काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, December 13, 2013

दुर्गम भागात मुली अव्वल

दुर्गम भागात मुली अव्वल

undefined

 चंद्रपूर-  जिल्ह्यात मुलीच्या जन्मदरात जिवती तालुका अव्वल असून, ३२९ मुलांमागे ३६९ मुली असा जन्मदर आहे. जिवती तालुक्याची टक्केवारी १२१.६ असून, त्या खालोखाल गोंडपिपरी तालुक्याचा क्रमांक लागतो. गोंडपिपरी २३८ मुलांमागे २६७ मुली असा जन्मदर आहे. विशेष म्हणजे जिवती व गोंडपिपरी हे दोन्ही तालुके अतिदुर्गम भागात मोडतात.
 एप्रिल-ऑक्टोबर २०१३ या दरम्यान जिल्हा आरोग्य विभागाने ही आकडेवारी गोळा केली असून, चंद्रपूर जिल्ह्यात ८४८६ मुलांमागे ८१४४ मुलींचा जन्मदर आहे. म्हणजे ९५९.७ टक्के हा जिल्ह्याचा जन्मदर आहे. तालुकानिहाय जन्मदर खालीलप्रमाणे आहे. बल्लारपूर ३७७ मुले ३३९ मुली, भद्रावती ३८८ मुले ३५८ मुली, ब्रम्हपुरी ५५६ मुले ५३७ मुली, चंद्रपूर २९७५ मुले २८८३ मुली, चिमूर ५२२ मुले ४७६ मुली, गोंडपिपरी २३८ मुले २६४ मुली, जिवती ३२९ मुले ३६९ मुली, कोरपना ४३२ मुले ४३१ मुली, मूल ३३३ मुले ३६० मुली, नागभीड ४३९ मुले ४०३ मुली, पोंभुर्णा १२६ मुले १०६ मुली, राजुरा ३०८ मुले २८४ मुली, सावली ३८७ मुले ३७० मुली, सिंदेवाही ३९६ मुले ३०२ मुली आणि वरोडा ६८० मुले ६६५ मुली. जिल्हा आरोग्य विभागाने प्रसारित केलेली ही आकडेवारी जिवती, गोंडपिपरी, मूल, कोरपना या तालुक्यात मुलींचा जन्मदर आशा दर्शविणारा आहे.

केव्हा येणार बोंद्रे प्रकरणाचा चौकशी अहवाल

केव्हा येणार बोंद्रे प्रकरणाचा चौकशी अहवाल

दहा दिवसांपूर्वीच नोंदविले गेले २५ जणांचे बयाण

१६ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याची शक्यता



चंद्रपूर- जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विवेक बोंद्रे यांच्यावर एका महिला ग्रामसेविकेने शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. या आरोपाची सत्यता जाणून घेण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीने तक्रारकर्त्या ग्रामसेविकेसह २५ जणांचे बयाण दहा दिवसांपूर्वीच नोंदविले. मात्र, अजूनही काही बाबींची तपासणी समिती करीत आहे. त्यामुळेच अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे. दरम्यान, येत्या १६ डिसेंबरपर्यंत समिती आपला अहवाल मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांकडे सादर करणार असल्याची माहिती आहे.

बदलीच्या अनुषंगाने केलेल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप महिला ग्रामसेवकाने केला. त्याची तक्रार रामनगर पोलिसांत दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक बदनामी केल्याची तक्रार दिली. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठित करण्यात आली. या समितीत जलस्वराज्य प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता संगीता जयस्वाल, आरोग्यसेविका प्रतिभा नगराळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गेडाम, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी, दोन वकील, शिक्षण विभागाचे मोहरे यांच्यासह अन्य काही अधिकार्‍यांचा समावेश आहे.

