डॉलरच्या तुलनेच रुपयाची घसरण आणि सोने-चांदीवरील आयात शुल्कात वाढ केल्याने दोन्ही धातूच्या किमतीत मंगळवारी तेजी आली. उपराजधानीत सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 1010 रुपयांनी झळाळून 32 हजार 450 रुपये झाले. तर चांदी 2 हजार 900 रुपयांच्या तेजीसह 56 हजार 700 रुपये किलो झाली आहे.
डॉलर आणि पॉंडसमोर लोटांगण घेणाऱ्या रुपयामुळे या मौल्यवान धातूंना चकाकी आल्याचे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत दोन्ही धातूचे दर घसरण्याची शक्यता कमी आहे. डॉलर सत्तर रुपयांवर गेल्यास सोन्याचे दर 37 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. चांदी 65 हजारांचा आकडा पार करण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. देशात सोन्याची टंचाई नसून तसा अपप्रचार करण्यात येत आहे. काही साठेबाजांनी सोन्याची साठवणूक केल्याने कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही काही व्यापारी करू लागले आहेत.
चार महिन्यांनंतर सोन्याने गाठलेली ही उच्चांकी पातळी आहे. स्टॉकिस्टस आमि ज्वेलर्सकडून मागणी कमी असली, तरी डॉलरचे दर वाढल्याने दोन्ही धातूमध्ये अचानक तेजी आली आहे. सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांमुळे सोन्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत सोने 6 हजार 550 रुपयांनी, तर चांदी पाच हजार रुपयांनी वधारली आहे. रुपयांला मजबुती देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असली, तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही. उलट मौल्यवान धातू आणखी महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.