा व मंडळ अधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यास आज मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज येथे दिली.

     खडसे पुढे म्हणाले की, तलाठी साझा पुनर्रचना समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात यावी व या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या अंतीम निर्णयासाठी सादर करण्यात यावा, असाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

     महसूल विभाग लोकाभिमुख विभाग असून प्रशासकीय सुविधेसाठी राज्याचे एकूण सहा महसूली विभागात विभाजन करण्यात आले आहे. या विभागांच्या अधिनस्त एकूण ३६ जिल्हे, १८४ उपविभाग, ३५८ तालुके, २,०९३ मंडळ अधिकारी कार्यालये आणि १२,३२७ तलाठी साझे आहेत. तलाठी हा गाव पातळीवरील महत्वाचा कर्मचारी आहे. राज्यातील तलाठी साझा निर्मितीसाठी निकष निश्चित करण्याच्या उद्देशाने १९७४ साली डी.एन.कपूर समिती गठित करण्यात आली होती. या समितीने निश्चित केलेल्या निकषानुसार १९८३ साली तलाठी साझांची निर्मिती करण्यात आली. आजमितीस राज्यात १२,३२७ तलाठी साझे अस्तित्वात आहेत. मात्र, वर उल्लेख केल्याप्रमाणे तलाठ्यांवर कामाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्यामुळे तसेच यासाठी तलाठ्यांच्या संघटनेने तलाठी साझांची पुनर्रचना करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी, २०१४ रोजी राज्य शासनाने नागपुरच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तलाठी साझा पुनर्रचना समिती गठीत केली होती. या समितीने गेल्या ऑगस्ट मध्ये आपला अहवाल शासनास सादर केला होता. त्यानुसार नवीन तलाठी साझा निर्मितीबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
वेंडर अॅक्टची अमंलबजावणीसाठी निर्देश

वेंडर अॅक्टची अमंलबजावणीसाठी निर्देश

केंद्रिय राज्यमंत्री हसंराज अहिर 

नागपूर - वेंडर अॅक्ट कायदयांची अमंलबजावणी करण्यांचे दृष्टीने तातडीने कारवाई करावे असे निर्देष केंद्रिय रसायन व खते राज्यमंत्री हसंराज अहिर यांनी नागपूर विभागीय आयुक्तांना दिले. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी ना. अहिर यांची भेट घेवून, वेंडर अॅक्टची राज्यात अमंलबजावणी होत नसल्यांचे निदर्शनास आणून देत या कायदयाची अमंलबजावणी करण्यांची मागणी केली होती. या कायदयाची अमंलबजावणी होत नसल्यांने ना. अहिर यांनी नाराजी व्यक्त करीत, अमंलबजावणीच्या सुचना दिल्यात.
नाम. अहिर यांचे आदेश प्राप्त होताच, नागपूर विभागाचे आयुक्त तथा प्रादेशीक संचालक, नगर परिषद प्रशासन नागपूर यांनी त्यांचे क्षेत्रातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांना दिनांक 17/3/2016 रोजी कार्यालयीन आदेश पाठवून, अमंलबजावणी करण्यांचे निर्देश दिले आहे.
देशात ‘द स्ट्रिट वेंडर्स प्रोटेक्षन आॅफ लाईव्हलीहूड अॅंड रेग्युलेशन आॅफ स्ट्रिट वेंडीग अॅक्ट 2014 पारित केले आहे. या कायदयामुळे देशातील फुटपाथवर किरकोळ व्यवसाय करणा—यास सरंक्षण देण्यात आले आहे. महानगर पालिका, नगर पालीका व नगर पंचायतीच्या क्षेत्रात हा कायदा लागू असून, प्रत्यक्षात मात्र हा कायदा अजूनही अमंलात आणल्या न गेल्यांने अनेक नगर पालीकाचे क्षेत्रात फुटपाथ हटावच्या नावाखाली किरकोळ व्यवसाय करणा—या गरीबांना हुसकावून लावले जात आहे. या पाष्र्वभूमीवर श्रमिक एल्गारने वेंडर अॅक्ट कायदयाची अमंलबजावणी करावी अशी मागणी लावून धरली असून, या कायदयाची सोप्या भाषेत माहिती देणारे पुस्तक प्रकाशीत केले व फुटपाथ व्यावसायीकांचा मेळावाही घेण्यात आला.
केंद्रीय राज्यमंत्री ना. हसंराज अहिर यांनी वेंडर अॅक्टच्या अमंलबजावणीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी त्यांचे आभार मानून, यामुळे किरकोळ व्यावसायीकांना लाभ मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Friday, April 22, 2016