या चौकशी समितीने ३० नोव्हेंबरला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात विवेक बोंद्रे, महिला ग्रामसेवक यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सुमारे २५ जणांचे बयाण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात नोंदविले. ही सर्व प्रक्रिया पाहिजे तशी सरळ नाही. यामुळे अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे. दोन दिवसांत संपूर्ण अहवालावर शेवटचा हात फिरविल्यानंतर समिती मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांकडे तो सादर करणार असल्याचे समजते.

बायोगॅसमधून मिळेना चहापुरताही गॅस!

बायोगॅसमधून मिळेना चहापुरताही गॅस!

सुशील नगराळे 
चंद्रपूर - शहरातील घनकचर्‍याची पूर्णत: विल्हेवाट लावून त्यापासून गॅसची निर्मिती व्हावी, या उद्देशाने पालिका प्रशासनाने चार वर्षापूर्वी भाजी मार्केटजवळ बायोगॅस प्रकल्प सुरू केला. यासाठी तब्बल १२ लाख रूपये खर्ची घातले. मात्र नियोजनाचा अभाव आणि हेळसांडपणा यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे तीनतेरा वाजले आहे.
महिन्याकाठी ९0 सिलेंडर गॅसची निर्मिती शक्य असतानाही या प्रकल्पातून सध्या चहापुरतीही गॅस निर्मिती होत नाही. मनपाच्या उदासीन धोरणामुळे हा प्रकल्प मागील पाच वर्षापासून बंद आहे. प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी लाखोंचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आता नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या मानसिकतेत मनपा प्रशासन आहे. जुन्या प्रकल्पाकडे कानाडोळा करुन नविन प्रकल्पावर खर्च करुन मनपा प्रशासनाची स्थिती 'आमदन्नी अठन्नी; खर्च रुपया' सारखी होणार असल्याची चर्चा चंद्रपुरकरांत आहे. चंद्रपूर मनपापेक्षा अर्धीच लोकवस्ती व तिजोरीतील रक्कमही कमी असताना भद्रावती नगर परिषदेने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घनकचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारला आहे.
मागील तीन वर्षापासून हा प्रकल्प सुरळीत सुरू आहे. पण तशाच पद्धतीच्या बायोगॅस प्रकल्पाची चंद्रपूर मनपा प्रशासनाची पुर्णत: विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने भद्रावती पालिकेचा आदर्श घ्यावा, अशी बोलकी प्रतिक्रिया चंद्रपूरकर देऊ लागले आहेत.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता ही लोकसंख्या चार लाखाच्या घरात आहे. त्यामुळे शहरात किचन वेस्ट आणि ग्रीन वेस्टचे प्रमाणही मोठे आहे. हा घनकचरा इतरत्र फेकून घाणीचे साम्राज्य पसरू नये व त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी या घनकचर्‍यापासून गॅस निर्मिती करण्याचा निर्णय पाच वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने घेतला. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर भाजी मार्केटजवळील जागाही निर्धारित करण्यात आली. २00६ ला औरंगाबाद येथील व्हीवम या कंपनीकडून १२ लाख रूपये खर्च करून विदर्भात पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पातून महिन्याकाठी ९0 सिलेंडर गॅस निर्मिती होणे प्रस्तावित होते. मात्र, घनकचर्‍याच्या विल्हेवाटाप्रति असलेली मनपा प्रशासनाची उदासीनता व सफाई कामगारांचा बेजबाबदारपणा यामुळे प्रारंभापासूनच हा प्रकल्प अडचणीत आला.
महिन्याकाठी ९0 सिलेंडर गॅस निर्मितीसाठी या प्रकल्पाला दररोज दीड टन घनकचरा आवश्यक आहे. शहराची लोकसंख्या बघता हे सहज शक्य आहे. परंतु, नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकल्प सध्या बंद पडला आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतरच काही दिवसांनीच बंद झाला होता. त्यानंतर कसाबसा सुरू करण्यात आला. प्रकल्पात केवळ २५0 किलो घनकचरा टाकल्या जात होता, हे विशेष. घनकचर्‍याअभावी केवळ नाममात्र गॅसची निर्मिती केली जात होती. येथे तयार होणार्‍या गॅस इतर ठिकाणी वापरण्यासाठी पाईप लाईन टाकण्याचा मानस तेव्हा पालिका प्रशासनाचा होता.
मात्र, पाईप लाईनही टाकण्यात आली नाही. शहरात दररोज ५00 किलोहून अधिक किचनवेस्ट गोळा केले जाते. घनकचराही मोठय़ा प्रमाणात जमा होतो. मात्र, याची विल्हेवाट परस्पर शहराच्या बाहेर इतरत्र केल्या जात आहे. परिणामी बायोगॅस प्रकल्प धुळखात पडला आहे. या प्रकल्पातून वीज निर्मिती करण्याचाही मानस तत्कालीन मुख्याधिकारी दिवटे यांनी वर्तविला होता. मात्र, आता चंद्रपूर महानगर पालिका झाली. एलबीटीच्या माध्यमातून जवळपास ४१ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. पण त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे सौजन्य दाखविले नाही. वीज निर्मिती तयार करणे तर सोडाच प्रकल्पात बिघाड आला. तो दुरुस्त करण्यातही मनपा प्रशासनाने हलगर्जीपणा दाखविला. परिणामत: १२ लाखाचा हा प्रकल्प चंद्रपुरकरांसाठी पांढरा हत्तीच ठरला आहे.

