काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, October 19, 2014

- Ballarpur

- Ballarpur

Maharashtra - Ballarpur
Counting In Progress
Candidate PartyVotes
MUNGANTIWAR SUDHIR SACHHIDANANDBharatiya Janata Party57677
MULCHANDANI GHANSHYAM KHUSHIMALIndian National Congress30213
SINGH RAJESH DURGASINGHBahujan Samaj Party6886
MANOJ DHARMA ATRAMGondvana Gantantra Party5514
KESHAVRAO BENIRAM KATREShivsena1825
ADV. HARSHAL KUMAR CHIPLUNKARMaharashtra Navnirman sena1490
PRO. DAHIWADE RAMESHCHANDRA DATTATRAYCommunist Party of India (Marxist)1005
WAMAN DAUJI ZHADENationalist Congress Party855
MANDADE RAJU NETAJIBahujan Mukti Party691
PRAJYOT DEVIDAS NALEIndependent619
ADV. ANAND SIKANDAR LAKDEAmbedkarite Party of India401
SANJAY NILKANTH GAWANDEIndependent373
WASUDEO PARSHURAM PIPREIndependent318
SANTOSH MUKA RAMTEKERepublican Paksha (Khoripa)284
VANDANA AJAY CHAVHANRepublican Party of India241
None of the AboveNone of the Above825
चंद्रपूर

चंद्रपूर

चंद्रपूर


Maharashtra - Chandrapur
Counting In Progress
Candidate PartyVotes
SHAMKULE NANAJI SITARAMBharatiya Janata Party79203
KISHOR GAJANANRAO JORGEWARShivsena49118
MENDHE MAHESH MAROTRAOIndian National Congress24383
ANIRUDDHA DHONDU WANKARBharipa Bahujan Mahasangh14515
ANKALESH NATTHUJI KHAIREBahujan Samaj Party8278
ASHOK NAMDEORAO NAGPURENationalist Congress Party7084
NALBOGA CHINNAJI BHIMAYYAIndependent1680
SUNITA BHAGWAN GAIKWADMaharashtra Navnirman sena1234
DR.PRAKASH SHANKAR RAMTEKEBahujan Mukti Party541
PRAFUL GAJANAN KHOBRAGADEIndependent415
MILIND DAHIWALEIndependent399
PRO. RAVINDRANATH MADHAV PATILAmbedkarite Party of India392
PRAMOD MANGRUJI SORTERepublican Party of India214
None of the AboveNone of the Above1965


Partywise Trends & Result

Partywise Trends & Result

Party WonLeadingTotal
Bharatiya Janata Party20101121
Communist Party of India (Marxist)101
Indian National Congress162642
Nationalist Congress Party103545
Maharashtra Navnirman sena101
Shivsena164056
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen134
Bahujan Vikas Aaghadi123
Bharipa Bahujan Mahasangh011
Peasants And Workers Party of India134
Rashtriya Samaj Paksha011
Samajwadi Party011
Independent358
Total70218288
दुपारी 2 वाजेपर्यंत

दुपारी 2 वाजेपर्यंत

नागपूर जिल्हा ग्रामीण
दुपारी २. ३० वाजेपर्यंत

काटोल
1.आशीष देशमुख. भाजप 53915
2. अनिल देशमुख. .राष्ट्रवादी 49580
3. राजू हरणे. .शिवसेना 9254
4. दिनेश ठाकरे. .कॉंग्रेस 2204

हिंगणा
1. समीर मेघे.. भाजप 58509
2. रमेश बंग.. .राष्ट्रवादी 42148
3. कुंदा राऊत. ..कॉंग्रेस 15043
4. प्रकाश जाधव. शिवसेना 4481
५. भदन्त महापंत T- Bahujan Samaj Party 13312


कामठी
1. चंद्रशेखर बावनकुळे...भाजप 123057
2. राजेंद्र मुळक. कॉंग्रेस 84615
3. तापेश्‍वर वैद्य... शिवसेना 12605
4. डॉ. महेंद्र लोधी.  राष्ट्रवादी 740

सावनेर
1. सुनील केदार... .कॉंग्रेस 84630
2. विनोद जिवतोडे. .शिवसेना 75421
3. किशोर चौधरी . राष्ट्रवादी 6139
4. प्रमोद ढोले .. मनसे 1042

उमरेड
1. सुधीर पारवे... .भाजप  90805
2. रुक्ष दास बनसोड 33578
3. राजू पारवे . ..अपक्ष 22823
4. संजय मेश्राम.. कॉंग्रेस 17376

रामटेक
1. डी. मल्लिकार्जुन रेड्डी . ..भाजप 58392
2. आशीष जयस्वाल......शिवसेना 46411
3. सुबोध मोहिते  ..कॉंग्रेस 34745
4. डॉ. अमोल देशमुख .. ..राष्ट्रवादी 9006

Saturday, October 18, 2014

कोण होणार आमदार?

