चंद्रपूर, गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला सुरवात झाली. रात्रभर कमी जास्त
प्रमाणात पाऊस सुरूच होता. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जून महिन्यात पावसाळ्याला सुरवात झाली. जूनच्या शेवटी पाऊस पडेल, असा अंदाज होता. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. जुलै महिन्याच्या शेवटीच पावसाने हजेरी लावली. दोन- तीन दिवस सलग हा पाऊस पडला. त्यानंतर पावसाने केवळ रंग दाखवून जिल्हावासींना खूश केले.ऑगस्ट महिन्याच्या 20 तारखेपर्यंत केवळ 450.52 टक्केच पाऊस पडला. याची टक्केवारी केवळ 39. 44 टक्के आहे. जिल्ह्याची सरासरी 1142 मि.मी. आहे. मात्र, ऋतू संपण्याच्या मार्गावर असतानाही केवळ 450.52 मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. त्यातही मूल, सावली, चिमूर आणि ब्रह्मपुरी तालुक्यांत 50 टक्क्यांच्यावर पाऊस पडला. गणेशोत्सवानंतर पुन्हा पावसाने आपला रंग दाखविणे सुरू केले. शनिवारपासून पावसाला सुरवात झाली. अधूनमधून पाऊस सुरूच होता. रविवारी (ता. 31) पावसाची रिपरिप सुरूच होती. कोरपना तालुक्यात सर्वाधिक 65.9 टक्के पाऊस पडला. त्यापाठोपाठ जिवती, राजुरा, गोंडपिंपरी,बल्लारपूर, चंद्रपूर, पोंभूर्णा येथेही पावसाने हजेरी लावली.