Monday, December 09, 2013

पाच नगरपालिका निवडणूक जाहीर

पाच नगरपालिका निवडणूक जाहीर

१२ जानेवारीला मतदान
मुंबई
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, रायगड जिल्ह्यातील कर्जत, औरंगाबाद ​जिल्ह्यातील सिल्लोड, वा​शिम जिल्ह्यातील रिसोड, चंद्रपूर ​जिल्ह्यातील ब्रम्हपुरी या पाच नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्या ठिकाणी १२ जानेवारी २०१४ रोजी मतदान होणार असून, आज मध्यरात्रीपासून तेथे निवडणूक आचारसंहिता लागू झाली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी येथे दिली.
या पाच नगरपालिकासोबतच महादुला नगरपंचायतीच्या सार्वत्रिक आ​णि सावनेर नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राच्या प्रभाग क्र. ५ ची तसेच दोन ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक कार्यक्रमः १३ ते १९ डिसेंबर, उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारणे, २० डिसेंबर उमेदवारी अर्जाची छाननी, अपिल नसलेल्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत ३० डिसेंबर २०१३. अपिलाच्या ठिकाणी निर्णयानंतर तिसऱ्या दिवशी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. १२ जानेवारी २०१४ रोजी मतदान, १३ जानेवारी २०१४ मतमोजणी व निकाल.

Saturday, December 07, 2013

महिलेला बिबट्याने केले ठार

महिलेला बिबट्याने केले ठार

चंद्रपूर शहरातील टावर टेकडी भागात आज लाकूड तोडायला गेलेल्या अर्चना तितरे या २६ वर्षीय महिलेला बिबट्याने ठार केले. नेहमी प्रमाणे टावर  टेकडी परिसरातील महिला लाकूड तोडायला लगतच्या जंगलात गेल्या. लाकूड तोडत असताना अचानक बिबट्याने अर्चना वर हला केला. दरम्यान सोबतचा महिलांनी तेथून पळ काढला आणि याची माहिती परिसरात सांगितली. लोकांनी त्या दिशेने धाव घेतला परंतु तो पर्यंत त्या महिलेला बिबट्याने ठार केले. 
 थंडीचा जोर वाढला

