चंदपूर नगरीत तब्बल ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. ४ मे १९७९ मध्ये चंदपूरातील ज्युबिली शाळेच्या प्रांगणात ५३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. माजी केंदीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे स्वागताध्यक्ष्य होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक वामन चोरघडे होते. तीन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाला दिग्गज साहित्यिकांनी हजेरी लावली होती. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विं.दा.करंदीकर, नारायण सुवेर्, या साहित्य संमेलनाला उपस्थित होते. तेव्हा शहरात हॉटेल ची सोय नव्हती. त्यामुळे पाहुणे जुबली शाळेतच थांबले. काही जन कुणाच्या घरी थांबून होते. ५३ व्या साहित्य संमेलनात नामांतरवाद्यांचा मुद्दा गाजला होता. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी नामांतर समर्थकांनी गोंधळ घालत संमेलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठांनी मध्यस्ती करून आंदोलकांना आवरले आणि आग तात्पुरती शांत झाली. संमेलनकाळात नारायण सुवेर्, डॉ. श्रीपाद भालंचंद जोशी यांच्यासारखे अनेक कवी चंदपूरच्या रस्त्यावरून स्थानिक गांधी चौकापर्यंत कविता वाचत गेले होते तर विठ्ठल वाघ मोठ्याने कविता गाऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. या अभिनव प्रकारामुळे लाकोंनी संमेलनाचा मुख्य मंडप सोडून या अनोख्या कार्यक्रमाकडे धाव घेतली होती.
३२ वर्षांपूर्वीचे साहित्य संमेलन
३२ वर्षांपूवीर्च्या या आठवणी रसिकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्या संमेलनात सहभागी झालेल्या जुन्या पिढीच्या जोडीने आता इथली नवी पिढी ८५ व्या साहित्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे.