काव्यशिल्प Digital Media

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, October 14, 2013

के के सिंहजी कोल इंडिया वेलफेअर बोर्ड मेंबर

के के सिंहजी कोल इंडिया वेलफेअर बोर्ड मेंबर

चंद्रपूरः- राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ ( इंटक) नागपूर वर्धा रिझन के महामंत्री माननीय श्री के के सिंहजी कोल इंडिया वेलफेअर बोर्ड मेंबर ( कल्याण समिती सदस्य) के शिर्ष पदपर नामांकित किया गया. इस खबर से चंद्रपूर और यवतमाल स्थित खदानोमें हर्ष एवम उल्हास का वातावरण निर्माण हो गया है.       
        माननीय श्री के के सिंहजी पिछले २८ साल से कामगार कल्याण की दिशामे संघटनात्मक कार्य कर रहे है.  इस क्षेत्र मे उन्होने कामगार हितमे कई सफल  आंदोलनोका नेतृत्व किया. कोल इंडिया मे कुल ४६७ खदानोमे ३,५६,८७२ स्थाय़ी कामगार है. इन सभी कामगारोके कल्याकी जबाबदारी एवम जिम्मेदारी जिसमे विशेषता कामगार एवम उनके परिवार की स्वास्थ चिकित्सा, शिक्षा आवास, खेलकुद, मनोरंजन जैसे नेक जरूरी विषयोंपर विद्यमान नितियोंका कार्यान्वय एवम नई नितीया बनाना, खदानोके आसपास बसे गाव मे भी विकास एवम प्रगतिके लिए नितीया निर्धारीत करनेकी बहूत बडी जिम्मेदारी इस समितीकी है.
        राष्ट्रीयस्तर के इस समितीमे ५ संघटनोकी ओरसे कुल ६ सदस्य एवम सभी कंपनीके निर्देशक कार्मिक नुमाइंदगी करते है. जिसकी अध्यक्षता स्वयंम कोल इंडियाके निर्देशक कार्मिक करते है. उल्लेखनिय है की, इकाईकी अध्यक्षतासे अपने श्रम संघटन जिवन की शुरवात करनेवाले श्री के के सिंह पूरे वेकोलीमे पहले ऐसे नेता है जिन्होने इस शिर्ष समितीके पद को पाया है. संघटन के प्रती उनकी निष्ठा, कर्मचारीयोके अधिकारो और सुविधाओके प्रती उनकी कर्मठता और कोयला उद्योग के उज्वल भविष्य एवम विकास उनकी सोच ही उनकी हासिलियत के आधारस्तंभ है. इस उपलब्धीमे गौरव और स्वाभिमानसे लिप्त उनके सभी शुभचिंतकोने उन्हे ढेरसारा प्यार और बधाईया दी है. इस नामांकनमे संघटन के महामंत्री तथा पूर्व विधायक श्री एस. क्यु. जमा की पूर्ण भुमिका रही. जिसके लिए सभी कामगार भाईयोने एवम संघटन प्रेमियोने कोटी कोटी आभार माना.
जुन्या वादातून हत्या

जुन्या वादातून हत्या

ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथे जुन्या वादातून महादेव बागलकर वय ५५ याची कुराडीने हत्या. आरोपी आशिष देवतळे यास अटक….
माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांचे निधन

पुणे- ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ‘वनराई’चे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण मोहन धारिया यांचे सोमवारी सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते.
गेल्या काही दिवसांपासून धारिया यांना मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले होते. धारिया यांना थकव्यासोबत श्‍वसनाचाही त्रास होत होता. मागील दोन-तीन दिवसापासून त्रास वाढल्याने आणि रक्तदाब अचानक कमी झाल्याने शनिवारी त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास धारिया यांची प्राणज्योत मालवली.
महाड तालुक्यातील नाते हे त्यांचे मूळ गाव. मोहन धारिया हे उच्चशिक्षणासाठी पुण्यात आले. तेथे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. कायद्याची पदवी मिळवल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. समाजवादी विचारसरणीचे असलेले धारिया हे सुरुवातीला प्रजा समाजवादी व नंतर काँग्रेस पक्षात दाखल झाले.
धारिया १९५७ ते १९६० या कालावधीत पुणे महापालिकेचे सदस्य होते. यानंतर ते लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात विविध महत्त्वाच्या खात्यांमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले.  त्यांना नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपदही देण्यात आले होते.
१९८० साली निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर धारिया राजकारणातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर धारिया यांनी ‘वनराई’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे गावागावांमध्ये वृक्षारोपण आणि बंधारा बांधून पर्यावरण रक्षणाचे कार्य केले. स्वातंत्र्यसैनिक धारिया यांना पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला होता.