थंडीचा जोर वाढला

शनिवारीदेखील दिवसभर थंडीचा जोर वाढला होता . पहाटेपासून पडलेली कडाक्याची थंडी सकाळपर्यंत कायम होती. तर दिवसभर थंड वारे वाहत होते. ऐन दुपारी सावलीत उभे राहिले की गारठा जाणवत होता. गारवा वाढविणारे वारे वाहू लागले होते.
हवामान खात्यानुसार, सध्या काश्मिर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. यामुळे उत्तर भारत व उत्तर भारतातील पूर्व भागात शुष्क व थंड वारे वाहत आहेत. हे वारे थेट विदर्भावर आदळत असल्याने येथील पाऱ्यात घसरण होत आहे. गुरूवार-शुक्रवारच्या रात्री गोंदिया व नागपुरात पारा पहिल्यांदाच दहा अंशाखाली गेला. दोन्ही शहरात अनुक्रमे १० व १०.८ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यापाठोपाठ अमरावतीत पारा ११.६ अंश सेल्सिअस होता. उत्तरेतील थंड वाऱ्यांमुळे विदर्भात दिवसाही गारवा आहे. सर्वत्र कमाल पाऱ्यात तीन ते पाच अंशांची घसरण झाली आहे. हा पारा सरासरीच्या दोन अंश कमी आहे. सर्वात कमी २५.३ अंश सेल्सिअस तापमान गोंदियात नोंदविले गेले. तर नागपुरात पारा २७.३ अंश सेल्सिअस होता. विदर्भाला येत्या ४८ तासांत थंडीच्या लाटेचा विळखा पडण्याची शक्यता आहे. हिमवृष्टीसाठी आवश्यक असलेले ढग मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून काश्मिर खोऱ्याकडे सरकत आहेत. यामुळे तेथील थंड वाऱ्यांमुळे सुरूवातीला उत्तर भारत व परिणामी विदर्भात गारठा वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Thursday, December 05, 2013

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ओबिसी महिलेला मिळणार संधी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ओबिसी महिलेला मिळणार संधी

चंद्रपूर जिल्हा परिषदेत 57 सदस्य असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले आहे. जिल्हा परिषदेत या ... आरक्षण जाहीर होताच अध्यक्षपदासाठी कोण कोण पात्र आहेत, याची खातरजमा करण्यास सुरवात झाली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 29, भाजपा 19 व अपक्ष मिळून 57 सदस्य आहेत. मागील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने कमी सदस्य असतानाही राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता मिळविली. तेव्हा युवाशक्ती संघटना आणि शेतकरी संघटना, मनसेला सभापती पद देऊन भाजपने अध्यक्षपद मिळवून घेतले.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर ओबिसी महिलेला संधी मिळणार असल्याने भाजप पुन्हा एकदा हाच डाव साधेल अशी शक्यता आहे. 

Wednesday, December 04, 2013

महानगरपालिका विरोधात इको-प्रो चा ‘‘बैठा सत्याग्रह’’

महानगरपालिका विरोधात इको-प्रो चा ‘‘बैठा सत्याग्रह’’