कोण होणार आमदार?

15 ऑक्‍टोबर रोजी  विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात आल्यानंतर रिंगणातील उमेदवारांचा फैसला रविवारी होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होत असून, दुपारी दोनपर्यंत संपूर्ण निकाल हाती लागण्याची शक्‍यता आहे.


विदर्भ प्रमुख उमेदवार यादी- निकाल

सुधीर मुनगंटीवारही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

सुधीर मुनगंटीवारही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

भारतीय जनता पक्षातून मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्यांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. सुधीर मुनगंटीवारही आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरले आहेत.
 एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असे भाकित वर्तवण्यात येत. त्यामुळे भाजपमध्ये मुख्यमंत्रीच्या दावेदारीवरुनच स्पर्धा सुरू झाली आहे.
 पक्षाने जर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली तर ती मी घेईन असं वक्तव्य, सुधीर मुनगंटीवार यांनी केले.पंकजा मुंडेंसह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांची नावेही मुंख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.
दारुडा बाप बगीच्यात, चिमुकली खुशबू पोलिस ठाण्यात

दारुडा बाप बगीच्यात, चिमुकली खुशबू पोलिस ठाण्यात

कामठी : बाप मतिमद्यप्राशनाने बगीच्यात कुठेतरी पडलेला अन्‌ त्याची चिमुकली मुलगी खेळत होती. रात्री अंधार झाल्यावर चिमुकली बापाला शोधू लागली. मात्र, कुठेही न दिसल्याने ती रडत होती. अशातच पत्रकाराच्या मदतीने मुलीला पोलिस ठाण्यात आणले. तिच्या बापाचा शोध घेऊन पोलिसांनी त्या दोघांनाही घरी सुखरूप सोडले.

Friday, October 17, 2014

19 ऑक्टोंबर रोजी होणार मतमोजणी

19 ऑक्टोंबर रोजी होणार मतमोजणी


प्रशासनाची जय्यत तयारी

चंद्रपूर दि.17- विधानसभेसाठी 15 ऑक्टोंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवार 19 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असून प्रत्येक विधानसभेसाठी 14 टेबल लावण्यात येणार आहेत. प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली असून मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार आहे.

Wednesday, October 15, 2014

जिल्हयात सरासरी 67 टक्के मतदान

जिल्हयात सरासरी 67 टक्के मतदान

जिल्हयात सरासरी 67 टक्के मतदान

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली

107 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद




चंद्रपूर दि.15- विधानसभेसाठी आज झालेली मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळित पार पडली असून चंद्रपूर जिल्हयातील सहाही मतदान संघात सरासरी 67 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.52 टक्के मतदान झाले होते. 107 उमेदवाराचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे. मतमोजणी रविवार 19 ऑक्टोंबर 2014 सकाळी 8 वाजता होणार आहे.

चंद्रपूर जिल्हयातील राजूरा-2 लाख 96 हजार 660, चंद्रपूर-3 लाख 58 हजार 27, बल्लारपूर-3 लाख 7 हजार 267, ब्रम्हपूरी-2 लाख 55 हजार 336, चिमूर-2 लाख 62 हजार 75 व वरोरा-2 लाख 79 हजार 834 असे एकूण 17 लाख 59 हजार 146 मतदार आहेत.

जिल्हयात सहाही मतदार संघात 5 वाजेपर्यंत राजूरा-55.18 टक्के, चंद्रपूर 54.32 टक्के, बल्लारपूर-58.68, ब्रम्हपूरी-75.50, चिमूर-45.30 टक्के व वरोरा-57.85 टक्के मतदान झाले होते. 5 वाजेपर्यंत एकूण 10 लाख 11 हजार 802 मतदारांनी जिल्हयातील सहाही विधानसभा मतदार संघासाठी मतदान केले. यात 5 लाख 41 हजार 994 पुरुष तर 4 लाख 69 हजार 808 महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी 59.31 टक्के तर महिलांची मतदानाची टक्केवारी 55.58 एवढी आहे.

2009 च्या विधानसभा निवडणूकीत राजूरा 67.34, चंद्रपूर 50.04, बल्लारपूर 61.13, ब्रम्हपूरी 66.97, चिमूर 71,79 व वरोरा 63.96 असे एकूण 63.53 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत राजूरा 68.87, चंद्रपूर 54.79, बल्लारपूर 61.31, वरोरा 62.76, ब्रम्हपूरी 71.16 व चिमूर 71.77 टक्के मतदान झाले होते.