तेलंगानात कामासाठी गेलेल्या युवकांची सुटका

तेलंगानात कामासाठी गेलेल्या युवकांची सुटका

- श्रमिक एल्गारच्या प्रयत्नाला यश

सावली -  युवक मागील 2—3 महीण्यापासुन तेलंगाना येथील कंपनीत कामावर गेले असता त्यांची मजुरी न देता परत येऊ देत नसल्याची तक्रार श्रमिक एल्गारच्या माध्यमातुन मजुरांच्या पालकांनी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचेकडे केली होती.त्यानंतर चंद्रपूर पोलीसांनी तेलंगाना पोलीसांशी संपर्क साधुन सर्व मजुरांची मजुरीसहीत सुटका होऊन घरी परतले
सावली तालुक्यातील चारगांव येथील चंद्रशेखर गजानन गावतुरे, समिर शामकुमार मडावी, जयपाल अरूण गेडाम, नागेश कपिल कुमरे, राकेश शांताराम गुरगुले, मोसम पत्रू आत्राम, शरद वेटे, रामा भैयाजी मोहुर्ले हे युवक 7 फरवरी 2016 पासून तेलंगानातील येमुलवाडा येथिल श्रीराम कोरी या दगडाच्या खदानीत काम करीत होते. 2 महीण्याचा कलावधी लोटल्यानंतरही मात्र मजुरांना गावाकडे परत येण्यासाठी मनाई केल्या जात होते, मजुरांचा छळ केल्या जात होते व मजुरीही दिल्या जात नसल्याने याबाबत पालकांनी श्रमिक एल्गारकडे तक्रार केली होती. नेहमीप्रमाणे मजुरांची अडचण लक्षात घेता ठेकेदाराचे तावडीतुन मजुरीसह सुटका करण्याचे निवेदन श्रमिक एल्गारचे माध्यमातून पालकांनी चंद्रपूरचे पोलीस उपअधिक्षक राजपूत यांचेकडे सादर केले. या प्रकरणाची दखल घेत राजपूत यांनी युवकांना सोडविण्यासाठी प्रयत्न करुन येमुलवाडा पोलीसांकडे संपर्क साधला यामुळे 8 मजूरांची सूटका होऊन 90 हजार रुपये मजुरीसह गावाकडे परत आले. यामुळे मजूर व पालकांनी श्रमिक एल्गार व चंद्रपूर पोलीसांचे आभार मानले आहे

Wednesday, April 20, 2016

Tuesday, March 01, 2016

शासनातर्फे नुकसान भरपाई जाहीर

शासनातर्फे नुकसान भरपाई जाहीर

मुंबई दि.1 मार्च : राज्यात 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2016 पर्यंत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना पुढीलप्रमाणे दिली.

  • नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी कोरडवाहू शेतीसाठी 6,800 रुपये, फळपिकासाठी प्रतिहेक्टरी 13,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये याप्रमाणे शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.
  • · नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास, मृत्यु झाल्यास प्रती गाय किंवा प्रती म्हैस रुपये 30 हजार, प्रती बैल 25 हजार रुपये, प्रती गाढव रुपये 15000, प्रती शेळी/मेंढी/डुक्कर रु.3,000 याप्रमाणे प्रती कुटुंब पाच जनावरांच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. व्यक्तीचा मृत्यु झाल्यास मृताच्या वारसांना प्रतीव्यक्ती चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईसाठी असलेली पूर्वीची वयाची अट काढून टाकण्यात आली आहे.
  • · पाणी टंचाई लक्षात घेता नदी, नाले इत्यादी स्त्रोतांपासून विद्युत मोटारीद्वारे अवैध पाण्याचा उपसा होत असल्यास अशा मोटारी जप्त करण्याचे तसेच इलेक्ट्रीक कनेक्शन काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रती व्यक्ती 40 लिटर या हिशेबाप्रमाणे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून येत्या 4 मार्च पासून मी स्वत: मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाऱ्याची, पाण्याची व पिकाची स्थिती यांचा अंदाज घेण्यासाठी जाणार आहे, असे मंत्री खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
  • · औरंगाबाद विभाग या विभागात नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला. तर याच जिल्ह्यात 9 लहान आणि 3 मोठी जनावरे मिळून 12 जनावरे मृत पावली. बीड जिल्ह्यात 2 मोठी, लातूर जिल्ह्यात 1 मोठे उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लहान व 6 मोठी मिळून 7 जनावरे मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची एकूण संख्या 22. घरे अथवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान नाही.
  • · औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्ह्यांमध्ये वरील काळात पडलेला पाऊस असा. औरंगाबाद 0.04, जालना 0.46, परभणी 6.86, हिंगोली 10.36, नांदेड 9.07, बीड 8.11, लातूर 19.13, उस्मानाबाद 12.15 .
  • · नाशिक विभागामध्ये मालेगांव शहरात आंगावर झाड पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु तर ग्रामीण भागात एका बैलाचा वीज पडल्यामुळे मृत्यु, धुळे तालुक्यात एका बैलाचा मृत्यु, अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु. धुळे व गारबरडी येथे वीज पडल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यु झाला.
  • · नाशिक जिल्ह्यात पडलेला पाऊस मालेगांव-2, नांदगांव-5, धुळे-6, यावल-4.3, मुक्ताईनगर-0.7, नगर अकोले-35, राहूरी -8.4, अहमदनगर-2, पाथर्डी-21, जामखेड-2.3
  • · नागपूर विभागात अवकाळी पाऊस व गापीटीमुळे वर्धा जिल्ह्यात सात घरांचे तर गोंदिया जिल्ह्यात 21 घरांचे अंशत: नुकसान. भंडारा जिल्ह्यात वीज पडल्यामुळे म्हशीचे रेडकू व 22 शेळ्या मृत. · अमरावती विभागात वरील काळात एकूण 14 मी.मी. पाऊस पडला. वादळी पाऊस व गारपीटीमुळे अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात रब्बी पिकांचे व फळ पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 17 गावे बाधीत झाली आहेत. वाशिम जिल्ह्यात 5 गावांमध्ये नुकसान झाले आहे. अमरावती विभागात 61, यवतमाळ जिल्ह्यात 59 व वाशिम जिल्ह्यात 13 गावांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 गाय व 1 वासरु वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडले.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान
  • शासनातर्फे नुकसान भरपाई