रस्त्यावरील धुळ प्रदुषण निंयत्रणात आणण्याची मागणी

चंद्रपुरः शहरातिल रस्त्यावरील धुळ-प्रदुषण नियत्रणात आणण्याकरिता विवीध मागण्याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका विरोधात आज इको-प्रो तर्फे ‘एक दिवसीय बैठा सत्याग्रह’ करण्यात आला.
शहरातील रस्त्यावर होणाÚया धुळ प्रदुषणामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने जाणारे पादचारी, सायकल-मोटरसायकलस्वार, फेरीवाले तसेच रस्त्याच्या दुतर्फा असणारे दुकाने यांना या धुळीमुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात इको-प्रो तर्फे महानगरपालिकेला तसेच संबधीत विभागांना      सुध्दा वेळोवेळी निवदने देण्यात आली.
शहरातील धुळ प्रदुषण नियत्रंणात आणण्याकरिता महानगरपालिकेकडुन कुठलेच प्रयत्न होत नसल्याने आज ‘इको-प्रो पर्यावरण विभाग’ व ‘इको-प्रो महानगरपालिका विभाग’ यांच्या वतीने नितीन रामटेके, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख व संदिप इंगोले, इको-प्रो महानगरपालिका विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आज ‘एक दिवसीय बैठा सत्याग्रह’ करण्यात आला. सदर बैठा सत्याग्रह गांधी चैक येथे नविन महानगरपालिका इमारतीसमोर करण्यात आला. यावेळी बैठा सत्याग्रह मंडपास चंद्रपूर शहर महानगरपालिकाचे, स्थायी समीती, सभापती श्री रामु तिवारी यांनी भेट दिली. इको-प्रो च्या पदाधिकारी यांचे सोबत मागण्यासंदर्भात चर्चा करित, रस्त्याचे डांबरीकरण व सिमंेटीकरण येत्या तिन-चार महिन्यात करण्यात येणार असुन, बैठा सत्याग्रहाच्या मागण्याची तातडीने पाठपुरावा करून त्या पुर्णपणे सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन रामु तिवारी यांनी दिले. 
बैठा सत्याग्रहानंतर इको-प्रो तर्फे श्री प्रकाश बोखड, आयुक्त, मनपा यांना विवीध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. इको-प्रो तर्फे करण्यात आलेल्या एक दिवसीय बैठा सत्याग्रहास इको-प्रो च्या विवीध विभागाचे विभाग प्रमुख सहभागी झाले होते. यात नितीन बुरडकर, वन्यजिव विभाग प्रमुख, धर्मेद्र लुनावत, पोलीस विभाग प्रमुख, राजु पाटील, बाबुपेठ विभाग प्रमुख, सुभाष शिंदे, आरोग्य विभाग उपप्रमुख यांनी सहभाग घेतला.
सत्याग्रहाच्या यशस्वितेकरिता इको-प्रो पर्यावरण विभागाचे प्रज्ञा सराफ, सुमीत कोहळे, इको-प्रो महानगरपालिका विभागाचे रविद्र गुुरनुले, किशोर वैद्य, विद्या इंगोले, ओम वर्मा, जितेद्र वाळके, राजु पाटील, मनिष गांवडे, निलेश दौडकर, अक्षय खनके, अभय अमृतकर, हेमंत बुटटन, राजेश व्यास, सुनिल पाटील, दिनेश अतकर आदीनी सहकार्य केले.
फरार नारायण साई अखेर पोलिसांच्या जाळ्यात

फरार नारायण साई अखेर पोलिसांच्या जाळ्यात

 ५८ दिवसांपासून फरार होता नारायण साई

अफवांना पूर्णविराम 

 ५८ दिवसांपासून फरार  नारायण साई नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हात लपून बसल्याच्या अफवा मागील  महिन्यात होत्या. मध्यंतरी गोंडपिपरीजवळ अटक  करण्यात आल्याची बातमी पुढे आली होति. वृत्त वाहिन्यांनी  नारायण साई हा अहेरीजवळील आश्रमात राहत असल्याची बातमी चर्चेत आणली होति. मात्र, त्याला पोलिसांनी दुजोरा दिला नहि. सुरत न्यायालयाने फरार घोषित केले. आता दिल्ली- हरयाणा सीमेवर अटक करण्यात आल्याने सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
गुरुवारला  विदर्भस्तरीय मुस्लिम आरक्षण संमेलन

गुरुवारला विदर्भस्तरीय मुस्लिम आरक्षण संमेलन

चंद्रपूर- मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विदर्भस्तरीय मुस्लिम संमेलन प्रा. जावेद पाशा यांच्या अध्यक्षतेखाली रेडभवन चंद्रपूर येथे गुरुवार(५ डिसेंबर)ला होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे रफिक शेख, आबिद कुरेशी, मुस्तकीम कुरेशी, तायेरा शेख, आसिफ शेख उपस्थित राहणार आहे. डॉ. मेहमुदर्रहमान कमेटीच्या सिफारशी मंजूर करून मुस्लिम मागासवर्गीयांना ८ टक्के आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्यात येणार आहे. याउद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन अताउल्ला खान, सायरा शेख, यांनी केले आहे.