मोहन धारीया

विद्यमान
पदग्रहण
इ.स. १९७१
मागीलएस.एम. जोशी
पुढीलविठ्ठल नरहर गाडगीळ
मतदारसंघपुणे
कार्यकाळ
इ.स. १९७१ – इ.स. १९७७
मागीलएस.एम. जोशी
पुढीलमोहन एम. धारीया
मतदारसंघपुणे
कार्यकाळ
इ.स. १९७७ – इ.स. १९८०
मागीलमोहन एम. धारीया
पुढीलविठ्ठल नरहर गाडगीळ
मतदारसंघपुणे

राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेसजनता पक्ष
निवासपुणे
चंद्रपुरात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन

चंद्रपुरात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन

 रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे उपस्थित राहणार

चंद्रपूर : चंद्रपूर- येथील दीक्षाभूमीवर 57 धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ 15 आणि 16 ऑक्‍टोबर रोजी होत असून, राज्यभरातील बौद्धबांधवांचे जत्थे येथे दाखल झाले आहेत. मुख्य मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन दीक्षाभूमीकडे मिरवणूक निघेल.

१६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या दिनानिमित्त ५७ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दोन दिवस चालणाèया या सोहळ्यात विविध परिसंवाद, बुद्ध भिमगीतांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सोहळ्याचे उद्घाटन श्रीलंकेतील उच्च आयोगाचे प्रशासकीय सचिव भदन्त पाल्लेगम विजिथा थेरो यांच्या हस्ते होत असून, प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे उपस्थित राहणार आहेत.
शेतकरी संघटना अधिवेशन

शेतकरी संघटना अधिवेशन

                                                                                                                                                     
       शेतकरी संघटना अधिवेशन                       


अन्नसुरक्षेमुळे देशापुढे दिवाळखोरी

चंद्रपूर - सीलिंग शब्द फक्त शेतीसाठीच वापरला जातो. उत्पन्नाच्या साधनांवर मर्यादा म्हणजे माणसांच्या कर्तृत्वाला वेसण घालणे होय. अन्नसुरक्षेमुळे देशापुढे दिवाळखोरीशिवाय पर्याय नाही, असा सूर शेतकरी संघटनेच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात निघाला.

12 व्या शेतकरी संघटना संयुक्त अधिवेशनात तिसऱ्या दिवशी "अन्नसुरक्षा, सीलिंग कायदा व शेड्यूल9' या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. अध्यक्षस्थानी ऍड. अनंत उमरीकर हे होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांना नागविणारे कायदे करून सरकार देशात भीतीचे वातावरण तयार करीत आहे. त्यांना गुलाम बनविण्याचे धोरण आखत आहे. माजी खासदार भूपेंद्रसिंह मान यांनीही या चर्चासत्रात भाग घेताना सांगितले की, सरकार देशात गुलामगिरीची परिस्थिती निर्माण करीत आहे. अधिवेशनातून स्वातंत्र्यासाठी जोरदार आंदोलनाचा बिगुल फुंकणे गरजेचे आहे. गोविंद जोशी यांनी सांगितले की, अन्नसुरक्षा कायद्यामुळे शेतजमिनीत गुंतवणूक करून शेती करण्याचा उत्साहच मावळला आहे. या माध्यमाने शेतकऱ्यांच्या कर्तृत्वावर वेसण घालण्याचे कारस्थान केले जात आहे. मानवेंद्र काचोळे यांनी सीलिंग हा शब्द फक्त शेतीलाच का, असा प्रश्‍न उपस्थित करून उत्पादनाच्या साधनांसह उत्पन्नावर मर्यादा आणणारा हा काळा कायदा असल्याचे सांगितले. श्रीकृष्ण उमरीकर म्हणाले, सरकारकडे धान्य साठविण्याच्या गोदामाचीच कमतरता असताना आणि सरकारी गोदामातील सडलेल्या धान्याचे चित्र डोळ्यापुढे असताना केंद्र सरकारची अन्नसुरक्षा ही शुद्ध फसवेगिरी आहे. सरोज काशीकर यांनीही या कायद्यावर कडाडून हल्ला चढवला.