  • मुंबई दि.1 मार्च : राज्यात 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2016 पर्यंत झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना पुढीलप्रमाणे दिली.
  • · नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी कोरडवाहू शेतीसाठी 6,800 रुपये, फळपिकासाठी प्रतिहेक्टरी 13,500 रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी 18 हजार रुपये याप्रमाणे शासनातर्फे मदत देण्यात येणार आहे.
  • · नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाचे नुकसान झाल्यास, मृत्यु झाल्यास प्रती गाय किंवा प्रती म्हैस रुपये 30 हजार, प्रती बैल 25 हजार रुपये, प्रती गाढव रुपये 15000, प्रती शेळी/मेंढी/डुक्कर रु.3,000 याप्रमाणे प्रती कुटुंब पाच जनावरांच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. व्यक्तीचा मृत्यु झाल्यास मृताच्या वारसांना प्रतीव्यक्ती चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. नुकसानभरपाईसाठी असलेली पूर्वीची वयाची अट काढून टाकण्यात आली आहे.
  • · पाणी टंचाई लक्षात घेता नदी, नाले इत्यादी स्त्रोतांपासून विद्युत मोटारीद्वारे अवैध पाण्याचा उपसा होत असल्यास अशा मोटारी जप्त करण्याचे तसेच इलेक्ट्रीक कनेक्शन काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रती व्यक्ती 40 लिटर या हिशेबाप्रमाणे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून येत्या 4 मार्च पासून मी स्वत: मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाऱ्याची, पाण्याची व पिकाची स्थिती यांचा अंदाज घेण्यासाठी जाणार आहे, असे मंत्री खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
  • · औरंगाबाद विभाग या विभागात नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला. तर याच जिल्ह्यात 9 लहान आणि 3 मोठी जनावरे मिळून 12 जनावरे मृत पावली. बीड जिल्ह्यात 2 मोठी, लातूर जिल्ह्यात 1 मोठे उस्मानाबाद जिल्ह्यात 1 लहान व 6 मोठी मिळून 7 जनावरे मृत्युमुखी पडली. मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची एकूण संख्या 22. घरे अथवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान नाही.
  • · औरंगाबाद विभागात एकूण आठ जिल्ह्यांमध्ये वरील काळात पडलेला पाऊस असा. औरंगाबाद 0.04, जालना 0.46, परभणी 6.86, हिंगोली 10.36, नांदेड 9.07, बीड 8.11, लातूर 19.13, उस्मानाबाद 12.15 .
  • · नाशिक विभागामध्ये मालेगांव शहरात आंगावर झाड पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु तर ग्रामीण भागात एका बैलाचा वीज पडल्यामुळे मृत्यु, धुळे तालुक्यात एका बैलाचा मृत्यु, अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यु. धुळे व गारबरडी येथे वीज पडल्यामुळे दोन व्यक्तींचा मृत्यु झाला.
  •  नाशिक जिल्ह्यात पडलेला पाऊस मालेगांव-2, नांदगांव-5, धुळे-6, यावल-4.3, मुक्ताईनगर-0.7, नगर अकोले-35, राहूरी -8.4, अहमदनगर-2, पाथर्डी-21, जामखेड-2.3
  •  नागपूर विभागात अवकाळी पाऊस व गापीटीमुळे वर्धा जिल्ह्यात सात घरांचे तर गोंदिया जिल्ह्यात 21 घरांचे अंशत: नुकसान. भंडारा जिल्ह्यात वीज पडल्यामुळे म्हशीचे रेडकू व 22 शेळ्या मृत. 
  • अमरावती विभागात वरील काळात एकूण 14 मी.मी. पाऊस पडला. वादळी पाऊस व गारपीटीमुळे अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात रब्बी पिकांचे व फळ पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. 17 गावे बाधीत झाली आहेत. वाशिम जिल्ह्यात 5 गावांमध्ये नुकसान झाले आहे. अमरावती विभागात 61, यवतमाळ जिल्ह्यात 59 व वाशिम जिल्ह्यात 13 गावांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 गाय व 1 वासरु वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडले.

