वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सर्वपक्षीय विदर्भ राज्य संग्राम समितीने काल (बुधवारी) पुकारलेल्या "विदर्भ बंद'ला चांगला प्रतिसाद मिळाला. विदर्भाच्या बहुतांशी भागांत बंदचे स्वरूप कडकडीत असे राहिले. जाळपोळ, दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता बंद शांततेत सुरू असल्याचे चित्र विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दिसून आले. चंद्रपूर शहरातील बाजार समिती, महात्मा फुले मार्केट, गंजवॉर्ड सब्जीमंडी आणि गोलबाजारात या बंदमुळे दिवसभर शुकशुकाट होता. राजुरा येथे शोभा मस्की या महिलेने सकाळी आठ वाजताच्या सुमारास टॉवरवर चढून लक्ष वेधले. त्यानंतर कोठारी आणि गोंडपिंपरी येथेही तरुणांनी टॉवर आंदोलन केले. नागभीड येथे नागपूर जाणारी नॅरोगेज रेल्वेगाडी थांबवून प्रवाशांना खाली उतरविण्यात आले, तर गडचिरोली-नागपूर मार्गावरील नागभीड जवळ रास्ता रोको करण्यात आला. भाजपचे खासदार हंसराज अहीर, कॉंग्रेस नेते माजी खासदार नरेश पुंगलिया यांनीही बंदमध्ये सहभाग दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही स्वतंत्र विदर्भाची मागणी केली.
"विदर्भ बंद
वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सर्वपक्षीय विदर्भ राज्य संग्राम समितीने काल (बुधवारी) पुकारलेल्या "विदर्भ बंद'ला चांगला प्रतिसाद मिळाला. विदर्भाच्या बहुतांशी भागांत बंदचे स्वरूप कडकडीत असे राहिले. जाळपोळ, दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता बंद शांततेत सुरू असल्याचे चित्र विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दिसून आले.