---------------------------------------------------
विदर्भवादी भरविणार नागपुरात अधिवेशन

चंद्रपूर : २८ सप्टेंबर रोजी विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटना व विदर्भ संयुक्त कृती समितीच्या वतीने नागपूर कराराची होळी करण्यात आली. त्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याचे विदर्भवाद्यांनी घोषित केले. आता स्वतंत्र विदर्भ राज्याचे पहिले प्रतिअधिवेशन नागपूर येथे ६ व ७ डिसेंबर रोजी भरविण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र राज्य विधानसभेपेक्षा लोकोपयोगी निर्णय घेण्यात येतील, असे मत शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार शरद जोशी यांनी व्यक्त केले.
शेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन येथील चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी 'स्वतंत्र्य विदर्भाची गरज' याविषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी स्वागताध्यक्ष अँड. वामनराव चटप, मोर्शी मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे, विदर्भ संयुक्त कृती समितीचे राजकुमार तिरपुडे, माजी आमदार भोला पटेल, पंजाबचे अखिल भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष सरदार भूपेंद्रसिंग मान, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, माजी आमदार सरोज काशिकर, रवी देवांग, शैलेजा देशपांडे, अमद कादर, दीपक निलावार, माजी पोलीस आयुक्त प्रविण चक्रवर्ती आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार बोंडे म्हणाले, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. मुंबईतील राज्यकर्ते विदर्भात केवळ सहल करण्यासाठी येतात. त्यांना विदर्भाच्या विकासाबद्दल काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे विदर्भ वेगळा करणे आता आवश्यक असल्याचे ते म्हणाले. परिसंवादात अनेक विदर्भवादी नेत्यांनी आपले मत मांडले. मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्यात येत आहे. मात्र या मागणीकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करीत असल्याचे मत माजी आमदार भोला पटेल यांनी व्यक्त केले.
यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्यासंदर्भात अनेक ठराव घेण्यात आले. परिसंवादाला मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
--------------------------------------------------------------
हमीभाव, वीजप्रश्‍नी सर्वव्यापी आंदोलन हवे

चंद्रपूर : शेतकरी हा माणूस आहे आणि तो सधन झाला पाहिजे, यासाठी जोरकस प्रयत्न होणे गरजेचे आहे. उत्पादन खर्च भरून निघेल इतका भाव दिल्या गेला पाहिजे आणि कराराप्रमाणे शेतकऱ्यांना पूर्ण दाबाची वीज 24 तास कमी दरात मिळावी, यासाठी वीज कंपन्यांचे खऱ्या अर्थाने खासगीकरण व्हावे, यासाठी शेतकरी संघटनांचे सर्वव्यापी आंदोलन हवे, असा सूर येथे सुरू असलेल्या 12व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनातील पहिल्या चर्चासत्रातून उमटला.

12व्या शेतकरी संघटना संयुक्त अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला सुरवात झाली. "शेती प्रश्‍न, कर्ज व वीजबिल मुक्ती' या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी अनिल धनगट होते. चर्चासत्रात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपली मते मांडली.

या वेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अनिल धनगट म्हणाले, ""शेतकरी सरकारचे काहीही देणे लागत नाही. उलट सरकारकडूनच शेतकऱ्यांना येणे बाकी आहे. त्यामुळे कर्ज बुडविण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. सरकारने 24 तास पूर्ण दाबाने वीज देण्याचा करार करूनही कधी कमी तर कधी जास्त दाबाची वीज पुरविली आहे. वीज क्षेत्रात वेगवेगळ्या खासगी कंपन्यांनी उतरून स्पर्धा झाली आणि खऱ्या अर्थाने खासगीकरण झाले, तर कमी किमतीची व योग्य दाबाची वीज शेतकऱ्यांना मिळू शकेल, असे सांगितले.

या चर्चासत्रातील पहिले पुष्प गुंफले ते नाशिकचे शिवाजीराव राजोळे यांनी. ते म्हणाले, ""या देशात कधी नोकरशहा, कारखानदार किंवा राजकारण्यांनी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. केवळ शेतकऱ्यांवरच ही वेळ आली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. मतांवर डोळा ठेवून गुंडाकरवी चालविले जाणारे राजकारण संपविणे अत्यंत गरजेचे आहे.''

नांदेड येथील ऍड. धोंडोबा पवार म्हणाले, ""अन्नसुरक्षेमुळे देशातील शेतकऱ्यांसमोर महासंकट उभे राहिलेले आहे. शेतकऱ्यांना खर्चावर आधारित मूल्य मिळाले, तर या देशातील गरिबी हटण्यास वेळ लागणार नाही.''

जळगावच्या कडूअप्पा पाटील यांनी ""शेतकऱ्यांनी कर्जमुक्त होऊ नये असेच सरकारचे धोरण आहे. या धोरणाला चोख उत्तर देण्यासाठी येत्या निवडणुकीत संघटनेनेही व्यापक धोरण तयार करावे.'' असे मत व्यक्त केले.

यवतमाळचे विजय निवल यांनी, "शेतकरीच व्यापारी म्हणून समोर आला पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. शेतातील खनिज संपत्तीवर त्याचा अधिकार असला पाहिजे. ही खनिज संपत्ती विकण्याची त्याला परवानगी असली पाहिजे.' असे मत नोंदविले.