Monday, December 02, 2013

चिचखेडा येथील दारूदुकान महीलांच्या पुढाकाराने बंद

चिचखेडा येथील दारूदुकान महीलांच्या पुढाकाराने बंद

ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचखेडा येथिल देषी दारू चिल्लर विक्रीचे दुकान महीला ग्रामसभेनंतर जिल्हाधिकारी यांचे आदेषानुसार बंद करण्यात आले. ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचखेडा येथे सुरेष जैस्वाल यांचे चिल्लर देषी
दारू विक्रीचे दुकान होते. या दुकानातुन गडचिरोली व परीसरातील गावात अवैद्यरीत्या दारूची तस्करी केल्या जात होती. गावातही दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले लहान मुलेही दारूच्या आहारी जात असल्याने येथील महीलांनी श्रमिक एल्गारच्या माध्यमातुन दारूचे दुकान बंद करण्यासाठी पुढाकार घेंतला. महीलांच्या मागणीवरून दिनांक 21.12.2013 रोजी संवर्ग विकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली महीला ग्रामसभा घेण्यात आली. 
सदर ग्रामसभेत 361 महीला मतदारापैकी 284 (78.67टक्के) महीलांनी दारूबंदीच्या बाजुने हात वर करून मत मांडले. या ग्रामसभेचा अहवाल संवर्ग विकास अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला. परंतु 10 दिवसाचा कालाधी होऊनही दारू दुकान बंद न केल्याने चिचखेडा येथील षेकडो महीला अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन षुल्क कार्यालयात पोहचल्या. जिल्हाधिकारी डाॅ. दिपक म्हैसेकर यांनी तात्काळ मुबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 56(1) नुसार आदेष क्र.112013/1523/ई अन्वये सुरेष गाजीलाल जयस्वाल यांचे सीएल 3 अनुज्ञप्ती क्र. 25/2013-14 हे दुकान बंद करण्याचे आदेष राज्य उत्पादन षुल्क यांना दिले. आजच दुकान बंद करा अषी मागणी दारूबंदी विभागाकडे करीत महीलांनी कार्यालयातच घोशणाबाजी केली. त्यानंतर अधिक्षक श्री. मनपिया यांनी निरीक्षक वरोरा यांना पाठवुन दुकान बंद करण्याची कार्यवाही केली. दारू दुकान बंद झाल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.
निमगांवात दारूविक्रेत्यांना दणका