Thursday, February 25, 2016

समारंभासाठी मद्य अनुज्ञप्ती शुल्कात कपात

समारंभासाठी मद्य अनुज्ञप्ती शुल्कात कपात

 एकनाथराव खडसे

मुंबई : राज्यातील मद्य निर्माण करणाऱ्या निर्माण्यांकडून मिळणारे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याची पध्दत सध्या उत्पादनाच्या टप्प्यावर आहे. या पध्दतीत मद्याचे कमी उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस जास्त अनुज्ञप्ती शुल्क व जास्त मद्य उत्पादन करणाऱ्या व्यक्तीस फारच कमी प्रमाणात अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यात येते. परीणामी लहान उद्योजकांचे नुकसान होत होते. त्यामुळे या पध्दतीत बदल करुन आता मद्य निर्माता तो उत्पादित करीत असलेल्या प्रत्येक बॉक्स मागे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे जास्त मद्य उत्पादन करणाऱ्या निर्मात्यास सध्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात शुल्क भरावे लागेल. तर, कमी उत्पादन करणाऱ्या मद्य उत्पादकास कमी शुल्क भरावे लागेल. यामुळे महसुलामध्ये वाढ होईल, अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज मंत्रालयात दिली.

Monday, February 22, 2016

फुटपाथ व्यवसायीकांचा मेळावा आज

फुटपाथ व्यवसायीकांचा मेळावा आज

चंद्रपूर - शहरातील अतिक्रमणदारांना सरंक्षण आणि त्यांचे व्यवसायाला संवर्धन देणारा 'वेंडर अॅक्ट' केंद्र सरकारने मंजूर केला असून, या कायदयाची अमंलबजावणी करण्यात यावी यादृष्टीने जनजागृती करण्यासाठी फुटपाथ व्यवसायीकांचा मेळावा आज (दिनांक 23 फेब्रु.)घेण्यात येत आहे.
चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात श्रमिक एल्गारचे वतीने दुपारी 12 वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्री. दिपक मैसेकर राहणार आहे. या निमीत्ताने 'वेंडर अॅक्ट' या पुस्तिकेचे प्रकाशन चंद्रपूर मनपाच्या महापौर राखी कंचर्लावार यांचे हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमास चंद्रपूर मनपाचे आयुक्त सुधिर शंभरकर, कामगार नेते विलास भोंगाडे, प्रा. डॉ. जयश्री कापसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
केंद्र सरकारने 2014 मध्ये शहरातील फुटपाथ व्यावसायीकांसाठी 'वेंडर अॅक्ट' मंजूर केला आहे, मात्र या कायदयाची अमंलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही. विशेष म्हणजे या कायदयाची माहीतीही फुटपाथवरील व्यावसायीकांना अजूनपर्यंत नाही. ही माहिती या व्यावसायीकांना मिळावी तसेच या कायदयाचे अमंलबजावणीच्या दृष्टीने महानगर पालीका, नगर पालिका प्रशासनाने निर्णय घ्यावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हयातील फुटपाथवरील व्यावसायीकांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी, उपाध्यक्ष विजय सिध्दावार, महासचिव विजय कोरेवार यांनी केले आहे.

Thursday, February 04, 2016

दोषींना फाशी

दोषींना फाशी

युग चांडक अपहरण आणि हत्येप्रकरणी

नागपूर : नागपुरातील युग चांडक या 8 वर्षीय चिमुकल्याच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने, आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना दोषी मानत दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

शहरातील एका 8 वर्षीय युग चांडक असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती.  
एक सप्टेंबर 2014 रोजी युगचे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापरू नगर भागातील गुरु वंदन अपार्टमेंट समोरून अपहरण करण्यात आले होते. युगचे वडील मुकेश चांडक हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. युग शाळेतून परतला आणि आपल्या राहत्या गुरुवंदन अपार्टमेंटमधील वॉचमेनकडेच आपली बेग ठेऊन, लगेच बाहेर धावत गेला.
इमारतीच्यासमोर एका दुचाकीवर दोघे जण उभे होते. त्यांच्यासोबत युग काही क्षण बोलला आणि त्यानंतर त्यांच्याच सोबत दुचाकीवर बसून निघून गेला. उशिरापर्यंत तो न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले.
ज्या पद्धतीने युग शांततेने दोन्ही अपहरणकर्त्यांसह गेला होता, त्याचा विचार करता कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे काल संध्याकाळ पासूनच नागपूर पोलिसांचे अनेक पथक नागपूर आणि आजू बाजूच्या परिसरात युगचा शोध घेत होते.
या घटनेनंतर सर्वत्र नाकेबंदीही करण्यात आली होती, मात्र तरीही युगचा शोध लागू शकला नाही. त्यानतंर काल संध्याकाळी नागपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर लोणखैरी गावाजवळ एका निर्जनस्थळी पुलाच्या खाली पाईपमध्ये युगचा मृतदेह सापडला. अपहरणाची घटना समोर आल्यापासूनच पोलिसांनी अनेक संशयितांना पकडून चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

राजेश डावरे आणि अरविंद सिंग अशी या दोघांची नावं आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात अकाऊंटटण्ट म्हणून कामाला होता. मात्र त्याने अकाऊंट्समध्ये काही घोळ केल्याने काही दिवसांपूर्वी त्याला डॉ. चांडक यांनी कामावरून काढले होते. त्याचा राग मनात ठेवून त्याने युगचे अपहरण केले.