नाशिकच्या रामनाथ टिकले यांनी गावागावांतील पतसंस्थाही आता शेतकऱ्यांची लूट करीत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. तर श्रीकांत उमरीकर यांनी विजेच्या प्रश्‍नावर आंदोलन उभारताना नागरी लोकांसह उद्योजकांनाही सोबत घ्यावे, असे सुचविले.

प्रास्ताविकात गुणवंत पाटील हंगर्णेकर म्हणाले, की शेतकरी संघटनेने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊनच सरकारने 72 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. मात्र संघटनेने कधीही कर्जमाफी मागितली नाही, तर संपूर्ण कर्जमुक्ती हाच आमचा नारा आहे. शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळच येणार नाही अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे.
----------------------------------------------------
विदर्भच नव्हे वेगळा मराठवाडा, कोकणही आवश्यक’

पंकज मोहरीर, ,चंद्रपूर

विदर्भाला वसाहत असल्याप्रमाणे वागविले जात आहे. नागपूर कराराच्या नव्हे तर काही वेगळ्या आधारांवर गळ्या विदर्भाची निर्मिती होणे आवश्यक आहे. केवळ विदर्भच नव्हे तर त्याच धर्तीवर मराठवाडा, कोकण वेगळा होणे गरजेचे असल्याचे परखड मत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांनी 'व्यक्त केले. शेतकरी संघटनेच्या बाराव्या अधिवेशनानिमित्ताने शरद जोशी चंद्रपुरात आले आहेत.
विदर्भातील कापूस, कोळसा संदर्भातील बाबी या महाराष्ट्राच्या बाजूने तर विदर्भाविरोधात आहेत. ३७ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विदर्भाला वसाहत असल्यासारखी वागणूक मिळत आहे. तोच प्रकार तेलंगणबाबतीत आहे. आंध्र प्रदेश तेलंगणाला वसाहतीप्रमाणे वागवित असल्यानेच तेथे वेगळेपणाची भावना निर्माण झाली. एखाद्या भागाला दुसरा भाग दुजाभाव देत असेल तर स्वाभाविकपणे स्वतंत्र होण्याची वृत्ती बळावते. वेगळ्या विदर्भासोबतच वेगळा मराठवाडा व कोकणालाही त्यांनी पाठिंबा दर्शविला.
शेतकरी समाजाची एकूण संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. शेतजमिनी उद्योगधंद्यात, सेझमध्ये जात आहेत. आज शेतकरी समाजाचा आकार लहान होत चाललेला आहे. स्वाभाविकपणे त्याचा परिणाम संघटनेवर होत असल्याचे त्यांनी दिली.




दीप प्रज्वलन अधिवेशनाचे उद्घाटन करताना पाहुणे
जैवतंत्रज्ञानाला जाणीवपूर्वक विरोध
अधिवेशनाला प्रारंभ: काशीकर यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या ६६ वर्षात शेतकर्‍यांविरोधी धोरण आखून शासनाने शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आणली आहे. यात एक आशेचा किरण म्हणून हरितक्रांतीने जैवतंत्रज्ञानाला वाव मिळाला. मात्र राजकीय नेते जैवतंत्रज्ञानाला विरोध करीत असून शेतकर्‍यांविरूद्ध षडयंत्र आखले जात असल्याचे मत केसीसीच्या अध्यक्ष माजी आमदार सरोज काशीकर यांनी व्यक्त केले. 
स्थानिक चांदा क्लब ग्राऊंड येथील मैदानावर आयोजित १२ व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उद्घाटक म्हणून शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी, स्वागताध्यक्ष माजी आमदार अँड. वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष रवी देवांग, गुणवंत हंगेकर, सुरेशचंद्र म्हात्रे, अनंत उमरीकर, अनिल धनवत, राम नेवले, शैलजा देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद जोशी म्हणाले, शेतकर्‍यांच्या हितासाठी अनेक कायदे आणि धोरणे बदलविण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी संसदेच्या सभागृहात शेतकर्‍यांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी असावे.
त्या दृष्टीने या अधिवेशनात लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरविली जाईल. आज अनेक राजकीय नेते शेतकरी संघटनेची भाषा बोलायला लागले आहेत. परंतु त्यांना शेतकर्‍यांची जाणीव नसल्यानेच शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यावेळी अनेक विषयांवर अधिवेशनात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी स्वागताध्यक्ष अँड. वामनराव चटप यांनी मार्गदर्शनात अधिवेशनाचे विषय आणि रूपरेषा विषद केली. अधिवेशनासाठी चांदा क्लब ग्राऊंडवर हजारो शेतकरी पहिल्याच दिवशी दाखल झाले आहेत. यात अनेक शेतकरी पत्नी, मुलांसह राज्यातून तसेच राज्याबाहेरून आलेले आहेत. विशेष म्हणजे, उत्तरप्रदेशातून किसान युनियनचे ३00 कार्यकर्ते दाखल होताच त्यांच्या डोक्यावरील हिरव्या टोप्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.


