रोहीत बोथरा मारहाण प्रकरण
चंद्रपूर : एका निरपराध व्यापारी युवकाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी एक पोलीस उपनिरीक्षक व पाच पोलीस शिपायांना सोमवारी निलंबित केले, तर मारहाण करताना उपस्थित असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना घुग्घूस येथे पूर्वपदावर रवाना करण्यात आले.
विशेष म्हणजे अंभोरे हे घुग्घूस पोलीस ठाण्याचे निरीक्षक होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर टिक्कस यांना नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी रवाना करून त्यांचा प्रभार घुग्घूसचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना देण्यात आला होता. चंद्रपुरातील व्यापारी रोहीत बोथरा हा ३१ ऑगस्टच्या रात्री इंडिका कारने चिमूर येथून व्यापारातील वसुली करून चंद्रपूरकडे परत येत असताना घोडपेठलगत एका क्रमाक नसलेल्या वाहनातील विना गणवेशधारी पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्रते लुटारू असावेत, अशा भितीने रोहीत वेगाने चंद्रपूरकडे निघाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. काही ठिकाणी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहीतने भितीपोटी आपल्या वाहनाचा वेग वाढवत कसेबसे चंद्रपूर गाठले व सुरक्षेच्या दृष्टीने तो रामनगर पोलीस ठाण्याकडे निघाला. मात्र वाहतूक नियंत्रण कार्यालयासमोर काही पोलीस शिपाई दिसल्याने त्याला धीर आला. त्याने लगेच तेथे आपले वाहन थांबविले. मात्र याचवेळी विना क्रमांकाच्या टाटासुमोतून उतरलेल्या पोलीस कर्मचार्यांनी रोहीतला वाहनाखाली ओढून बेदम मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याला फरफटत वाहतूक नियंत्रणकार्यालयातील संगणक कक्षात नेऊन पुन्हा बेशुद्ध होईस्तोवर मारहाण केली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक महेंद्र इंगोले यांनी रोहीतला पायातील बुटाने अक्षरश: चेपले. हा प्रसंग अंगावर काटे आणणारा होता. इंगोलेंच्या मारहाणीत रोहीतच्या कानाचा पडदा फाटला.