नागपूरातील हत्या आणि अपहरणाच्या घटना-
  1. आदित्य पारेख- 2003 साली वर्मा ले-आऊट परिसरातून अपहरण
  2. हरेकृष्णा ठकराल- 2004 साली इतवारी भागातून अपहरण
  3. कुश कटारिया- 2011 साली छापरू नगर भागातून अपहरण
  4. यश बोरकर- 2012 साली खापरी परिसरातून अपहरण

शिक्षा?
*लहान मुलाचे अपहरण केल्याने फाशी
*अपहरण करून हत्या – फाशी
*अपहरण-हत्येचा कट – जन्मठेप
*पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न – 7 वर्षांची शिक्षा
*दोन्ही आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा


न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षण

  • जरी पहिलाच गुन्हा असला, तरी हा गुन्हा अपघाताने नाही. आरोपींनी अत्यंत शांत डोक्याने, विचारपूर्वक केलेलं हे क्रूर कृत्य आहे.
  • फक्त वय कमी आहे म्हणून दोषींना मोकळं सोडणे चुकीचं आहे. त्यामुळे या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही.
  • दोषींनी 8 वर्षाचा बालक जो स्वसंरक्षण करण्यास असमर्थ होता, अशा युगचं अपहरण केलं. त्यानंतर त्याची हत्या केली. त्यामुळे हा गुन्हा माफ करण्यासारखा अजिबात नाही.
  • आरोपींचं कृत्य पाहता, पालक वर्गात भयभीतता आहे. त्यामुळेच आरोपींना जरब बसण्यासाठी दोषींना कठोर शासन आवश्यक आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

Monday, February 01, 2016

मुरुडला 13 पुण्याचे विद्यार्थी बुडाले

मुरुडला 13 पुण्याचे विद्यार्थी बुडाले

9 मुली, 4 मुलांचा समावेश


मुरुड, - पुण्यातील कॅम्प परिसरातील अबिदा इनामदार महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेल्या 20 ते 22 विद्यार्थ्यांपैकी 14 विद्यार्थी बुडाले. त्यापैकी काहींना वाचविण्यात स्थानिकांना यश आले तर 14 हुन अधिक विद्यार्थी समुद्रात बेपत्ता झाले. स्थानिकांच्या मदतीने 13 विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रात बाहेर काढण्यात यश आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांत 9 मुली व 4 मुलांचा समावेश आहे.

पुण्यातील कॅम्प परिसरातील अबिदा इनामदार ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता अकरावी व बारावीतील सुमारे 126 विद्यार्थी आज सकाळी पुण्यातून तीन लक्झरी बस क्रमांक एमएच 12, जीटी 3456, एमएच 12 केए 1687, एमएच 12, एफडी 3456 या तीन लक्झरी बसमधून आले होते. करून रायगडमधील मुरूड बीचवर फिरायला गेले होते. आज सकाळी पुण्यातून निघाल्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास तेथे ते पोहचले. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर तीनच्या सुमारास हे विद्यार्थी मुरूड किना-यावरील समुद्रात पोहायला उतरले. अनेक मुले एकाच वेळी समुद्रात पोहायला गेली. अनेक मुले समुद्रात पुढे पुढे पोहत गेली. मात्र, अनेकांना पाण्याचा अंदाज न आल्याने व दमल्याने बुडू लागले. काय घडतयं हे कोणालाच कळेना. अनेक मुले बुडू लागल्याने आरडाओरड सुरु झाला व एकच गोंधळ उडाला. यात अनेक मुले समुद्रात खेचली गेली व बुडाली.
त्यांचा आक्रोश पाहून सभोवतालची लोक जमा झाले पण खोलवर पाण्यात गेल्याने त्यांना वाचवणे खूप मुश्कील झाले. यातील 9 मुली व चार मुले यांचे मृतदेह सापडले आहेत. यातील काही जणांना समुद्रात जाणार्‍या बोटीने वाचवल्याने 7 जणांना जीवनदान लाभले आहे. अद्याप समुद्रकिनारी गर्दी असून यातील काही मुलांचा शोध सुरु आहे. तीन लक्झरी बसमधील नेमकी किती मुले समुद्रात गेली याचा तपास सुरु आहे. ग्रामीण रुग्णालयात या सर्वांचे शव असून अत्यवस्थ असणार्‍यांवर इलाज सुरु आहे. मदत कार्यासाठी सर्व हिंदू मुस्लीम लोक एकवटले होते. मृतांमध्ये सर्वात जास्त मुली आहेत. सदरील घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. शिफा काझी, सुमय्या अन्सारी, सफिया काझी, युसुफ अन्सारी, फरीद सय्यद, इफ्तेकार शेख, साजिद चौधरी, समरीन शेख, शफी अन्सारी, रफिया अन्सारी, राज तंजनी, स्वप्नाली संगत, सुप्रिया पाल, एकाचे नाव समजले नाही. एकजण अत्यवस्थ आहे.