उत्पादनखर्च भरून निघणारा भाव द्या
पहिल्या चर्चासत्रात उमटला सूर

माणूस मोठा झाला तर देश आपोआप मोठा होईल. शेतकरी हा माणूस आहे आणि शेतकरी सधन झाला पाहिजे, यासाठी जोरकस प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणूनच उत्पादन खर्च भरून निघेल इतका भाव दिला गेला पाहिजे, आणि कराराप्रमाणे शेतकर्‍यांना पूर्ण दाबाची वीज २४ तास कमी दरात मिळावी, यासाठी वीज कंपन्यांचे खर्‍या अर्थाने खाजगीकरण झाले पाहिजे. यासाठी शेतकरी संघटनेने सर्वव्यापी आंदोलन पेटवावे, असा सूर येथे सुरू असलेल्या १२ व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनातील पहिल्या चर्चासत्रात उमटला.
१२ व्या शेतकरी संघटना संयुक्त अधिवेशनाचे संघटनेचे प्रणेते, माजी खासदार शरद जोशी यांचे हस्ते थाटात उद््घाटन झाल्यानंतर पहिल्या सत्राला सुरुवात झाली. शेती प्रश्न, कर्ज व वीजबिल मुक्ती या विषयावर आयोजित चर्चासत्राचे अध्यक्षस्थानी अनिल धनगट होते. या चर्चासत्रात वेगवेगळय़ा ठिकाणच्या शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपली मते मांडली.
शेतकरी सरकारचे काहीही देणे लागत नाही. उलट सरकारकडूनच शेतकर्‍यांना येणे बाकी आहे. त्यामुळे कर्ज बुडविण्याशिवाय शेतकर्‍यांना पर्याय नाही. सरकारने २४ तास पूर्ण दाबाने वीज देण्याचा करार करूनही कधी कमी तर कधी जास्त दाबाची वीज केवळ आठ तासच पुरविली आहे. वीज क्षेत्रात वेगवेगळय़ा खाजगी कंपन्यांनी उतरून स्पर्धा झाली आणि खर्‍या अर्थाने खाजगीकरण झाले तर कमी किंमतीची व योग्य दाबाची वीज शेतकर्‍यांना मिळू शकेल, असे अध्यक्षस्थानावरून बोलताना अनिल धनगट यांनी सांगितले.
नाशिकचे शिवाजीराव राजोळे यांनी या चर्चासत्रातील पहिले पुष्प गुंफले. या देशात कधी नोकरशहा, कारखानदार किंवा राजकारण्यांनी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. केवळ शेतकर्‍यांवरच ही वेळ आली आहे आणि शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. मतांवर डोळा ठेवून गुंडाकरवी चालविले जाणारे राजकारण संपविणे अत्यंत गरजेचे आहे.
अन्न सुरक्षेमुळे देशातील शेतकर्‍यांसमोर महासंकट उभे राहिलेले आहे. शेतकर्‍यांना खर्चावर आधारित मूल्य मिळाले तर या देशातील गरिबी हटण्यास वेळ लागणार नाही, असे नांदेड येथील अँड. धोंडोबा पवार यांनी सांगितले. जळगावच्या कडूअप्पा पाटील यांनी, शेतकर्‍यांनी कर्जमुक्त होऊ नये असेच सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. या धोरणाला चोख उत्तर देण्यासाठी येत्या निवडणुकीत संघटनेनेही व्यापक धोरण तयार करावे, असेही ते म्हणाले.
तर यवतमाळचे विजय निवल यांनी, शेतकरीच व्यापारी म्हणून समोर आला पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. शेतातीला खनिज संपत्तीवर त्याचा अधिकार असला पाहिजे. ही खनिज संपत्ती विकण्याची त्याला परवानगी असली पाहिजे. नाशिकच्या रामनाथ टिकले यांनी, गावागावांतील पतसंस्थाही आता शेतकर्‍यांची लूट करीत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. तर श्रीकांत उमरीकर यांनी विजेच्या प्रश्नावर आंदोलन उभारताना नागरी लोकांसह उद्योजकांनाही सोबत घ्यावे, असे सुचविले. आपल्या प्रास्ताविक भाषणातून गुणवंत पाटील हंगर्णेकर यांनी, शेतकरी संघटनेने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊनच सरकारने ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. मात्र, संघटनेने कधीही कर्जमाफी मागितली नाही. तर संपूर्ण कर्जमुक्ती हाच आमचा नारा आहे. शेतकर्‍यांना कर्ज घेण्याची वेळच येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

