चंद्रपूर - यंदा उशिरा आणि अनियमित पडलेल्या पावसामुळे जलसाठ्यांची पातळी दरवर्षीपेक्षा खालावलेली आहे. गत पाच महिन्यांत सरासरीपेक्षा कमी म्हणजेच केवळ 82. 6 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत सिंचन प्रकल्पात 75 टक्केच जलसाठा आहे. यामुळे रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जून-जुलै महिन्यात पावसाने दगा दिल्याने पेरणी आणि रोवणीची कामे खोळंबली होती. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कोरडी पडलेली जलाशये भरून निघाली नाहीत. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोनच महिन्यात पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी 1194.3 मिमी. पावसाची अपेक्षा असते. मात्र, प्रत्यक्षात 996 मिमी. इतका पाऊस झाला. ऑगस्टमध्ये आसोला, इरई, घोडाझरी हे प्रकल्प तुडुंब भरले होते. मात्र, त्यानंतर पावसाने दगा दिल्याने ऑक्टोबर अखेरपर्यंत जलसाठे 75 टक्क्यांच्या पुढे गेलेले नाहीत. इरई धरणाची जलक्षमता 160 दशघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत 155 दशघमी म्हणजेच 97 टक्के पाणी उपलब्ध आहे. यातून महाऔष्णिक वीज केंद्र आणि चंद्रपूर शहराची तहान भागविली जाते. याच जलसाठ्यावर 2012 मधील उन्हाळ्यातील तहान भागवायची आहे. 56 दशघमी क्षमता असलेल्या सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलावात 35 दशघमी (61 टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. या तलावावर रब्बीची भिस्त असून, सावली, मूल, पोंभूर्णा तालुक्यातील शेतकरी अवलंबून आहेत. याच तलावात गतवर्षी 41 दशघमी इतका जलसाठा होता. 2009 मध्ये केवळ 7 दशघमी इतका अल्पसाठा राहिल्याने कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता.
जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. 140 दशघमी सिंचनक्षमता असून, आजच्या स्थितीत 106 दशघमी जलसाठा आहे. मागील आठवड्यात 118 दशघमी जलसाठा होता. त्यात 12 दशघमी पाण्याची घट झालेली आहे. 2009 मध्ये कोरडा दुष्काळ पडल्याने केवळ 45 दशघमी इतका कमी साठा शिल्लक होता. याशिवाय 88 लघू प्रकल्प असून, 103 दशघमी क्षमता आहे. आज 67 दशघमी पाणी शिल्लक आहे.
प्रकल्प........क्षमता........उपलब्ध साठा
(दशघमीमध्ये)
इरई..........160.........155
आसोलामेंढा.....56.......34
मध्यम प्रकल्प....140......106
लघू प्रकल्प..........103........67