Monday, December 28, 2015

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मेहा जंगलातील घटना

सावली ः सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी एकच्या सुमारास पाथरी उपक्षेत्रातील मेहा बुजरुक बिटात घडली. मृताचे नाव शांताबाई गिरिधर भोयर (वय 40) असे आहे.
गावातील 10 ते 12 जण सकाळी गावालगतच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. मेहा बिटातील कक्ष क्रमांक 159 येथे सरपण सरपण गोळा करीत असतानाच वाघाने हल्ला चढविला. यात शांताबाई भोयर यांना प्रथम लक्ष्य केले. घटनास्थळापासून जवळपास पाचशे मीटर त्यांना ओढत नेले. यावेळी सोबत असलेल्या आत्राम नामक एका महिलेवर हल्ला केला. यात ती जखमी झाली. घाबरलेल्या अन्य सहकाऱ्यांनी गावात पळ काढून घटनेची माहिती दिली. गावातील नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना कळवून शोध घेतला. तेव्हा शांताबाई ही मृतावस्थेत, तर आत्राम जखमी होती. येथील जंगलात पाच ते सात वाघांचे वास्तव्य आहे. गेल्या 10 वर्षात गावातील शेकडो जनावरे वाघाने मारली. मानवावर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी वाघाने गावात येवून जनावरांची शिकार केली होती. शिवाय शेतशिवारात वाघाच्या एका बछड्याचा मृत्यूही झाला होता.

थंडी आणि दूध न मिळाल्याने चंद्रपुरातील बछड्यांचा मृत्यू

थंडी आणि दूध न मिळाल्याने चंद्रपुरातील बछड्यांचा मृत्यू

चंद्रपूर : चंद्रपुरातल्या सावली तालुक्यात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू थंडी आणि दूध न मिळाल्याने झाल्याचं समोर आलं आहे. चारपैकी दोन बछड्यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालातून हे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे इतर दोन बछड्यांचा अंतही आईची ऊब आणि उपासमारीमुळे झाल्याचं म्हटलं जात आहे.
 सावलीतल्या नवेगाव मार्गावर फिरायला गेलेल्या लोकांना शनिवारी ही चार वाघांची पिल्लं मृतावस्थेत आढळून आली. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सुरुवातीला हद्दीवरुन वनविभाग कर्मचाऱ्यांनी हात झटकण्याचेही प्रयत्न केले. परंतु मोठा गाजावाजा करुन सुरु झालेल्या व्याघ्र मोहीमेला या घटनेने धक्का बसला आहे.
तालुक्यात झालेल्या वाघाच्या 4 बछड्यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते भुकेपोटी या चारही बछड्यांचा अंत झाला आहे, तर वाघिणीची शिकार होऊन आईपासून ताटातूट झाल्यानं या पिल्लांचा मृत्यू झाल्याचा दावा प्राणीप्रेमी करत आहेत.  
मात्र या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बछड्यांची आई म्हणजेच वाघिण कुठे आहे? तिची शिकार झाली का? या भागात चार बछड्यांना जन्म दिलेली वाघिण आहे, याची माहिती वनखात्याला नव्हती का?
दरम्यान या मृत्यूप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Saturday, December 19, 2015

सेंद्रिय शेतीसाठी 65 कोटी रुपयांची तरतूद

सेंद्रिय शेतीसाठी 65 कोटी रुपयांची तरतूद


नागपूर, दि. 18 डिसेंबर :-राज्यात सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतुने राज्य शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पन्नास शेतकरी एकत्र येऊन समुहाने सेंद्रिय शेती करणार असल्यास त्यांना शासनाचे प्रोत्साहन राहील. आवश्यकता भासल्यास या 65 कोटी रुपयांच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधान परिषदेत सांगितले. ‍