दिनांक ९-११-२०१३

सकाळी   ०९.०० ते १२.००        महिलांचे प्रश्न, मालमत्तेचा अधिकार, संरक्षण
दुपारी      १२.०० ते ०१.००        सुट्टी
दुपारी      ०१.०० ते ०४.००        लहान राज्य व स्वतंत्र विदर्भ राज्य का हवे?
सायं        ०४.०० ते ०४.३०        सुट्टी
सायं        ०४.३० ते ०७.३०        अन्न्सुरक्षा, सिलींग कायदा व राज्यघटनेतील शेड्यूल-९
दिनांक १०-११-२०१३

सकाळी   ०९.००                      हुतात्म्यांना श्रद्धांजली
सकाळी   ०९.०० ते ११.००        युवकांपुढील आव्हाने व बेरोजगारीचा प्रश्न
सकाळी   ११.०० ते ०१.००        मोटारसायकल रॅली
दुपारी   ०२.०० खुले अधिवेशन

अध्यक्ष – मा. शरद जोशी, शेतकरी संघटनेचे प्रणेते व राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप
प्रमुख उपस्थिती – 
        मा. वेदप्रकाश वैदीक, माजी अध्यक्ष, पी.टी.आय
        मा. जयप्रकाश नारायण, आमदार, लोकसत्ता पार्टी
        मा. भुपेंद्रसिंग मान, अध्यक्ष, अ.भा. किसान समन्वय समिती
        सौ. सरोजताई काशीकर, माजी अध्यक्ष, अ.भा. किसान समन्वय समिती
        डॉ. मानवेंन्द्र काचोळे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, स्वभाप
        अ‍ॅड दिनेश शर्मा, अध्यक्ष, स्वभाप, युवा आघाडी
*************************************************************
वृत्त प्रायोजक
krushi kendra

Sunday, October 13, 2013

 लाखो निळी पाखरे दीक्षाभूमीवर

लाखो निळी पाखरे दीक्षाभूमीवर



नागपूर- देश-विदेशातील लाखो निळी पाखरे दीक्षाभूमीवर विसावली आहेत , येथील माती मस्तकाला लावण्यासाठी ,नवी ऊर्जा घेण्यासाठी... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्त्वापुढे नतमस्तक होण्यासाठी. याच पाखरांच्या साक्षीने आज रविवारी दीक्षाभूमीवर सायंकाळी ६ वाजता ५७ वा धम्मचक्रप्रवर्तनदिन साजरा होत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य सोहळा होईल. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रा.सु. गवई असतील.

 पावसाचे दिवस असल्याने मान्यवरांसाठी व्यासपीठावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय दीक्षाभूमीकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. विशेष असे की, बजाजनगराकडून व्यासपीठाकडे जाणारा रस्ता गुळगुळीत करण्यात आला असून या रस्त्यावर स्मारक समितीतर्फे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.

पोस्टर स्पर्धा

दीक्षाभूमीच्या चहूबाजूंनी मोठमोठे फलक भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. काछीपुरा रोडवर नगरसेवक प्रकाश गजभिये यांनी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची छायाचित्रे असलेले प्रवेशद्वार लावले आहे. याशिवाय सलील देशमुख, मनसे, बसपाचे मोठमोठे होर्डिंग्ज लावलेले आहेत. लक्ष्मीनगराकडून येणार्‍या रस्त्यांवर पीरिपाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे व त्यांचा मुलगा जयदीप कवाडे यांची छायाचित्रे असलेले प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधत आहेत. शासकीय चित्रकला महाविद्यालयासमोर माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी भव्य होर्डिंग्ज लावले असून भाविकांना याचे आकर्षण वाटत आहे.

भिक्खू संघास तीन दिवस भोजनदान

बौद्ध धम्मात भिक्खूंना भिक्षा मागूनच अन्न ग्रहण करावे लागते. बुद्धविहारात वास्तव्यास राहून धम्मप्रचार व प्रसार करणे भिक्खूंकडून अपेक्षित असते. देशभरातून दीक्षाभूमीवर भिक्खू दाखल झाले आहेत. त्यांंच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी भिक्खूणी रूपानंदा यांनी पुढाकार घेतला आहे. पंचशील महिला मंडळातर्फे भिक्खूंसाठी तीन दिवसीय भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. विशेष असे की, भिक्खू हे दुपारी १२ वाजेपूर्वी अन्नग्रहण करीत असतात. त्यानंतर सायंकाळचे भोजन त्यांच्यासाठी वर्ज्य असते.