निमगांवात दारूविक्रेत्यांना दणका

- बंदीसाठी महीलांनी पकडली दारू -
परवाना दुकानदारावर कारवाईची मागणी
        सावली तालुक्यातील निमगांव येथिल श्रमिक एल्गारच्या महीला-पुरूष  कार्यकत्र्यानी 4 पेटया दारू पकडुन पोलीसांच्या हवाली केले.
        श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यानी निमगावात मागील वर्षाभरापासुन मोहीम  राबवुन दारूबंदी केली आहे. अनेकदा दारू विक्रेत्यांना पकडुन पोलीसांचे हवाली केले आहे. मागील महीण्याभरापुर्वी जिल्हाधिकारींकडे दारूच्या पेटया स्वाधीन केले. परंतु दारू विक्रेते मुजोरी करीत असल्याने त्यांना दणका  देण्याचा चंग कार्यकत्र्यांनी बांधला आहे. जे काम दारूबंदी विभाग व पोलीसांचे आहे ते काम गावातील कार्यकर्ते रात्रभर जागुन अवैद्य दारू पकडुन देत आहेत.
        शनीवारचे रात्रो 11 वाजताचे दरम्यान कार्यकर्ते मोहीमेवर असतांना बंडू  चैधरी व मुखरू भोयर हे आरोपी  गावाच्या दिशेने दारू आणीत होते त्यांना चाहुल लागताच 4 पेटया दारू सोन पळाले.    ही दारू ताब्यात घेऊन पाथरी पोलीसांना देण्यात आली.          सदर मोहीमेत प्रभाकर झाडे, गजानन झाडे, येनुबाई  झाडे, सविता डोबी, सुनिता झाडे, मिराबाई झाडे, कुसन झाडे, आत्माराम झाडे, कल्पना झाडे, आनंदराव झाडे, रूपेश चिमुरकर सहभागी होते.  पिडीत महीलेची तक्रार घेण्यास पाथरी ठाणेदाराचा नकार          पोलीस स्टेशन पाथरी येथे तक्रार देण्यास जाणाÚया महीलेची तक्रार न घेता परत पाठविल्याने उपविभागीय अधिकाÚयांच्या सुचनेनंतर तक्रार घेण्यात आली.
        पाथरी पोलीस स्टेशनमध्ये गुंजेवाही येथील आदीवासी महीला सावित्री नैताम  ही मारहाणीची तक्रार घेऊन गेली. तक्रार घेण्यास कर्मचाÚयांना सांगताच येथिल ठाणेदार अनिल घुगल यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. याबाबतची माहीती श्रमिक एल्गारचे तालुका सचिव अनिल मडावी यांना माहीत झाल्याने  त्यांनी याबाबत ठाणेदार यांना जाब विचारला. जाब विचारल्याने ठाणेदार यांनी मडावी यांचेवरच कारवाई करण्याची धमकी दिली. देशात महीलांवर अत्याचार होत असल्याने पोलीसांनी महीलांना सहकार्य करण्याचे आवाहन  करण्यात आहे परंतु येथील ठाणेदार मात्र महीलांची तक्रार घेण्यासही तयार नाही. ही गंभीर बाब असल्याने पिडीत महीलेला घेऊन उपविभागीय अधिकारी महामुनी यांचेकडे श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यांनी तक्रार दाखल केली त्यानंतर पिडीत महीलेची तक्रार घेऊन कारवाई केली.          ठाणे अधिनस्त अनेक गावात अवैद्य दारूविक्री, जुगार, सðा सुरू आहे परंतु याकडेही दुर्लक्ष करीत असतात. निमगांव सारख्या गावात अनेकदा महीला दारू पकडुन देतात परंतु ठाणेदारास मात्र मिळत नाही ही खेदाची बाब वाटते. अनेक  प्रकरणात वादग्रस्त असलेले ठाणेदार घुगल याचेवर कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.

Sunday, December 01, 2013

 कृषी विद्यापीठ विभाजन; तीन महिण्याची मुदतवाढ

कृषी विद्यापीठ विभाजन; तीन महिण्याची मुदतवाढ

चंद्रपूर - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विभाजनासंदर्भाने आठ आक्टोबरला  नाबार्डचे माजी महाव्यवस्थापक वाय. एस. पी. थोरात यांच्या नेतृत्वातील समिती सिंदेवाहित आली होति. समितीचा अहवाल तीन महिन्यात शासनाला देण्यात येणार होता. मात्र शासनाने या समितीला आणखी तीन महिण्याची मुदतवाढ दिली आहे.   
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अकरा जिल्हे असून, या सर्वच जिल्ह्यांना न्याय देण्यात विद्यापीठ अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. धान उत्पादक भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात या पीकपद्धतीविषयक संशोधनाला व्यापकता आलीच नाही, त्यामुळे या भागाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक पट्ट्यासाठी वेगळे कृषीविद्यापीठ असावे, अशी मागणी केली होती. त्यांनी मुल येथे हे विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी केली असून, समिती मात्र जनभावना लक्षात घेता नव्या विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भाने सिंदेवाहित आली होती. 
उच्चस्तरीय समितीत नाबार्डचे माजी महाव्यवस्थापक वाय. एस. पी. थोरात, कृषी आयुक्‍त उमाकांत दांगट, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक कदम, सी. डी. मायी यांचा समितीमध्ये समावेश आहे. सोमवारी (ता. 7) समितीने अकोला विद्यापीठ प्रक्षेत्राची पाहणी केली. त्यासोबतच विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजय माहोरकर, अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्याशी त्यांनी संवाद साधला. अकरा जिल्ह्यांतून प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली होती.