विधानसभा निवडणूकीची मतमोजणी 19 ऑक्टोंबरला होणार आहे. 70-राजूरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूरा, 71-चंद्रपूर जिल्हा उद्योग भवन (नवीन इमारत) चंद्रपूर, 72-बल्लारपूर- उपविभागीय अधिकारी कार्यालय मूल, 73-ब्रम्हपूरी- शासकीय तंत्र निकेतन नागभिड रोड ब्रम्हपूरी, 74-चिमूर राजीव गांधी भवन तहसिल कार्यालय परिसर चिमूर व 75-वरोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा या ठिकाणी त्या त्या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.
                                                               सुधीर मुनगंतीवार , चंद्रपूर     
          
अनिल देशमुख काटोल

वीज कोसळून पोलिस कर्मचारी ठार

वीज कोसळून पोलिस कर्मचारी ठार

नागपूर- पारशिवणी तालुक्‍यातील 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या आवळेघाट येथे मतदान केंद्राशेजारी पानटपरीवर वीज कोसळली. या घटनेत मतदान बंदोस्तकामी आलेले पोलिस कर्मचारी संतोष मानकर हे जागीच ठार झाले. तेथे उपस्थित पाच जण जखमी झाले. त्यामध्ये सुमित्रा चंदनकर (वय 65), संदीप भोयर (वय 25), बंटी राऊत (वय 14), दिनकर दुबे (वय 32), अखिल  देसाई (वय 18) यांचा समावेश आहे.

Monday, October 13, 2014

विकासकार्यातून कर्मभूमीचे ऋण फेडू

विकासकार्यातून कर्मभूमीचे ऋण फेडू

अनिल देशमुख यांच्याशी खास बातचीत
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
नागपूर : काटोल मतदार संघातील प्रत्येक माणसाचा सर्वांगिण विकास करण्याचा माझा संकल्प आहे. त्याच्या पूर्तीसाठी माझा सतत संघर्ष सुरू आहे. रस्ते, आरोग्य, पाणी, शिक्षण या सर्वच क्षेत्रात कामे करून काटोल मतदार संघाचा नागपूरच्या बरोबरीने विकास करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. नि:स्वार्थपणे सेवा करणे हा पिढीजात मिळालेला वारसा असून, विकासकार्यातून कर्मभूमीचे ऋण फेडू, असे प्रतिपादन अनिल देशमुख यांनी केले.
काटोल मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अनिल देशमुख यांच्याशी खास बातचीत केली. त्यांनी विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा करीत राजकीय जीवनाच्या प्रारंभीच्या आठवणींना उजाळा देत मंत्रिपदाच्या कारकिर्दीपर्यंतचा आढावा घेतला. ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात युवक कॉंग्रेसच्या चळवळीत सक्रिय होतो. तेथून राजकीय आवड निर्माण झाली. 1992 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढली. त्यात विदर्भातून सर्वांत जास्त मतांनी विजयी होण्याचा विक्रम केला. विशेष म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याचवर्षी अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊन लालदिव्याचे वाहनदेखील मिळाले. यातून ग्रामीण समस्या आणि कार्यपद्धतीचा अनुभव घेता आला. लोकांच्या आग्रहाखातर 1995 मध्ये विधानसभा निवडणूक अपक्ष लढली आणि ती पहिल्याच प्रयत्नात जिंकली. काटोल मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर त्याचवेळी युतीच्या शासनात राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सलग तीनदा आमदार होता आले.
देशमुख म्हणाले, उत्पादन शुल्कमंत्री असताना दारूबंदीसाठी 50 टक्के गावकऱ्यांनी विरोध केला, तर त्या गावातील दारू दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. रस्ते विकास महामंडळ खात्याचा मंत्री असताना बांद्रे-वरळी सी लिंग या भारतातील पहिल्या समुद्रीपुलास मंजुरी दिली. आज समुद्रातील सहा किलोमीटर लांबीचा तो पूल पूर्णत्वास आला. हा पूल आता मुंबईसाठी लॅण्डमार्क असून, देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाजवळ रामझुला पूल नवीन तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत आहे. तो एक-दीड महिन्यात पूर्ण होईल. अन्न व नागरी पुरवठा खात्याने अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. या अंतर्गत गरिबांना दोन रुपये प्रतिकिलो ग्रॅम दराने गहू आणि तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ दिले जात आहे. शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा, अन्न व औषध, उत्पादन शुल्क, राज्य रस्ते विकास, अन्न व नागरीपुरवठा अशा विविध खात्याचा मंत्री म्हणून काम करताना धोरणात्मक निर्णय घेतले. गुटखा बंदीसाठी घेतलेल्या निर्णयाला कडाडून विरोध झाला. मात्र, तो राज्याच्या व्यसनमुक्तीसाठी हिताचा होता, असेही देशमुख म्हणाले.