बोधिवृक्षाखाली सूत्तपठन

दीक्षाभूमीवर असलेल्या बोधिवृक्षाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गौतम बुद्धांनी ज्या बोधिवृक्षाखाली बोधिसत्त्व प्राप्त केले त्या वृक्षाचे रोपटे नेपाळहून येथे आणण्यात आले आहे. या रोपट्याचे आता बोधिवृक्षात रूपांतर झाले असून याच ऐतिहासिक बोधिवृक्षाखाली भिक्खू संघाचे सूत्तपठन सुरू होते. यात देशविदेशातून आलेले शेकडो भिक्खू सहभागी झाले होते. विशेष असे की, याठिकाणी भिक्खू बनणार्‍यांसाठी रीतशीर दीक्षा दिली जात होती. तसेच त्यांना चिवरदान केले जात होते.

धम्मदीक्षा सोहळा

भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात देशभरातून आलेल्या भाविकांना बुद्ध धम्माची दीक्षा देण्यात येत होती. हा सोहळा १० ऑक्टोबरपासून दीक्षाभूमीवर सुरू आहे.

पादत्राणांसाठी प्लास्टिक पिशव्यांचे वाटप
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता स्थानिक बौद्ध बांधवांनी आदल्या दिवशीच बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यामुळे शनिवारी सायंकाळी दीक्षाभूमीवर एकच गर्दी झाली होती. स्तुपाच्या आत प्रवेश करणार्‍या प्रत्येक भाविकांना प्लास्टिक पिशवी पादत्राणासाठी दिली जात होती. बाहेर पडताना ती पिशवी परत घेतली जात होती.

चहूबाजूंनी वाहनांसाठी प्रवेशबंदी

दीक्षाभूमीकडे जाणार्‍या सर्व मार्गांवर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली होती. प्रत्येक रस्त्यांवर पोलिस तैनात करण्यात आले होते. रविवारी होणार्‍या सोहळ्याला दोन केंद्रीय मंत्री व स्वत: मुख्यमंत्री हजर राहणार असल्याने सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहे. तसेच सर्वच रस्त्यांवर पोलिस चौकी स्थापन केली होती.

पुस्तकांची दुकाने सजली


दीक्षाभूमी परिसरात डॉ. आंबेडकर आणि भगवान बुद्धांचे वैचारिक ग्रंथ आणि मूर्तींनी दुकाने सजली आहेत. या दरम्यान पुस्तके आणि मूर्तींची भरपूर विक्री होत असते. याशिवाय बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांच्या गाण्यांच्या कॅसेट, सीडी, लॉकेट साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

नळांवर स्टॉलवाल्यांचे अतिक्रमण

काछीपुरा ते नीरी मार्गावर पिण्याच्या पाण्यासाठी लावलेल्या अस्थायी नळांवर स्टॉलवाल्यांनी ताबा मिळविला आहे. दुकानांसमोरीस नळांवर लोकांची गर्दी झाल्यास ग्राहकांना दुकानात येण्यास जागाच उरणार नाही, या भीतीने स्टॉलवाल्यांनी नळांना झाकून ठेवले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भाविकांना इतरत्र भटकावे लागताना दिसले.

एसटीची व्यवस्था

भाविकांच्या सोयीसाठी शनिवारपासूनच एसटीची व्यवस्था करण्यात आली होती. काछीपुरा भागात अनेक एसटी बसेस भाविकांची ने-आण करताना दिसल्या.

एसटी महामंडळ कर्मचार्‍यांतर्फे भोजनदान


एस. टी. महामंडळ कर्मचार्‍यांतर्फे देसाई ड्रायव्हिंग स्कूलजवळ रहाटे कॉलनी येथे भोजनदान कार्यक्रम उद्या रविवारी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रादेशिक व्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर यांच्या हस्ते सायंकाळी ५.३० वाजता होईल. यावेळी विभाग नियंत्रक राजीव घाटोळे उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील मेश्राम, विजय जनबंधू, निशिकांत धोंडसे, प्रवीण भोगे, प्रमोद कोंडावले परिश्रम घेत आहेत.

२२ सीसीटीव्हीद्वारे भाविकांवर नजर

दीक्षाभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. २२ सीसीटीव्हीद्वारे भाविकांच्या प्रत्येक हालचाली टिपण्यात येत आहेत. तसेच स्तुपात प्रवेश करणार्‍यांची कसून तपासणी केली जात आहे. यासाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर महिला पोलिसांसह साध्या वेषातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
नवरात्रोत्सवाच्या गर्दीत चेंगराचेंगरी, ५० ठार

नवरात्रोत्सवाच्या गर्दीत चेंगराचेंगरी, ५० ठार

दतिया जिल्ह्यातील रतनगड माता मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत भाविकांचा आकडा ५५ वर पोहोचला असून १०० भाविक जखमी झाले आहेत. नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने आज मंदिरात भाविकांची रीघ लागली होती. त्यातच सिंध नदीवरचा पूल कोसळल्याची अफवा पसरल्यानेच ही भयंकर दुर्घटना घडली.
------------------------------------------



Saturday, October 12, 2013

 आसोलामेंढा तलावात बुडून आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू

आसोलामेंढा तलावात बुडून आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू

सावली- मलेरिया आजाराचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या चंद्रपूर येथील आरोग्य कर्मचार्‍याचा आसोलामेंढा तलावात बुडून मृत्यू झाला, तर पोलिस ठाण्यातील सफाई कामगारामुळे तीन कर्मचार्‍यांचा सुदैवाने जीव बचावला.
ही घटना आज शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. भूपेश आगलावे असे मृताचे नाव आहे. चंद्रपूर येथील आरोग्य कर्मचार्‍यांची चमू सावली तालुक्यातील पाथरी परिसरात मलेरिया आजाराबाबत नागरिकांची तपासणी करण्यासाठी गेली. त्यानंतर सायंकाळी वीस कर्मचारी आसोलामेंढा तलावाच्या नहरात आंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले. तेथे पोहण्याचा आनंद लुटताना भूपेश खोल पाण्यात बुडाला. भूपेशला वाचविण्यासाठी इतर तिघे पाण्यात उतरले. पण त्यांना पोहता येत नसल्यामुळे तेही बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच लागलीच पोलिसांची चमू दाखल झाली. सफाई कामगाराच्या पर्शिमामुळे तिघांना बाहेर काढले. पण भूपेशचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत मिळाला नव्हता.

Friday, October 11, 2013

 तरुण विवाहितेची आत्महत्या

तरुण विवाहितेची आत्महत्या

चंद्रपूर- तुकूम परिसरातील ओमकार निवास येथे राहणा-या एका तरुण नवविवाहितेने घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. मनाली असे नाव असल्याची माहिती असून पतीचे नाव मोंटू आहे. कोळसा व्यापारी असलेल्या मोंटू नागपूर येथील असून त्याने चंद्रपूर च्या रामनगर येथील मुलीशी प्रेम विवाह केला होता.
Soybean, Soyoil, Soymeal Open

Soybean, Soyoil, Soymeal Open

Nagpur- Oct 11 (Repoeters) - Soyabean and cottonseed oil prices rose in Vidarbha region of Western
Maharashtra on fresh buying by Vansaspati millers for the festive season amid a firming global
trend. Sentiment also improved after American soya digam reported sharp recovery. Notable hike
on NCDEX, healthy rise in Madhya Pradesh soyabean oil, reported demand from South-based traders
and weak overseas supply also fuelled price, according to sources.
शंभर मुलींना दिले स्वसंरक्षणाचे धडे

शंभर मुलींना दिले स्वसंरक्षणाचे धडे

चंद्रपूर- सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे आयोजित समाधान योजना शिबिरात १0१ मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात १६५ विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून, गरोदर मातांसह किशोरवयीन ७६ मुलींची एचबी तपासणी करण्यात आली. हे शिबिर सिंदेवाही तहसीलदार सचिन कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. 
भारत विद्यालय नवरगाव येथे घेण्यात आलेल्या विस्तारित समाधान योजना शिबिरात आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, भूमिअभिलेख, वीज विभाग, पशुसंवर्धन व महसूल विभागाने सहभाग घेऊन नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. 
१९ किशोरवयीन मुली, ६८ बालक, १८ गरोदर माता, २७ हत्तीरोग रुग्ण, ७२ रुग्णांची मोतिबिंदू यासह विविधि नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एकात्मिक बालविकास विभागांतर्गत ७६ किशोरवयीन मुलींची एच. बी. तपासणी करण्यात आली. कृषी विभागातर्फे ३ लाभार्थ्यांना तुषारसंच धनादेश वाटप करण्यात आले. शिक्षण विभागातर्फे १0१ मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात आले. यात भारत विद्यालयाच्या २५, लोकसेवा विद्यालयाच्या ४९, मातोश्री विद्यालयाच्या १७ व ज्ञानेश विद्यालयाच्या १0 विद्यार्थिनींचा समावेश आहे. महसूल विभागातर्फे सर्मपित प्रमाणपत्र, शिधापत्रिकेत बदलाच्या नोंदी, नवीन शिधापत्रिका, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, र्शावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना आदी योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. फे रफार अदालतमध्ये नवरगाव मंडळातील ३८ प्रकरण निकाली काढण्यात आली. तर महसूल अदालतीमध्ये जमिनीच्या १२ प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. वय व अधिवास प्रमाणपत्र १६, भारतीयत्व प्रमाणपत्र ९, उत्पादनाचा दाखला १४ व शपथपत्र ८६ वाटप करण्यात आले. हे शिबिर तहसिलदार सचिन कुमावत व त्यांच्या सहकार्यानी यशस्वी केले.